सातारा : ( Eknath Shinde ) “महायुतीला बहुमत मिळालेले असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकायला काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. “कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही,” असे ते म्हणाले.
Read More
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.यासंदर्भात आमदार शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे जलसंधारणाचे काम केले जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्या लोकांनी अपात्रतेची काळजी करावी अशी टीका त्यांनी महेश शिंदे यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विधीमंडळ पायऱ्यांवर झालेल्या घोषणाबाजीत अभूतपूर्व राडा झाला. गेल्या काही दिवसांपासून अधिवेशनादरम्यान विरोधक आंदोलन करत होते. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांनी खुद्द मातोश्रीविरोधातच घोषणाबाजी केली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महेश शिंदे यांनी विधानभवन परिसरामध्ये राज्य सरकारच्या गलथान कारभाराबाबत फलक घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून मूक आंदोलन केले.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकीनंतर पक्षातील नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येण्यास सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहेत. सातार्यातील पक्षाची ताकद खिळखिळी होत असल्याचे जाणवताच शरद पवार यांनी आता नव्याने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.