(MP Naresh Mhaske instructions to thane railway officials) ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे. फलाटांवर नव्याने छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलीत प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे. नियमित स्वच्छतेवर भर द्या, युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा, पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशा महत्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
Read More
( Opposition to Thane-Borivali subway ) ठाणे - बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाला होत असलेला विरोध अखेर शमला आहे. शनिवारी मानपाडा येथील सभागृहात एमएमआरडीए आणि रहिवाश्यांच्या बैठकीत खा. नरेश म्हस्के यांनी यशस्वी शिष्टाई केल्याने रहिवाश्यानी तुर्तास नमते घेतले.
तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून बाळासाहेबांचे विचार विसरलात. सोनिया गांधी आणि राहूल गांधींनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आदेश दिले असतील आणि हे लोक काँग्रेसी विचारांचे गुलाम झाले आहेत, असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर केला. त्यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर येथील कबर नष्ट करा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. तसेच ही वारसा स्थळे केवळ आपल्या गुलामगिरीची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका हिंदू महिलेला फसवून तिच्याशी लग्न करीत नेपाळला परागंदा झालेल्या मुस्लीम भामट्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश खा. नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.
सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नविन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे.
उबाठा गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध ठरलेली आहे, असा पलटवार खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. संजय राऊतांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
ठाणे : ( Thane ) मुंबई महानगर प्रदेश( एमएमआर) मध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूकीला गती देण्याची ग्वाही केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. अशी माहिती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. खासदार म्हस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट घेत मुंबई, डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जल वाहतुकीद्वारे जोडण्यासाठी निवेदन दिले.
नवी दिल्ली : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणाऱ्या मुंबईतील जलवाहतुकीच्या ( Water Transport ) संदर्भात संसदेत नियम ३७७ अन्वये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
ठाणे : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी रविवारी पहाटे हिरानंदानी इस्टेट भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन सकाळी जोरदार प्रचार रॅली काढली. या रॅलीचा श्रीगणेशा चंदनवाडीतील रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला. रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. यावेळी महिलांनी औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी,
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडणुक लढविणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांच्या प्रचार रॅलीला मंगळवार पासुन सुरवात झाली. सांयकाळी ६ वा. निहारीका सोसायटी मेन गेटपासून सुरु झालेली ही रॅली रात्रौ १० वा. गौरव स्वीट कॉर्नर येथे समाप्त झाली. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विविध संस्था आणि सोसायटया तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सा
केंद्र सरकारने गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समिती सदस्यपदी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांची नेमणूक केली आहे. समितीमध्ये देशातील शहरी योजना उदा. मेट्रो, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना, परिवहन अशा विविध अर्थसंकल्प आणि शहरी विकास योजनांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दिल्लीच्या संसद भवनात झाली. यावेळी शहरी वाहतुकीच्या समस्यांवर मते मांडताना इलेक्ट्रिक बसेससाठी अधिक अ
बदलापूरमधील दुर्देवी घटनेनंतर आरोपीला ताबडतोब फाशी द्या अशा घोषणा देत रेल्वे रोखून आंदोलन केले, त्या कूरकर्मा आरोपीविषयी विरोधकांना आपुलकी का वाढली, अशी सडकून टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी हेच संजय राऊतांचं काम आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. संजय राऊत राजकारणात अनपढ आहेत, असेही ते म्हणाले. बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत होत्या. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते. आज खा. नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली. अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्याने ही बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता, या गुप्ताची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
Uddhav Thackeray विशेष प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेत कोट्यवधी रुपयांचा रँड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एकाची भेट उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत घेतली. याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. उबाठा गटाचे निवडून आलेले दोन खासदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच शिवसेनेत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
मशिदी, प्रार्थनास्थळांतील मुल्ला मौलवींना लाखों रुपये वाटून उद्धव ठाकरेंनी मतं मिळवली, असा गंभीर आरोप ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच ठाकरेंची ही भूमिका मान्य नसल्याने दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंनी ठाण्याचा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं असून ठाणे लोकसभेतून महायूतीचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान खासदार आणि उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांनी नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. लोकनेते आमदार नाईक यांनी कोपरखैरणे येथील तर जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायूतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. रविवार, १२ मे रोजी ही सभा पार पडेल. दरम्यान, यावेळी राज ठाकरे आनंद दिघेंच्या आश्रमात जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
आपण सगळे मिळून बंड करु असं संजय राऊत अयोध्येत म्हणाले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांनी शनिवारी सकाळपासून गाठीभेटीद्वारे प्रचार सुरु केला आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
नुकतेच ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी महायूतीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे कुठल्या बर्फाच्छादित प्रदेशात गेले होते आणि कुणाबरोबर बर्फात खेळत होते? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हा सवाल केला आहे. न्युज १८ लोकमतशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडण्यासाठी राष्ट्वादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच प्रयत्न केलेत. असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांनी ट्विटद्वारे व्हिडीओ शेअर केला आहे. पुराव्यासकट आव्हाडांची नरेश म्हस्केंनी पोलखोल केली आहे. ट्विट केलेल्या व्हिडीओत आव्हाड मुंब्र्यातील शाखेबद्दल बोलताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या व्हिडीओत उद्धव ठाकरे यांनी शाखेला भेट दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेचा भाग ट्विट केला आहे.
ठाण्यात शिवसेनेच्या शाखांचा पुळका आलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर शिवसेनेच्या (शिंदे गट) नरेश म्हस्के यांनी शरसंधान केले आहे. घे जित्या, तुला पाहिजे होता ना रे पुरावा ! आमच्या शाखांचा नाद सोड, तो 'आव'... हाडाने नाही, शिवसैनिकांनीच करावा ! अशी टिप्पण्णी म्हस्के यांनी एक्स वर करून त्यासंदर्भातील व्हीडिओही व्हायरल केले आहेत.
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या स्मृतीस्थळावर शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेंकाना भिडले आहेत. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून निघाले.त्यानंतर शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्तेंमध्ये धक्काबुक्की झाली. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे केली आहे.
पुरोगामित्वाचे ढोल बडवित इतरांना तत्वज्ञानाच्या गप्पा मारणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाडांना ठाण्यात विद्यार्थ्यानी चक्क 'जय श्रीराम' च्या घोषणांनी प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.०५ ऑगस्ट) गडकरी रंगायतनमध्ये विद्यार्थी वर्गासाठी एका गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरकार विरोधी टिमकी वाजवणाऱ्या आव्हाडांना विद्यार्थ्यानी जय श्रीराम च्या घोषणा देऊन चपराक लगावली.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडप भाडे माफी द्यावी. असे साकडे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना घातले आहेत. मंगळवारी म्हस्के यांनी यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले.
ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मयूर शिंदे याला अटक केली आहे. मयूर शिंदे यांच्या अटकेनंतर दिवसभर राजकिय नेत्याकडून वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत असताना शिवसेनेचे समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत पोलखोल केली आहे. कथित धमकी प्रकरणात अटक केलेला मयूर शिंदे हा ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एकमेव सज्जन मानत असलेल्या नेत्यासोबतचे संबंध काय ? तर मयूर शिंदे यांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड याच्यासोबत फोट
ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे सर्वेसर्वा दिवंगत धर्मवीर आनंद दिघे जाऊन २३ वर्षे उलटली. तरी ठाण्यात दिघे यांच्या नावाने राजकारण सुरु असल्याने ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेले काही दिवस राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात धर्मवीर दिघे यांच्यावरून आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना आ. आव्हाडांनी,१९९१ साली जेव्हा आमची सत्ता आली तेव्हा आनंद दिघे यांचे संरक्षण काढले होते.तेव्हा, पद्मसिंह पाटील यांना यांना भेटण्यासाठी आनंद दिघे माझ्या
स्वतः संजय राऊतांची अवस्था उकीरड्यावरच्या बेवारस कुत्र्यासारखी केली आहे तर शिवसेना, उद्धव ठाकरे यांची अवस्था उकीरड्यासारखी संजय राऊत यांनी केली आहे. शरद पवारांनी आम्हाला गद्दार म्हणणे शोभत नाही, पवारांनी राष्ट्रवादीची निर्मिती कशी केली याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आमची ती गद्दारी, तुमची ती खुद्दारी? असा पलटवार नरेश म्हस्केंनी केला आहे. शरद पवारांनी शिंदे गटाला टोला लगावत गद्दार आणि खोके म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ठाणे : शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी नागपूर येथे झालेल्या वज्रमूठ सभेचा खरपूस शब्दांत समााचार घेतला. त्यांनी नागपूर येथे रविवारी झालेल्या वज्रमूठ सभेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की नागपूर येथे झालेली सभा ही "वज्रमूठ नव्हे तर सैल झालेली मूठ" अशा शब्दांत खिल्ली उडविली.
शिवसेनाभवन आणि संबंधीत प्रॉपर्टी संदर्भात दावा ठोकणाऱ्या न्यायालयातील याचिकेबाबत नरेश म्हस्केंचा (Naresh Mhaske) मोठा खुलासा
ठाणे : मुंबई दि. १० एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. तसेच दि.११ एप्रिल रोजी ही काही बैठका होत्या मात्र त्या बैठका देखील रद्द झाल्या. या बैठका नक्की का रद्द झाल्या याची माहिती माध्यमांनी घ्यावी.आमच्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा गायब असल्याने आणि या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली आहे.
मुंबई : पक्ष आणि चिन्ह हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मागे सुरु झालेली संकटांची मालिका अजूनही कायम आहे. त्यात आता आणखी एका संकटाची भर पडली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हातातील शिवसेनेचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन आणि पक्षाचा निधी मूळ शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात यावा अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मविआची छत्रपती संभाजीनगर येथील सभा म्हणजे वज्रमुठ नसुन सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा आहे.अशी खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडवली आहे. रविवारी सायंकाळी ठाण्यातील आनंद आश्रम येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी येत्या ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार - खासदारां सह अयोध्या दौर्यावर जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा गौप्यस्फोट विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ठाण्यात पुन्हा एकदा शिवसेना शाखेचा वाद ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील शिवाई नगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून सोमवारी सायंकाळी शिवसेना आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाने लावलेले कुलूप तोडुन शिवसेनेने शाखेचा ताबा घेतल्याने ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी व आरोपांची बरसात करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शिवसेनेच्यावतीने शाखेला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा शाखेचा ताबा घेण्यावरून वाद
ठाण्यातल्या एका गुंडाला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी श्रीकांत शिंदेंनी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला, त्यास शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “संजय राऊत यांचे डोके फिरले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू. फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टीका करायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचे, असे त्यांचे धोरण आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उरलेल्या मंडळींबद्दल सहानुभूतीचे वातावरण तयार करायचे, यासाठी
संजय राऊत असतील किंवा शिल्लक सेनेतील नेते असतील. केवळ सहानूभुती घेणे हा एकमेव विषय सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. सत्तेतून पायउतार झाले, वर्षाबंगला सोडला.. तेव्हापासून ते आतापर्यत संजय राऊत यांच्यावर कर्नाटक कोर्टात जो काही गुन्हा दाखल होता, ती कोर्टाची प्रोसीजर आहे, समन्स निघतात, त्यानंतर सुनावणी असते, त्याकरिता बोलावले आहे. परंतु लोकांमध्ये असे चित्र निर्माण करणे की, माझ्यावर अन्याय होणार आहे, हल्ला होणार आहे… असं झालं तसं झालं. लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा एकमेव उद्योग आता या मंडळींना बाकी आहे. कर
शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पाटण्यात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यामुळे भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांच्या या भेटीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीबाबत मंगळवारी माहिती देण्यात आली होती.
बंजारा भवनासाठी नवी मुंबईत भूखंड उपलब्ध करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करणार.अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकदा शब्द दिला की, माघार नाही.हा माझा स्वभाव आहे. म्हणुनच ५० आमदार सोबत आल्याचा पुनरुच्चार करून त्यांनी, सहकारी जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडायचे नसते.असा टोला पक्षप्रमुखांचे नाव न घेता लगावत मंत्री संजय राठोड यांची भलामण केली.
"राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रिया ताई अजून पचवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुध्दा कमी झालेली दिसतेय. त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना एखादे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू!" असं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे. "गेल्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली." असे वक्तव्य करणाऱ्या सुप्रियाताईंचा म्हस्के यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा २०१२, तारिख होती २४ ऑक्टोबर मात्र त्या दिवशी शिवसैनिकांचा विठ्ठल त्याच्या पंढरीत म्हणजेच शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी उपस्थित नव्हता. तर त्या दिवशी पहिल्यांदाच बाळासाहेबांनी शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. पण हा आपल्या बाळासाहेबांनी आपल्याशी साधलेला शेवटचा संवाद ठरणार आहे, याची त्यादिवशी कोणालाच कल्पना नव्हती. पुढे १७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी बाळासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला आणि ८६ वर्षाचे बाळासाहेब ठाकरे नामक वादळ कायमचं शांथावलं. यासगळ्यावर आज चर्चा कराव
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी खऱ्या अर्थाने दहीहंडी उत्सवाला मोठ केलं आणि म्हणूनच दिघेंच्या ठाण्यात जगातील सर्वात उंच मानवी मनोरे रचण्याचा रेकॉर्ड नोंदवला गेला. या दहीहंडी उत्सवाने अनेक नेत्यांची राजकीय करियर घडवली. त्यातल्या काहींना मंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी या उत्सवाकडे पाठ फिरवली तर या उत्सवावर प्रेम असणारे अनेक नेते आजही या उत्सवाचे आयोजन करतात. सध्या मुंबई-ठाण्यात ज्याची हंडी त्याचा मतदारसंघ असे समीकरण बनलंय. नुकताच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या मतदार संघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाच्य
वसई-विरार मनपा आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतींमधील नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.