'महापारेषण'च्या मुख्य कार्यालयात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस संचालक (संचलन) संदीप कलंत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (महापारेषण) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.
Read More
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) चे मुख्य अभियंता (पारेषण) कादरी सय्यद नसीर यांनी इलेक्ट्रिकल पावर सिस्टम या विषयात पदव्युत्तर पदवी एम ई (ईपीएस) छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राप्त केली.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण ऑस्ट्रियाच्या दूतावासाचे व्यापार उपायुक्त बर्नर्ड ऍंडरसन यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर, ब्रॅंडिंग, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे व जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प
देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषण आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाली आहे. महापारेषणच्या सद्यस्थितीतील प्रकल्पांची माहिती, संचलन व कार्यक्रमांची अचूक, अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून महापारेषणच्या ईआरपी-आयटी विभागाने संचलन व सुव्यवस्था विभागाकरिता तयार केलेल्या एसओआर (शेड्युल ऑफ रेट), महापारेषणचे अद्ययावत संकेतस्थळ तसेच अधिकारी वर्गाकरिता ड्रोन वापराबाबत डॅशबोर्डचे अनावरण महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले.
``ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे वीज ही अत्यावश्यक व मूलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करताना मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे``, असे मत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले.
मुंबई : महाराष्ट्र शासनाची विद्युत उपयोगिता कंपनी महापारेषण या वीजनिर्मिती कंपनीत लवकरच विविध पदांकरिता नोकरभरती करण्यात येणार असून या कंपनीमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. शासनाच्या महापारेषण कंपनीमध्ये विविध पदांच्या तब्बल ३१२९ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी http://www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महाराष्ट्र : महापारेषण कंपनीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे परिमंडळात दि.२१ जुन २०२३ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे क्षेत्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
मुंबई : थकीत देणी देण्यासाठी २९ हजार २३० कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज घेण्यास महावितरण कंपनीला शासन हमी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते विलंब अदायगी अधिभार व संबंधित बाबी (Late Payment Surcharge and Related Matters ) नियम २०२२" अंतर्गत महावितरण कंपनीस कर्ज घेण्यासाठी ही शासन हमी देण्यात आली आहे.
ऊर्जा खात्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले विश्वास पाठक यांची महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी अंतर्गत असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांवर स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झाली आहे
मा.ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यात महापारेषण कंपनीच्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत नाशिक परिमंडळ मार्फत उभारण्यात येणार्या २२० के.व्ही.उपकेंद्र केकतनिंभोरा, ता.जामनेर, २२० के.व्ही.उपकेंद्र विरोदा ता.यावल, १३२ के.व्ही.उपकेंद्र कर्की ता.मुक्ताईनगर व १३२ के.व्ही. उपकेंद्र कोथळी ता.भडगावचे भूमिपूजन करण्यात आले.