वैयक्तिक विकासाच्या क्षेत्रात, स्वयं-शिस्तीची संकल्पना सर्वोच्च ठरते. आपण आत्म-शिस्त या मानसशास्त्रातील अत्यंत गरजेच्या क्षेत्राबद्दल ऊहापोह करणार आहोत. त्या अनुषंगाने तुमचे विचार, भावना आणि वर्तन तुमच्या एकाग्र, वचनबद्ध आणि सदैव प्रेरित राहण्याच्या क्षमतेमध्ये कसे योगदान देतात, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
Read More
कल्याण : माईण्ड आणि सउलच्या ॲड. मनिषा सूर्यराव, रश्मी शर्मा व काव्य किरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या "काव्य गीत सौरभ " या कविता व गाण्याच्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले. हा कार्यक्रम टि. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बेतुरकर पाडा येथे नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सल्लागार जनार्दन ओक, मुथा महाविद्यालयाचे प्रकाश मुथा, अग्रवाल महाविद्यालयाचे मुन्ना पांडे, टि. एस. स्कूल चे सदानंद तथा बाबा तिवारी, काव्य किरण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख व रश्मी शर्मा हे होते.
परमार्थ साधनेला सुरुवात करायची, तर ती तरुणवयात करायला हवी. भगवंताला ओळखण्यासाठी, त्याच्या चिंतनात रममाण होण्यासाठी वयाचे ज्येष्ठत्व येईपर्यंत वाट पाहत थांबलो, तर साधारणतः साधनेला सुरुवात होत नाही आणि ती साध्य होणेे कठीण असते. भगवंत आणि परमार्थ साधना हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. याची जाणीव माणसाला तरुण वयातच व्हावी. ज्या भक्ताला अशी जाणीव होते, तो संयमाने, सदाचाराने आपले आयुष्य घालवतो. त्याच्या अंगी मनाची एकाग्रता, प्रसन्नता येते. त्याच्या अंगीविवेकनिष्ठा येते. असा हा ज्ञानीभक्त आनंदी असतो. अशा भक्त
आज सबंध व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, राष्ट्र व विश्वाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आत्म्याचा आवाज ऐकणारे संतसुजन हवेत. ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याची ध्वनी न ऐकता मनात येईल, तसे व्यर्थ बोलल्यामुळे व वागल्यामुळे सार्या जगाची प्रचंड हानी होत आहे. सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरत चालले आहे. ईश्वर करो... सर्वांच्या हृदयात ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याचा आवाज ऐकण्याचे सामर्थ्य वाढत राहो!
विषयांच्या मागे धावता आत्मकल्याणासाठी पूर्ण पुरुषार्थ करणे, हेच मानवाचे कर्तव्य आहे. जीवनाची क्षणभंगुरता आणि आत्म्याची अमरता लक्षात घेऊन आत्मोद्धाराकरिता प्रबल पुरुषार्थ करणे इष्ट आहे.
‘स्व’च्या म्हणजेच आत्म्याच्या राज्यामध्ये दु:खाचा यत्किंचितही लवलेश नाही. इथे तर आनंदच आनंद! याउलट ‘पर’ म्हणजे परक्यांचे किंवा मन व इंद्रिय यांचे राज्य. बाह्य विषयाकडे वळणारी इंद्रिये जेव्हा आत्म्याच्या अनुकूल वागू लागतील, तेव्हा खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्थापना होईल.
आत्मशक्ती ही अनेक संकटांवर मात करून मानवाला विजयी बनवितो. आत्मिक बळाने परिपूर्ण माणूस सार्या जगाचा नेता बनतो. जग त्याच्या मागोमाग धावू लागते. आत्मबलिष्ठ महामानवाचे शब्द जनसमूहासाठी प्रमाण बनतात. याच आत्मशक्तीच्या सामर्थ्यामुळे प्रबळ शत्रूवर मात करता येते.
जाणीवरूप आत्मा' हा अंतरातील 'देव' असून हे 'शरीर' म्हणजे 'देवालय' आहे. सामान्य माणसाला हे न समजल्याने तो देवाचे ध्यान करण्याऐवजी देवालयाचे, शरीराचे ध्यान करतो. याचा अर्थ साधकाची देहबुद्धी कमी न झाल्याने तो देहालाच महत्त्व देतो