सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला महिला कर्मचार्यांसाठी मासिकपाळीच्या रजेच्या तरतुदीसाठी धोरण तयार करण्याबाबत विचार करण्यासाठी भागधारकांशी सल्लामसलत करण्याचे निर्देश दिले आहेत. मासिकपाळीदरम्यान महिला कर्मचार्यांसाठी रजेची तरतूद असावी, असे धोरण तयार करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका वकील शैलेंद्र त्रिपाठी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे.बी. पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
Read More
दरवर्षी दि. २८ मे रोजी साजर्या होणार्या ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिना’निमित्त किशोरी विकास प्रकल्प ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’तर्फे दि. १४ मे रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच मातृदिनाचे औचित्य साधून या स्पर्धेची प्राथमिक व अंतिम फेरी जिल्हास्तरावर घेण्यात आली. या स्पर्धेसाठी मुंबई, रायगड, पालघर, नवी मुंबई आणि ठाणे अशा विभागांतून एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच ही स्पर्धा १२-१८ अशा वयोगटाची गट क्र. १ व १९-२५ आणि २५च्या पुढे असा दुसरा गट, अशा दोन गटांमध्ये झाली.
ठाणे महानगरपालिका आणि ‘म्यूज फाऊंडेशन’ यांनी एकत्रितपणे ठाणे शहरात पहिल्या 'मासिक पाळीच्या खोली'चे अनावरण केले. महिलांना त्यांच्या मासिक पाळीमध्ये सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे अत्यंत अवघड जाते. त्यासाठी अशा स्वतंत्र मासिक पाळीच्या खोलीची संकल्पना उदयास आली.
गावातील गरीब महिला-मुलींच्या निरोगी आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स पुरविणाऱ्या सुहाना मोहन या तरुणीची ही प्रेरणादायी कहाणी...
होमियोपॅथीक तपासणीमध्ये स्त्रीरुग्णांची माहिती घेत असताना ऋतुप्राप्तीपासूनते रजोनिवृत्तीपर्यंतच्या मोठ्या कालावधीची माहिती घेतली जाते. अर्थात, रुग्णाच्या वयानुसार, लक्षणानुसार व तक्रारीनुसारच ही माहिती घेतली जाते.
स्रियांच्या शारीरिक शंका, गरजा, अस्तित्व, वेदना, भावना यासाठी स्रिया इमोजीकडे आपले पणाने पाहत आहेत. याच मार्च महिन्यात जागतिक पातळीवर स्त्रीयांबद्दल सोशल मीडियावर पिरियड 'इमोजी' चा लोगो अनावरीत होत आहे.
आज आपण गर्भाची दर महिन्याला होणारी वाढ, मासानुमासिक वृद्धी याबद्दल जाणून घेऊया. आयुर्वेदशास्त्राने गर्भाची वाढ दर महिन्यात कशी होते, हे सांगून ठेवले आहे. त्याचबरोबर मातेच्या शरीरातलेही बदल सांगितले आहेत. आधी गर्भाची वाढ बघूया.