‘भारत महोत्सव’, ‘आझादी का अमृत महोत्सव’ ते ‘अमृत काल’ घोषणेपर्यंतचा भारताच्या प्रवासाचा भव्य सोहळा २६ ऑगस्ट २०२३ रोजी, न्युयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर प्लाझा येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. एक भारत' च्या एकात्म भावनेचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने नवीन उंची गाठली. न्यूयॉर्कमधील भारताचे कौन्सिल जनरल रणधीर जैसवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अमृता फडणवीस, डेप्युटी कमिशनर दिलीप चौहान हे विशेष अतिथी म्हणून सन्मानित होते. कौन्सिल जनरल यांच्या कार्यालयात झ
Read More
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशातील १३.५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्याचवेळी जनतेचे सरासरी उत्पन्नदेखील वाढले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मध्य प्रदेशातील रोजगार मेळाव्यास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
चिन्मय विश्वविद्यापीठात दि. १९ फेब्रुवारी, २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जयंतजींचे सुरेख अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या घोषणेला अनुसरत जयंतजींनी विषय निवडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा अनेकांगी उहापोह केला.
जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर खोर्यामध्ये अक्षरशः आग लागेल, अशा वल्गना करणारे फुटीरतावादी नेते आज मंदिरात जाऊन प्रसादाच्या रांगेत थांबताना दिसतात, तर जम्मू-काश्मीरमधील युवक हा रोजगाराच्या नवनव्या संधी मिळवताना दिसून येतो. भारताचे हे नंदनवन विकासाच्या मार्गात आपले पुरेपूर योगदान देताना दिसते.
केंद्र सरकारने पुढच्या दि. १५ ऑगस्टपर्यंत ‘आझादी का अमृत महोत्सव’ या योजनेखाली प्रत्येक जिल्ह्यात ७५ पाण्याचे साठे विकसित करायचे किंवा अगोदरचे पुनरुज्जीवित करायचे, असा निर्णय घेतला आहे. यासाठी १२ हजार जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना त्यांच्याकडे असलेल्या पाण्याच्या साठ्यांच्या जागांची गणती करण्यास सांगितले आहे. ही गणती महसूल खात्याकडे झाल्यानंतरच जलसंधारण अभियान योग्यरित्या कार्यान्वित करता येईल.
'आझादी का अमृत महोत्सव'चा भाग म्हणून, केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी दि. ५ ते १५ ऑगस्ट पर्यंत देशभरातील सर्व पुरातत्व सर्वेक्षण संरक्षित स्मारके/स्थळांना मोफत प्रवेश देण्याची घोषणा केली आहे . पुरातत्व सर्वेक्षण द्वारे भारतभर ३,५००हून अधिक स्मारके संरक्षित आहेत.
जम्मू-काश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सर्व नागरिकांना १२ ते १५ ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारच्या या योजने अंतर्गत देशातील २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, असा अंदाज आहे. मात्र जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी यावर आक्षेप घेतला आहे.