नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा सोलापूर प्रकल्प आता वीज निर्मितीसाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पन्नास वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील.
Read More
सरकारी मालकीची अभियांत्रिकी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने मंगळवारी सांगितले की त्यांना एनटीपीसी (NTPC) कडून 1,600 मेगावॅट सिंगरौली सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट (STPP) स्टेज-III स्थापित करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे.उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील सिंगरौली येथे सध्याच्या 2,000 मेगावॅटच्या थर्मल पॉवर स्टेशनला (TPS) लागून हा प्लांट उभारला जाईल असे BHEL ने एका निवेदनात म्हटले आहे.
एनटीपीसी लिमिटेड अंतर्गत नोकरीची करायची असेल तर ही बातमी नककीच तुमच्या कामाची आहे. एनटीपीसी ही देशातील मोठी वीजनिर्मिती कंपनी आहे. या कंपनीत काम करु इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एनटीपीसी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. एनटीपीसी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांकरिता आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अर्ज पध्दतीबद्दल सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
राम मंदिर सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जा निर्मितीवर सरकारने विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट केले होते. वाढत्या ऊर्जेची मागणी व गरज लक्षात घेता सोलार रुफटॉप योजनेवर आपले लक्ष केंद्रित केले होते. यासाठी सरकारने ' प्रधानमंत्री सर्वोदय योजना ' सुरू करत १ कोटी कुटुंबांना रुफटॉप सौर उर्जा देण्याचे ठरवले आहे. या प्रयत्नांना जोड देण्यासाठी एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) ने राजस्थानात ७० मेगावॉटचा पहिलावहिला सौर उर्जा निर्मितीसाठी कंबर कसली आहे.
एनटीपीसी मायनिंग लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. एनटीपीसीद्वारे जारी करण्यात आलेल्या भरतीच्या माध्यमातून विविध पदांवर काम करण्याची चांगली संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. एनटीपीसी अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारास दि. ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.
"नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड"अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. एनटीपीसी अंतर्गत होणाऱ्या भरतीप्रक्रियेतून विविध रिक्त पदांच्या ४९५ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (एनटीपीसी) ची १०० टक्के सबसिडरी असलेल्या निपको (नॉर्थ ईस्टन इलेक्ट्रिकल पॉवर कार्पोरेशन) ने अरूणाचल प्रदेश सरकारबरोबर २६२० मेगावॉट हायड्रो प्रोजेक्ट साठी १२ ऑगस्ट २०२३ ला सामंजस्य करार केला आहे. या प्रोजेक्टमुळे २६२० मेगावॉटचे लक्ष पूर्ण केले जाईल.या शिवाय एन डी सी (नॅशनली डिटरमाईन कंट्रीब्युशन) उपकमाशी संलग्न असलेल्या भारतातील ग्रीन एनर्जीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. या एनडीसीने २०३९ मध्ये ५०० गिगावॉट नॉन फॉसिल एनर्जी निर्माण करण्यास शक्य होईल. देशातील कार्बन फुटप्रिंट कम
एनटीपीसी भारतात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या तुलनेत एप्रिल, 2023 मध्ये तिच्या कॅप्टिव्ह खाणींमधून कोळसा उत्पादनात 148% वाढ नोंदवली आहे. एनटीपीसी ने एप्रिल 2022 च्या 1.11 दशलक्ष मेट्रिक टनच्या (एमएमटी) तुलनेत एप्रिल 2023 महिन्यात 2.75 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा उत्पादन नोंदवले आहे.