महाशिवरात्रीचा शाब्दिक अर्थ "भगवान शिवाची महान रात्र" किंवा "शिवाची रात्र" असा होतो. भगवान शिव हे शुद्ध आणि दैवी गुण पुनःनिर्मितीसाठी मार्ग तयार करणारे आणि जुन्या आणि अपवित्राचा नाश करणारे आहेत. आपला अहंकार, आसक्ती आणि अज्ञानावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान शिव आपली जागरुकता वाढवतात. अनेकांना भगवान शिवाच्या संहारक शक्तीची भीती वाटते, परंतु पुनरुत्पादनाच्या उद्देशाने तो विनाश आहे. मृत्यूशिवाय जीवन पुन्हा सुरू होऊ शकत नाही. जुन्या वाईट सवयी, आसक्ती आणि अहंकार नष्ट केल्याशिवाय आपण ईश्वरप्राप्तीच्या दिशेने प्रगती
Read More
आपतत्वाचे आराध्यदैवत भगवान शिवशंकर असून त्यांचा वर्ण शुभ्रच आहे. शंकराची पत्नी गौरी म्हणजे पार्वती हीसुद्धा गौरच आहे. पार्श्वभूमीतील हिमालय, शंख, नंदी, गंगा आणि चंद्र हे सारेच शुभ्र कांतिमान! आपचे व्यक्त स्वरुप शुभ्र आहे. म्हणूनच भगवान शंकराला पांढरी फुले वाहतात. भगवान शिव संगीताचे आदिदैवत मानले गेले आहेत, त्यांनी आपल्या एकेका मुखातून मिळून पाच स्वर दिले असून, पार्वतीने सहावा स्वर दिला, असे शास्त्रात वर्णन आहे.
प्रत्येक स्वराला वर्ण का असतो? याचेही एक शास्त्र आहे. काचेच्या भिंगातून सूर्यकिरणे धाडल्यास पीशंग वर्ण आतल्या बाजूला तर जांभळा वर्ण पट्टीच्या बाह्यांगाकडे धाव घेतो. दीर्घ कंपन लहरींचे स्वर बाह्यांगाकडे तर लघुकंपनलहरीचे स्वर अंतरंगाकडे वळतात. पीशंग वर्णाचा स्वर षड्जाला लागून तर नीलवर्णी धैवत षड्जाचे दूर आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे धाव घेणारा निषाद भगवान श्रीकृष्णाच्या जांभळ्या वर्णासारखा श्यामल वर्णाचा आहे. शुभ्रातून भासमान होणार्या षड्जाची गती श्यामवर्णाच्या निषादात होते. निषादानंतर पुन्हा षड्ज जन्म घेतो.
यावर्षी मंगळवार, दि. १८ जुलैपासून ते बुधवार, दि. १६ ऑगस्टपर्यंत अधिक श्रावणमास असेल. अधिकमासाला ‘पुरुषोत्तममास‘, ‘मलमास’ किंवा ‘धोंड्या महिना’ असेही म्हणतात. अधिक श्रावणमासानंतर गुरुवार, दि. १७ ऑगस्ट ते शुक्रवार, दि. १५ सप्टेंबरपर्यंत ‘निज श्रावणमास’ येणार आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव-व्रते ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करावयाची आहेत. त्यानिमित्ताने हा अधिकमास कसा व का येतो? तसेच, अधिकमासात काय करावयाचे असते, याचीही माहिती आजच्या ल
भोपाळच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ३२ किमी अंतरावर बेतवा नदीच्या उजव्या बाजूला एका उंच टेकडीवर भोजेश्वर मंदिर (भोजपूर मंदिर) वसलेले आहे. हे मंदिर अपूर्ण अवस्थेत आहे, आणि असे का आहे हे कोणालाच माहिती नाही. परंतु, मंदिरात बसवलेले शिवलिंगही अद्वितीय आहे.
आज त्रिपुरारी पौर्णिमा. या रात्री चंद्र तेजस्वी असतो. चंद्र मनाचा कारक आहे. मनावर सुपरिणाम करणारी ही पौर्णिमा असते.
महादेव आणि महादेवाशी संबंधित हिंदु धर्मातील चिन्हसंकेतांचा घेतलेला आढावा...