छत्रपती शाहू महाराज विद्यापीठाचे कुलगुरु आणि भारतीय विश्वविद्यालय संघाचे उपाध्यक्ष प्रा. विनय कुमार पाठक यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या २०० कुलगुरुंनी राहुल गांधी यांना निषेधाचे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ”कुलगुरुंची नियुक्ती गुणवत्तेनुसार नाही, तर एका विशिष्ट संघटनेच्या इशार्यावर केली जाते असे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे राहुल यांनी देशभरातील विद्यापीठांची बदनामी केली आहे.” यावर वाटते की, राहुल गांधी कुलगुरुंची, देशातल्या विद्यापीठांची अशी बदनामी का करत आहेत?
Read More