( inspection of Nagpur mining areas Minister Bawankule ) नागपूर जिल्ह्यातील खदानी तसेच खाण पट्ट्यात घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “मी स्वतः खाणपट्ट्यांची तपासणी करेन आणि अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करेन,” असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मंत्रालयात आयोजित बैठकीत सुरगाव येथील ३४४ एकर शासकीय जागेचा उपयोग आणि खाणपट्ट्यांबाबत चर्चा झाली. आमदार राजू पारवे यावेळी उपस्थित होते.
Read More
(Chief Minister Fadnavis addressed at the Tiranga Yatra organized in Mumbai) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ, मुंबई येथे आयोजित तिरंगा यात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
( Metro is great make travel comfortable for Mumbaikars Chief Minister Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिरा-भाईंदर, ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व) पर्यंत मेट्रोची तांत्रिक चाचणी' संपन्न झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्ग-9च्या मार्गिकेची तांत्रिक पाहणी केली व मेट्रोने प्रवास केला
(Minister Rajnath Singh warning ) विशेष प्रतिनिधी पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत, हे आता जगाने बघितले आहे. त्यामुळे पाकची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएइए) देखरेखीखाली येणे आवश्यक आहे, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जगाला दिला आहे.
( Minister Nitesh Rane on Maharashtra Maritime Board fund ) महाराष्ट्र सागरी मंडळाने त्या प्राप्त होणारा शंभर टक्के निधी खर्चंकरवा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. महाराष्ट्र सागरी मंडळ येथे मंगळवार दि.१३ रोजी मंडळाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
( minister bawankule on Nagpur health services ) नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पदमान्यता, नवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जुन्या दवाखान्यांचे श्रेणीवर्धन करणे आवश्यक होते. असे अनेक निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले. तर कामठी येथे शंभर खाट्यांच्या रुग्णालयासाठी सहा एकर जमीन उपलब्ध करुन देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
( Buddha thoughts of world peace to every person Minister Ramdas Athawale ) शांतीशिवाय विकास नाही; न्याय नाही; जीवनात आनंद नाही. भगवान बुद्धांनी दिलेला विश्वशांतीचा मानवतेचा बुद्धविचार माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे.जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांच्या विचारांची गरज आहे असे सांगत रामदास आठवले यांनी जगभरातील बौद्धांना बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ हेच भारताचे धोरण असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, जेथे जेथे दहशतवाद असेल; तेथे तेथे त्याच्या मुळावर असाच घाव घातला जाईल. पाकिस्तानसोबच चर्चा केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रास संबोधित करून ‘ऑपरेशन सिंदूर’चा पराक्रम देशातील माता – भगिनींना समर्पित केला.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू – काश्मीरमधील (पीओजेके) जवळपास १०० दहशतवादी ठार मारले आहेत. भारताच्या प्रत्युत्तरात जवळपास ३५ ते ४० पाक सैनिकांचाही खात्मा झाला आहे. भारतीय शस्त्रास्त्रांनी थेट इस्लामाबादपर्यंत धडक मारली होती. त्याचवेळी भारतीय नौदलाने आपल्या कराचीस आपल्या लक्ष्यावर ठेवले होते. पुढेही पाकच्या कोणत्याही कृत्यास याहून भयानक उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही भारतीय सैन्यदलांनी रविवारी सायंकाळी पत्रकारपरिषदेत दिले आहे
भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम येथील हत्याकांडाविरोधात जोरदार प्रत्युत्तर दिलेय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे देखील घाबरल्याचे पाहायला मिलतेय. त्यांनी आपल्या भावाला, म्हणजेच सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतासोबत चर्चा करून मतभेद मिटविण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.
( Bengal Club donates Rs 3 lakhs to Chief Minister Relief Fund ) शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबच्या वतीने नुकताच वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात दोन दिवसीय ‘बंगा संस्कृती उत्सव – २०२५’ संपन्न झाला. या सांस्कृतिक महोत्सवातून जमा झालेला निधी समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगात आणावा, या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तीन लाख रुपये देणगी स्वरूपात देण्यात आले आहेत. देणगीचा धनादेश समाजसेवा अधिक्षक श्रीकांत केकान यांना सुपूर्द करण्यात आला.
( Minister Mangal Prabhat Lodha on Startup ) एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जात होत. देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्ट अप ही लोकचळवळ व्हायला हवी आज सहभागी झालेल्या कार्यक्रमात शासनाच्या सहा विभागांनी र्स्टाटअप्स सोबत काम करण्यास अनुमती दर्शवली आहे असे प्रतिपादन, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित "टेक वारी" कार्यक्रमात केले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी तयारीचा आढावा घेतला.
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा लागला. दुर्दैवाने राजकीय मजबुरीपोटी त्यावरही टीका करणारे बरेच ‘राज’कीय नेते आज दिसत आहेत.
( Minister Bawankule on Nagpur Vidhan Bhavan ) नागपूर येथील शासकीय मुद्रणालयाच्या तसेच शहर पुरवठा कार्यालयाच्या काही जागा नागपूर विधानसभेच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असून, या जागांचे हस्तांतरण करावे. दोन्ही कार्यालयांनी पर्यायी जागा शोधून प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने त्याला अंतिम स्वरूप मिळेल. असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंताजनक ठरलेल्या अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सज्जता तसेच आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग यांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण ‘टीम इंडीया’ने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला चकवा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडत पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठोकले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले
( minister ramdas athawale on operation sindoor ) ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची तळे नेमकी हेरून उध्वस्त केली.दहशतवाद नेस्तनाबूत करण्यासाठी सिन्दुर ऑपरेशन महत्वाचे ठरले आहे.या अतुलनीय कामगिरी बद्दल भारतीय सैन्याचा आम्हाला कायम अभिमान असून ऑपरेशन सिंदूर द्वारे सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद आहे.
दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी कमी होत नसेल, तर त्या देशाचा सर्वनाश अटळ आहे. कारण, भारताचे नेतृत्व मोदींच्या हाती आहे, जे अशा देशविरोधी गोष्टी कदापि विसरणार नाहीत. काल ‘चुटकीभर सिंदूर’ची खरी किंमत काय, ती पाकिस्तानला भारताने दाखवून दिली!
‘पाकिस्तानी दहशतवादी आम्हाला मारत आहेत, तुम्ही काही तरी करा,’ असे जागतिक व्यासपीठावर रडगाणे गाणारे आपले नेतृत्व होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले की, तो आता इतिहास झालेला आहे आणि आता चिमूटभर लाल सिंदूरचा वचपा असंख्य दहशतवाद्यांची मुंडकी छाटून घेतला जाईल, हे न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले.
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य झाले. दहशतवादाची निर्यात करण्यापासून आजवर पाकिस्तानला रोखले असते, तर हा तणाव निर्माणच झाला नसता, ही गोष्ट संयुक्त राष्ट्र किंवा ‘युरोपियन युनियन’ सोयीस्कररित्या विसरतात. भारताला शहाजोग सल्ले देण्याऐवजी युरोपीय देश रशिया-युक्रेन युद्धावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा
( minister pratap sarnaik on Fuel ban for polluting vehicles ) तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून आपण सारे याच क्षणाची वाट पाहत होतो. हा निर्णय लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक नवीन माहिती पुढे आली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत त्यांच्या दोन्ही बाळांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत २४ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
Waves conference will shape the future of the entertainment world s jaishankar “जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद’ ही माध्यम आणि मनोरंजनविश्वाच्या भविष्याची रुपरेषा ठरवणार आहे. सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी केले.
मलाही अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावे वाटते, पण कुठे जतमंय? अशी मिश्कील टिपण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, ३ मे रोजी केली. मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल लॉरेन्को यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मे रोजी केरळमध्ये ८ हजार ९०० कोटी रुपयांच्या 'विझिंजम आंतरराष्ट्रीय खोल पाण्याचे बहुउद्देशीय बंदर'चे उद्घाटन केले. हे देशातील पहिले समर्पित कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे, जे विकसनशील भारताच्या सागरी क्षेत्रात होत असलेल्या वेगवान प्रगतीचे प्रतिनिधित्व करते.
"भारताच्या प्रत्येक गल्लीत एक कथा दडलेली आहे. आमच्या पर्वतांमध्ये संगीत आहे, येथील नद्या कायम गुणगुणत असतात. भारताकडे सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ भारतीय परंपरेत आहे. आमच्याकडे जगाला देण्यासाठी हर तऱ्हेचा कॉन्टेन्ट (आशय) आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड' हे स्वप्न साकार करण्याची", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हज'च्या व्यासपीठावरून जगभरातील गुंतवणूकदारांना साद घातली.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात 'कॉल हिंदू' नामक एका खाजगी डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन करण्यात आले. याद्वारे हिंदू समाजासाठी रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाईन विवाह संस्था यासारख्या विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते विशाल दुराफे यांच्या संकल्पनेतून सदर डिजिटल व्यासपीठ साकारत असून, आज त्याच्या वेबसाईटचे उदघाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. आज या वेबसाईटच्या माध्यमातून कॉल हिंदू जॉब्स या सेवेची सुरुवात करण्यात आली असून हिंद
(Chief Minister releases Revenue Report ) महसूल विभागाच्या 'महसूलपत्र ' या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री व अधिकारी उपस्थित होते.
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. निवडणूक निकाल पाहता, विद्यमान पंतप्रधान मार्क कार्नी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत खलिस्तानी जगमीत सिंग याचा पराभव झाला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे.
भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दि. १ ते ४ मे २०२५ दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे दि. १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "एक पेड़ माँ के नाम" अभियानाची सुरुवात ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित सूरू केली. "एक पेड माँ के नाम" हा एक प्रयत्न आहे जो आपल्या मातृभूमी आणि निसर्गाबद्दलचा आपला आदर आणि समर्पण दर्शवितो.
पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हिंसेचा चेहरा उघड करतो. निर्दोष पर्यटकांवर केलेला हा हल्ला भारताच्या शांततेच्या प्रयत्नांवरचा आघात आहे. या हल्ल्याने काश्मीरच्या पर्यटन व्यवस्था आणि स्थानिक अर्थचक्रालाही बाधा उत्पन्न केली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू पाणी करार स्थगितीचा घेतलेला निर्णय म्हणजे, पाकिस्तानच्या उद्दामपणाला प्रत्यक्ष कृतीने उत्तर देण्याची वेळ आल्याचे चिन्ह आहे. दहशतवादाला आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक पातळीवर तोडगा काढण्याची ही सुरुवात आहे. या
दहशतवाद्यांना धुळीस मिळवण्याची वेळ आता आली आहे. भारत प्रत्येक दहशतवाद्याला शोधून काढेल आणि धडा शिकवेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमधील मधुबनीमधून दिली आहे. राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलचे अनावरण देखील केले.
( Pahalgam terrorist attack Former MLA Narendra Pawar demand to Union Railway Minister Ashwini Vaishnav ) कश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी अतुल मोने हे मध्य रेल्वेमध्ये कामाला होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोने यांच्या पत्नीला नोकरी देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कक्षामार्फत नाशिकमधील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत, अमृत भारत एक्स्प्रेस आणि नमो भारत रॅपिड ट्रेनला आधुनिक भारतीय रेल्वेची त्रिवेणी म्हणून संबोधले आहे. या त्रिवेणीतील वंदे भारत आधीच संचलनात आहेत, तर आता नवीन गाड्या बिहारमधून मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारमधील नवे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात सहरसा-लोकमान्य टिळक दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी यांचा विचार करुन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (Nashik Ring Road) प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी दिले. तसेच नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
(Chief Minister Market Committee Scheme) वर्षानुवर्षे बाजारसमित्या ताब्यात ठेवून एकाधिकारशाही गाजवणार्यांना फडणवीस सरकारने दणका दिला आहे. तळकोकणासह 65 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजारसमित्यांना मंजुरी देत प्रस्थापितांच्या वर्चस्ववादाला शह देण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री बाजार समिती योजने’अंतर्गत प्रत्येक तालुक्यात बाजारसमित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा हा महत्त्वाचा भाग आहे.