(World's Largest Dencentralized Solar Power Project) शेतकर्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.
Read More
(Green Energy City)डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आता सोलार पॉवर युनिटद्वारे वीजनिर्मिती केली जाणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १४ गृहसंकुलांना सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या हस्ते सोलार पॅनलवाटप करण्यात आले. त्यामुळे आता राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी बिरूदावली मिळविलेल्या डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महावितरणकडून शेतीसाठी सौर ऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार असून यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा मिळणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठी बचत होऊन सर्वच वीज ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल.
जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौरऊर्जा उत्पादक बनला आहे. भारताने ८ वर्षात ६ स्थानांनी झेप घेत ही कामगिरी केली आहे. सौरऊर्जेच्या बाबतीत भारताने गेल्या काही वर्षांत खूप काम केले आहे. भारत आता पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांऐवजी अक्षय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती करण्याची क्षमता वाढवत आहे.
राम मंदिर सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जा निर्मितीवर सरकारने विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट केले होते. वाढत्या ऊर्जेची मागणी व गरज लक्षात घेता सोलार रुफटॉप योजनेवर आपले लक्ष केंद्रित केले होते. यासाठी सरकारने ' प्रधानमंत्री सर्वोदय योजना ' सुरू करत १ कोटी कुटुंबांना रुफटॉप सौर उर्जा देण्याचे ठरवले आहे. या प्रयत्नांना जोड देण्यासाठी एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) ने राजस्थानात ७० मेगावॉटचा पहिलावहिला सौर उर्जा निर्मितीसाठी कंबर कसली आहे.
मुंबई : राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली असून अधिकाधिक संस्थांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ श्कोल्झ नुकतेच दोन दिवसीय भारत दौर्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, रशिया-युक्रेन युद्ध यांसारख्या मुद्द्यांवर त्यांची पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा झाली. श्कोल्झ यांनी आपल्या दौर्यात भारतीय ‘आयटीयन्स’ना जर्मनीत नोकरीसाठी चक्क ‘रेड कॉर्पेट’च अंथरले. त्याविषयी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या उच्च कार्यक्षमतेच्या ‘सोलर पीव्ही मॉड्यूल्स’विषयक राष्ट्रीय कार्यक्रमावरील उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या (पीएलआय) अंमलबजावणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारतर्फे या योजनेच्या अंमलबजावणीकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जात आहे.
काराव-गडब या ग्रामपंचायत हद्दीतली डोंगरावर वसलेली 'सुळे वाडी' गेल्या चार पिढ्यांपासून मुलभूत सुविधांपासून पासुन वंचित आहे. संपूर्ण जग एकविसाव्या शतकात प्रगतीची पावले अतिशय वेगात टाकत आहे. परंतु 'सुळे वाडी' मात्र मुलभूत सुविधांपासून मात्र अजूनही वंचित होते.
भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी सोलार ऊर्जेचा वापर गरजेचा आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार अक्षय ऊर्जा सेवा कंपनी स्थापन केल्यास, यंत्रमाग व्यावसायिकांना सध्याच्या वीजदरापेक्षा स्वस्त वीज उपलब्ध होईल, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांना देण्यात आली आहे.
सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच ग्लेफिन केमिकल्स प्रा. लि यांच्या सौजन्याने खानिवडे, सकवार व भारोळ या गावातील आठ आदिवासी पाड्यांमध्ये यावर्षीपासून समुत्कर्ष अभ्यासिका सुरु करण्यात आल्या आहेत.
भारत-फ्रांसच्या निमंत्रणावरूनच या तीन दिवसीय परिषदेसाठी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि श्रीलंकेसह एकूण २३ देशांचे राष्ट्राध्यक्ष, १० देशांचे मंत्री आणि तब्बल १२१ देशांचे प्रतिनिधी आज नवी दिल्लीमध्ये उपस्थित झाले आहे.