केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘नेहरुवियन ब्लंडर’वर संसदेत भाष्य केल्याने, काँग्रेसी नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली. अमित शाह यांनी नेहरू यांचाच दाखला देत, वस्तुस्थिती मांडली. नेहरू यांच्या चुकांमुळेच काश्मीरची समस्या निर्माण झाली, हे त्यांनी ठामपणे संसदेत सांगितले. पण, आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षं उलटली तरी नेहरुंची ही घोडचूक काँग्रेसने नाकारणे हीच खरी शोकांतिका.
Read More
जम्मू – काश्मीरला नेहरूवियन ब्लंडर्समुळे ७० वर्षे भोगावे लागले. पाकव्याप्त काश्मीरची समस्यादेखील नेहरूंमुळेच निर्माण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र काश्मीरी जनतेस त्यांचा अधिकार प्रदान केला, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री यांनी लोकसभेत केले.