(ICE 3) एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई च्या विशेष शिक्षण विभागाने दि. ९ ते ११ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद ICE 3 चे आयोजन केले. या परिषदेला भारतासह अमेरिका, इंग्लंड, इटली, मोरोक्को, जर्मनी, स्वीडन, डब्लिन, भूतान आणि दुबई अशा विविध देशांमधून प्रतिनिधींचा सहभाग मिळाला. परिषदेत एकूण ४००हून अधिक उपस्थिती नोंदवली गेली.
Read More
'जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा हैं’, ‘पाकिस्तानी अजेंडा नहीं चलेगा’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन भाजप आमदारांनी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स - काँग्रेस सरकारच्या ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याच्या प्रस्तावास कडाडून विरोध करून प्रस्तावाच्या बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी चिंध्या केल्या.
( Restoration of Article 370 ) केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर तिथे १० वर्षांनी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाल्याने त्यांनी नवीन सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेने बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी केंद्रशासित प्रदेशाचा विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यास सांगणाऱ्या ठरावास मंजुरी दिली आहे. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पीपल्स डेमोक्रॅ
कलम ३७० (Article 370) मागे घेण्याबाबत काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत भाजप खासदारांनी विरोध दर्शवला. मात्र आता ओमर अब्दुल्ला यांचे सरकार आल्याने जम्मू-काश्मिर खोऱ्यात कलम ३७० मागे घेण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. जम्मू-काश्मिरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी कलम ३७० मागे घेण्याबाबत हिरवा कंदील दर्शवला होता. ओमर अब्दुल्ल यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने या प्रस्तावाला पाठिंबा देत विधानसभेत याबाबतीत ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मंजूरी जाहीर केली आहे.
( Omar Abdullah )नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, काँग्रेसने सध्या तरी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या तीन पिढ्यांनाही कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, असा घणाघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी जम्मू – काश्मीरमधील प्रचारसभेस संबोधित करताना गुरुवारी केला.
काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या तीन घराणेशाह्यांनी जम्मू – काश्मीरचे मोठे नुकसान केले आहे. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही काश्मीरमधील तरुणाई आणि तीन कुटुंबांच्या घराणेशाहीविरोधात लढली जाणार आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी डोडा येथील प्रचारसभेत केले आहे.
Farooq Abdullah फारुख अब्दुल्ला आज सर्व धर्मींयांची काळजी घेण्याविषयी सल्ला देत आहेत. हे पाहून महाभारतातील त्या प्रसंगाची आठवण होते, ज्यावेळी कर्ण भूमीत रुतलेले चाक काढण्याच्या प्रयत्नात असताना, निःशस्त्र असल्याने वार न करण्याच्या क्षात्रधर्माची पार्थाला आठवण करून देतो. त्यावेळी पार्थसारथी श्रीकृष्ण कर्णाला त्याच्या प्रत्येक पापाची आठवण करून देत विचारतात, तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?
पश्चिम बंगाल, बिहार आणि दिल्लीनंतर जम्मू – काश्मीरमध्येही काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीमध्ये फूट पडली आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष प्रदेशात कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नसल्याची घोषणा फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.
नॅशनल कॉन्फरन्सच्या एका खासदाराला भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य करणारी शपथ घेणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाला द्यावा लागावा, यावरून त्या राजकीय पक्षाची मानसिकता काय आहे, त्याची कल्पना येते. आता हा पक्ष आणि त्याचे नेते अब्दुल्ला हे ‘संविधान वाचविण्यासाठी’ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ या गटात सहभागी झाले आहेत, हा क्रूर विनोदच म्हणावा लागेल.
भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणारे याचिकाकर्ते आणि नॅशनल कॉन्फरन्सचे लोकसभा खासदार अकबर लोन यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय राज्यघटनेशी निष्ठेची शपथ घेण्याचे सांगून जम्मू – काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेनंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील कारगिलमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या या निवडणुकीत कारगिल हिल कौन्सिलच्या २६ जागांसाठी १० सप्टेंबरला मतदान होणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील येत्या निवडणुकीमध्ये तिथे तैनात असलेल्या निमलष्करी बल आणि निवासी सैनिकांना मतदान करण्याचा अधिकार देऊ नये, अशी भूमिका नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारूख अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचेअध्यक्ष सज्जाद गनी लोन यांनी घेतली आहे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले ’माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन वाचून रशिया या प्रगतशील देशाबद्दलची प्रचंड आपुलकीची, ओढ अनेक वर्षांपासून लागून होती. कधीतरी आपणही रशियात जाऊन रशियाच्या त्या प्रगतशील आणि विकसनशील देशाचे वैभव आपल्या डोळ्यांनी पाहू, ही मनातील ओढ ‘एमजीडी परिवारा’चे सुनील वारे साहेबांच्या अथक परिश्रमांतून साकार झाली. आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मास्को, रशियाला गेलो. त्या समाजशील आठवणी...
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक-आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यावेळी डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते.
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक - आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
फारुख अब्दुल्ला ५० वर्षांपासून जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सक्रिय राहिलेले व्यक्तिमत्त्व; पण आज त्यांना पुळका आला तो म्यानमारमधून घुसखोरी करत भारतात आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांचा! मात्र, ३० वर्षांपूर्वी इस्लामी कट्टरपंथीयांकडून काश्मिरी हिंदू पंडितांच्या कत्तली होत होत्या, त्यावेळी फारुख अब्दुल्लांना कधीही मानवाधिकाराची आठवण झाली नव्हती.
‘कलम ३७०’ हद्दपार झाल्यानंतर २३२ दिवस नजरकैदेत राहिलेल्या ओमर अब्दुल्लांना या काळात हे कळून चुकले की, आपण कितीही आदळआपट केली तरी काश्मीरमधील परिस्थिती बदलणारी नाही. मात्र, पुस्तकात ही भूमिका विशद करण्यापूर्वी ओमरने कदाचित आपल्या पिताश्रींशी चर्चा केली नसावी का? कारण, मग तसे असते तर त्या सहा पक्षांच्या संयुक्त ठरावात नॅशनल कॉन्फरन्सचे नाव सर्वप्रथम कसे?
पीएसएअंतर्गत नजरबंदीचा कालावधी तीन महिन्यांनी वाढविला
फारुख अब्दुल्लांच्या डोक्यात सैनिकांच्या हौतात्म्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे किडे वळवळल्याचे दिसते. म्हणूनच पाकिस्तानने पोसलेल्या, पाळलेल्या दहशतवाद्यांनी ज्यांच्या रक्तामांसाचा चिखल केला, ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यालाच खोटे ठरविण्याचा हिणकसपणा अब्दुल्लांनी केला. म्हणूनच आता जनतेनेच या देशविरोधी कीडीला हद्दपार केले पाहिजे, असे वाटते.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अकबर लोन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्याचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत
श्री नगरमधील करफल्ली परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारातमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे दोन कार्यकर्ते ठार झाले आहेत.
येत्या रमजान महिन्यामध्ये भारतीय सैन्येने शस्त्रसंधीचे पालन करत गोळीबार करू नये, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्ससह सर्व स्थानिक पक्षांनी केली होती.