निवडणूकीच्या आधी धनंजय मुंडे आणि कराडने माझी भेट घेतली होती असे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी गुरुवार, ३० जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले.
आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर मनोज जरांगे उपोषणाला बसले असून मराठा समाजाला फसवून ही उपोषणाची नौटंकी कशासाठी? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत जरांगेंच्या उपोषणावर टीका केली.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासांठी मनोज जरांगेंनी शनिवार, २५ जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. यावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली.
(Beed) बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते २८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर तीन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठवाडा जातीयवादी नाही, मराठा-ओबीसी-अन्य जाती अशी फूट पाडून राजकीय पोळ्या भाजणार्या नेत्यांना व पक्षांना मराठवाडा थारा देत नाही, याचे प्रत्यंतर दाखवून देणारी 2024 सालची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. निवडणुकीच्या प्रारंभी निश्चित करण्याचा प्रयत्न झालेला ‘जरांगे फॅक्टर’ पूर्णतः निष्प्रभ करत संपूर्ण समाजाने एकजुटीने मतदान केले आणि जातीभेदांच्या भिंती उभारण्याचा जाणत्या नेत्यांचा प्रयत्न पूर्णतः हाणून पाडला. ‘जिहादी’ मानसिकतेला खतपाणी घालून आणि हिंदू समाजात फूट पाडून यश मिळविण्याचा लोकसभ
राज्यात सर्वत्र निवडणूकीचे वातावरण असताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिरसाटांनी माध्यमांशी संवाद साधला.
Sharad Pawar राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. याचपार्श्वभूमीवर मराठा समाजाला मराठा आरक्षणाचे आमिष दाखवून मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता अशातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सखल हिंदू समाजाला डोळे उघडून सध्या सुरू असलेले राजकारण उघड्या डोळ्यांनी बघा असे आवाहन आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.
"Manoj Jarange Patil यांनी निवडणुकीत उमेदवार न देता पाडापाडी करणार असल्याची घोषणा केली आहे. आमचा त्यांना सवाल आहे की ते दाऊदशी संबंधित असलेल्या पक्षाचे उमेदवार पाडणार आहेत की त्यांना जिंकवणार आहेत", असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मनोज जरांगे यांना केला आहे.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी २५ जागा लढवण्याची घोषणा केली होती. परंतू, मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी न आल्याचे कारण देत त्यांनी सोमवारी सकाळी निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
तुतारीची सुपारी घेऊन मनोज जरांगेंनी आजचा निर्णय जाहीर केला असून तो महाविकास आघाडीला मदत करण्याच्या दृष्टीने घेतला आहे, असा घणाघात भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली. यावर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
मुंबई : ( Pravin Darekar ) काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यांची बैठक झाली. दोन-तीन अपवाद वगळले तर सर्व ठिकाणची बंडखोरी क्षमतेय. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. आम्ही तिन्ही पक्ष लढू, जिंकू आणि महाराष्ट्रावर महायुतीचा झेंडा फडकवू, असा विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकरांनी व्यक्त केला. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
मुंबई : ( Manoj Jarange ) जरांगे केवळ आता मराठा समाजाचा चेहरा होऊ पाहत नाही. मराठा समाजाने त्यांना नाव, लौकिक, चेहरा दिला. परंतु त्यांच्यात राजकारणाचे वारं भिनलेय, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोडले आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या भुमिका मराठा समाजासाठी ज्या पहिल्या होत्या त्या आता राहिलेल्या नाहीत. मराठा समाज ताकदीने महायुतीच्या मागे उभा राहील. निकालातून ते दिसून येईल, असा ठाम विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
Manoj Jarange मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डाचे सज्जद नेमानी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी भेट घेतली. येत्या विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटील यांनी सज्जद नेमानी यांची भेट घेत मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Manoj Jarange विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरल्याची मुदत संपली असून मैदानात कुणाचे किती उमेदवार आहे यांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. अशातच आता दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे विविध धर्मगुरूंशी गुरूवारी चर्चा करणार आहेत. यामुळे मनोज जरांगेंच्या या चर्चेत नेमकं काय बोलणार हे महत्त्वाचे आहे.
( Manoj Jarange On Assembly Elections 2024 ) राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्गा सतत चर्चेत राहिला आहे. यासंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजवर अनेक उपोषणे व आंदोलने केली आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने यावर कोणताही ठाम निर्णय वा भूमिका घेतलेली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच मनोज जरांगे यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी
( Pravin Darekar )“सगळ्या आंदोलनातून मनोज जरांगे भरकटल्यासारखे वाटत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल, असे वाटले होते. परंतु, मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसत आहेत. हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे त्यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल, तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावे,” असे आव्हान भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीमागचं कारण काय आणि यावेळी त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही.
मराठा समाजाला देणारा कोण आणि फसवणारा कोण? याबद्दल मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
एकीकडे विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. सोमवारी मध्यरात्री त्यांनी ही भेट घेतली असून त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही.
मराठवाड्यात दरवर्षी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. परंतू, यावर्षी पहिल्यांदाच इथे दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. पंकजा मुंडेंसोबतच मनोज जरांगेंदेखील दसरा मेळावा घेणार आहेत. दरम्यान, या दसरा मेळव्यात कोण काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काहीजण कशाकशासाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी भिजू, अशी टीका मनोज जरांगेंनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने मनोज जरांगे यांचा पहिल्यांदाच बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणूकीत रोहित पवार, राजेश टोपेंसह ५० उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे, असं विधान ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही मतदान का करायचं? असा सवालही त्यांनी केला आहे.
मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतात, हे स्पष्ट होईल, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागांबद्दलही भाष्य केले.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. दरम्यान, काहीही न खाल्ल्याने त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मनोज जरांगेंनी बुधवारी आपले उपोषण स्थगित केले. यावर रोज मरे त्याला कोण रडे, ते सारखेच उपोषण करतात, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच हिंमत असेल तर विधानसभेला २८८ जागा लढा, असे आवाहनही त्यांनी दिले.
स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे मनोज जरांगेंच्या भेटीला गेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं असून आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, आता छत्रपती संभाजीराजे हे जरांगेंच्या भेटीसाठी अंतवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी होण्याची चर्चा सुरु आहे. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष मिळून ही तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते. दरम्यान, या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंना घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे राजू शेट्टींनी म्हटले आहे. त्यांनाटीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
मनोज जरांगेंनी सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंनी त्यांच्याशी संवाद साधला.
संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो. त्यांनी जरांगेंना मराठा आरक्षण पाठिंब्याचं पत्र लिहून द्यावं, असं आव्हान आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे. सांगलीतील शिराळा येथे रयत क्रांती कार्यालयाचे उद्धाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक आणि लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते. पण राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी त्यांना पुन्हा तिथे आणून बसवलं, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळांनी केला आहे. तसेच जरांगेंसारख्या माणसांना आम्ही भीक घालत नाही, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी विचारला आहे. राहूल गांधींनी अमेरिकेत आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केले होते. यावरून प्रसाद लाड यांनी जरांगेंना प्रश्न विचारला.
मनोज जरांगेंच्या विरोधात महाराष्ट्रात एक नकारात्मक लाट निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. अहंकारातून बाहेर यायला तयार नाहीत, असेही ते म्हणाले. त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
आम्ही १० टक्के आरक्षण दिल्यावर ते रद्द होण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, याचा मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या १६ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
हिंमत असेल तर चर्चेला या आणि देवेंद्र फडणवीसांच्या चूका दाखवा, असे थेट आव्हान भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना दिले आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस असल्याचीही टीका केली. जरांगेंकडून वारंवार फडणवीसांवर करण्यात येणाऱ्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
महाविकास आघाडी आणि जरांगे हे दोघेही एकालाच टार्गेट करत आहेत. यातून त्यामागची भावना स्पष्ट दिसत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. टीव्ही ९ मराठीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
काळजी करू नका, छगन भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला.
माझा करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वर करु शकतो, असं चोख प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिलं आहे. जरांगेंनी नाशिकमध्ये भुजबळांचा कार्यक्रम करणार, असा इशारा दिला होता. यावर आता भुजबळांनी प्रत्तुत्तर दिले.
मनोज जरांगे आता एकटे पडत आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय भाषा टाळायला हवी, असा सल्ला भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. तसेच मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा अजिबात आवडत नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत संभाजीराजेंनी दिले आहेत. तसेच महाराष्ट्रात स्वराज्य पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
२८८ सोडा मनोज जरांगे विधानसभेत एकाही जागेवर निवडणूक लढणार नाहीत, असे वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केले आहे. तसेच जरांगेंच्या शांतता रॅलीला आमचा विरोध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार हे ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेने पाहत नाहीत. परंतू, मनोज जरांगेंना त्यांचा पडद्यामागून पाठिंबा आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत तुम्ही का गेले नव्हते? असा सवालही त्यांनी केला आहे.
आज मनोज जरांगेंची भाषा ही राजकीय नेत्याचीच बनली आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. तसेच जर राजकीय भाषा बोलायची असल्यास त्यांना राजकीय उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
विधानसभा निवडणूकीसाठी मराठा समाजातून अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. तसेच आपल्याला पारदर्शी चेहरा द्यायचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगेंनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून ते सर्व २८८ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा समाजासाठी अहोरात्र काम करणारे आम्ही आहोत. तरुण-तरुणींचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत आम्ही सातत्याने आघाडीवर राहिलो. मराठा समाजाच्या आंदोलनात महत्वाच्या भुमिका आम्ही निभावल्या. हे समाजाच्याप्रती असणाऱ्या प्रेमापोटी होते. ती माणसं कसे काय षडयंत्र करणार, असे चोख प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जरांगेंना दिले आहे. दरेकर म्हणाले की, जरांगे यांची रॅली शांतता रॅली आहे की समाजात द्वेष पसरवणारी रॅली आहे.
मराठा समाजाची लोकं सगळ्या पक्षांत नेतृत्व करताहेत. दोन-चार अपवाद वगळले तर या महाराष्ट्राचे नेतृत्वच मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेले आहे. आता प्रत्येक जात मोठी की पक्ष मोठा अशा प्रकारचे समाजविघातक वक्तव्य जरांगेंनी करू नये, असा मोलाचा सल्ला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, पक्ष मोठा की बाप यापेक्षा आंदोलनाचा बाप हा मराठा समाज आहे. जो मराठा समाज सर्व पक्षांत,
पावसात भिजा नाहीतर उन्हात झोपा, आम्ही निवडून देणार नाहीत, अशी टीका मनोज जरांगेंनी शरद पवारांवर केली आहे. बुधवारी सोलापूर येथे मनोज जरांगेंची शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
राज ठाकरे माझी भेट घेणार ही त्यांची पळवाट होती. ते कधीही मला भेटायला येणार नाहीत, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. राज ठाकरेंनी आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली होती. यावर त्यांनी आपण मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले होते.
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पण मनोज जरांगेंचं समाधान होत नाही. त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केले आहे. तसेच मनोज जरांगेंनी खुशाल २८८ जागांवर उमेदवार उभे करावे, असेही ते म्हणाले.