कर्जत तालुक्यातील दहिवली गावातील सर्वांत जुनी वास्तू म्हणजे पिंपुटकर सुभेदारांचा वाडा होय. साधारणतः शके 1714 म्हणजे इसवी सन 1792 मध्ये विठ्ठल मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद मिळते. विचार केला असता त्या आधी पिंपुटकर सुभेदार इथे आले आणि त्यांनी निवास केला व दहिवली गावाला व्यापक रूप मिळत गेले. त्याचवेळी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात पंचायतन आकार घेत होते. याच परिसरात अनेक जुन्या वृक्षांना पार बांधण्यात आले; आजही त्यातील चार पार शाबूत आहेत. तीन पार विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आहेत, तर एक पार हे गुरव आळीतील प
Read More