लोकशाहीत निवडून आलेला आमदार किंवा खासदार हा त्याच्या मतदारसंघातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्यामुळे अमुक एका धर्माची किंवा समाजाची व्यक्ती मंत्रिमंडळात किंवा सभागृहात नसल्याने संबंधित धर्माचे किंवा समाजाचे प्रतिनिधित्व केले जात नाही, हा युक्तिवादच चुकीचा आणि फसवा. गेल्या काही वर्षांपासून भारतीय समाजात जातीपातींवरून आणि धर्म-भाषा यांच्यावरून फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. संबंधित युक्तिवाद हा त्याचाच एक भाग असून, त्याला जोरदार छेद दिला पाहिजे.
Read More
बाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी(शरद पवार गट), काँग्रेस या पक्षांना डिवचण्याची संधी सोडलेली नाही. लोकसभा निवडणुकीत मविआने राज्यात ३० जागांवर विजय मिळविला होता. या घवघवीत यशानंतरदेखील सांगलीतील जागेची चर्चा राज्यात पाहायला मिळाली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी शुक्रवार, दि. २१ जून रोजी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निकालाचे विश्लेषण करण्यात आले. तसेच या निवडणुकीतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
इंग्रजी दैनिक मिड-डे कडून ईव्हीएमवर ५ कॉलमच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला लेख हटविण्यात आला आहे. दरम्यान, ओटीपीद्वारे ईव्हीएम अनलॉक करण्याच्या मुद्द्यावर ‘मिड-डे’ने पसरवलेल्या भ्रामक माहितीवर दैनिकाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून एनडीए तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. इंडी आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली असून यात राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे.
राजकीय अस्पृश्यतेमुळे ज्या भाजपबरोबर आघाडी करण्यासाठी, सहयोगी मिळत नव्हते, त्याच भाजपने आघाडींची सरकारे देखील आपला कार्यकाळ यशस्वी करतात, हा विश्वास देशाला दिला. गेले दशक बहुमताला कौल दिल्यानंतर, जनतेने पुन्हा एकदा आघाडीला कौल दिला आहे. आज याच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर रालोआच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा मांडलेला हा लेखाजोखा...
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून दिल्लीमध्ये भाजपला सातही जागांवर आघाडीवर मिळविता आली आहे. दिल्लीत भाजपने आपचा सुपडासाफ केला असून सर्वच जागांवर निर्णायक आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या बंसुरी स्वराज २५ हजारांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
मध्य प्रदेशात भाजपला सहज विजय मिळविता आला असून सर्वच जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. मध्य प्रदेशातील एकूण २९ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. सर्वच जागांवर सर्वाधिक मताधिक्यावर भाजप उमेदवारांनी आपली जागा राखली आहे.
केरळमधील लोकसभेच्या एकूण २० जागांपैकी केवळ १ जागेवर भाजपला आघाडी मिळविता आला आहे. भाजपच्या सुरेश गोपी यांनी थ्रिसूर येथून तब्बल ७० हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. सुरेश गोपी यांच्याविरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार व्हीएस सुनिलकुमार यांचा पराभव केला आहे.
इंदौर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांचा विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. शंकर लालवानी यांना तब्बल ११ लाख ७५ हजार मते मिळवित आपला गड राखला आहे. दरम्यान, इंदौर लोकसभा मतदारसंघात नोटालादेखील जनतेने पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीमध्ये देशाला नवी दृष्टी दिली आहे. त्याचप्रमाणे पुढील वाटचाल काय असेल, याचा निर्णय इंडी आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
१८ व्या लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांसाठी मतमोजणी सुरू असून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालानुसार एनडीए तिसऱ्यांदा सत्तास्थापन करता येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत.
सलग तिसऱ्यांदा सरकार बनविण्याची अभूतपूर्व कामगिरी भाजपने केली असली, तरी विजयाचा हा आनंद निर्भेळ नाही. भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नव्या सरकारच्या भावी योजनांमध्ये काहीशी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. मोदी यांना बहुमतापासून वंचित ठेवले, याचाच विरोधी पक्षांना आनंद झाला आहे. पण त्यांना जनतेने तिसर्यांदा नाकारले आहे, ही गोष्ट ते विसरतात. या विजयामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कोणते निर्णय घेतले जातात, पाहणे औत्सुक्यपूर्ण होईल.
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल जाहीर झाले असून एनडीए पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे. दरम्यान, राज्यात महायुती विरुध्द मविआ असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. एकूण ४८ जागांपैकी महायुतीला १८ जागांवर विजय मिळविता आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या वतीने राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.
अवघ्या देशाला उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, मंगळवार, दि. ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबईसह राज्यभरातील मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले असून येत्या ४ जूनला निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज समोर येणार आहे. सायंकाळी ६:३० नंतर एक्झिट पोल स्पष्ट होतील. त्यानुसार, लवकरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. एनडीए विरुध्द इंडी आघाडी यांच्यात नेमकी बाजी कोण मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी-सीव्होटर च्या सर्व्हेनुसार राज्यात महायुती व मविआ यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. भाजपला १७ जागा, शिवसेना शिंदे गटाला ०६ जागा तर उबाठा गटाला ०९ जागा, शरद पवार गटाला ०६ जागा व काँग्रेसला राज्यात ०८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पियुष गोयल निवडून येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान आज होणार असून त्यानंतर सायंकाळपासून मतदानोत्तर कल चाचण्याचे (एक्झिट पोल) निकाल विजयाचा अंदाज वर्तवणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार असून त्यासाठीच्या प्रचारतोफा गुरुवारी थंडावल्या आहेत. अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणूक २०२४च्या अंतिम टप्प्यातील मतदान राहिले असतानाच देशाच्या आर्थिक स्थितीबाबत आनंदवार्ता आली आहे. देशाच्या जीडीपी वाढीच्या दराने भारताला आनंदाची बातमी दिली असून मागील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत ७.८ टक्के वेगाने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. येत्या ०४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्याआधीच आर्थिक वार्ता समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर टीव्ही चॅनेल, सोशल व डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस आपले प्रवक्ते पाठवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली असून १ जून रोजी शेवटचे मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होणार असून एकूण ५७ जागांसाठी ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात सत्ता स्थापन करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले, नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जवळपास निश्चित करण्यात आली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडी आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. देशभरात काँग्रेस ४० आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला (सपा) ४ जागा मिळणेही अवघड आहे, असे भाकीत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर, सलेमपूर आणि चंदौली येथे प्रचारसभांना संबोधित केले.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरातील ५८ मतदारसंघामध्ये ५९.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ७८.१४ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. त्याचप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीमध्ये ५५.३८ टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यावेळी देशभरात ५९.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीच्या १ ते ५ टप्प्यांमधील एकूण मतदार, मतदानाची टक्केवारी आणि मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या शनिवारी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या आकडेवारीमध्ये फेरफार शक्यच नसल्याचा पुनरूच्चारही आयोगाने केला आहे.
डोंबिवली एमआयडीसीत बॉलयर स्फोटातील मृतांची संख्या आत्तापर्यंत मृतांचा आकडा ११वर पोहोचला आहे. यावरुन विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांचे चांगलेच कान उपटले आहेत.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुणे पोलीसांच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या असून कारच्या चालकाने सांगितले की, गाडी 'तो'च चालवत होता, त्यामुळे गाडी नेमकी कोण चालवत होता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची माहिती मिळताच विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला फोन केला होता, असे सदर प्रकरणी समोर आले आहे.
उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एका नियंत्रण सुटलेल्या मारुती इको कारने ५ महिलांना चिरडले आहे. या अपघातात आतापर्यंत ४ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक महिला जखमी झाली आहे. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे पूनम पांडे, दिव्या पांडे, सरिता द्विवेदी व ज्योती अशी आहेत.
उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि इंडी आघाडीने आपापली ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी दोन्ही आघाड्यांनी डावपेच आखून विजयाचा दावा केला आहे. पूर्वांचलमध्ये लोकसभेच्या २७ जागा आहेत.
मतदान केंद्रांवरील मतदानाची अंतिम प्रमाणीकृत आकडेवारी प्रकाशित करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. मात्र, तशी मागणी करून मतदान प्रक्रियेविषयी जाणीवपूर्वक शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सध्या देशभरात सुरू आहे. दरम्यान, राज्यात सकाळी ७ वाजल्यापासून आतापर्यंत ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. निवडणुक आयोगाकडून देशभरात मतदानाचा टक्का वाढण्याकरिता जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढावा याकरिता मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
उद्यापर्यंत नाशिकचा उमेदवार जाहीर होणार, असा खुलासा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीमधून अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच नाशिकची जागा शिवसेनेचीच असा दावा शिरसाटांनी केला आहे. शिरसाटांच्या दाव्यानंतर शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
सांगलीतून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी विशाल पाटील अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने सांगलीची जागा लढवावी, याकरिता आ. विश्वजीत कदम यांच्यासह विशाल पाटील यांनी पक्षाकडे आग्रह धरला होता. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासर्व प्रकारावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, विशाल पाटलांवर कारवाई व्हायला हवी होती.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच माढ्यात शिवसेना एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांनी डिजिटल प्रचाराचा धुरळा तर उडवलाच आहे. पण, याशिवाय आता काही उमेदवार चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करू लागले आहेत. निवडणुकांमध्ये प्रचार अधिक प्रभावी करण्यासाठी, भाषांतरासाठी ‘एआय’चा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल अँकरही उमेदवारांसाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील आपल्या भाषणात ’भाषिणी’ या ‘एआय’ टूलचा वापर तामिळ भाषिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला.
समाजवादी पक्षाचा (सपा) बालेकिल्ला असलेल्या मैनपुरी मतदारसंघातून भाजपने उत्तर प्रदेश सरकारचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीरसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. सपा संस्थापक आणि राज्यातील दिग्गज नेते म्हणून दिवंगत मुलायसिंह यादव यांची ओळख होती. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तसेच त्यांनी लोकसभेतही पक्षाचे प्रतिनिधीत्व केले होते.
समाजवादी पक्षाने (सपा) लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरनामा बुधवारी प्रकाशित केला. यामध्ये अग्नीवीर योजना रद्द करण्यासह अन्य आश्वासनांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
"मोदीचा 'रामराम' महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचवा. घराघरातील माता-भगिनी, वडिलधारी माणसे आशीर्वाद देतील. तीच माझ्यासाठी ऊर्जा असेल", असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महायुतीचे रामटेकमधील उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ आयोजित 'विजय संकल्प' सभेत ते बोलत होते.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. राजीव कुमार यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे गुप्तचर संस्थेने सांगतिले आहे. त्यानंतर आता गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार केंद्र सरकारकडून राजीव कुमार यांना 'झेड' सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
केरळमधील तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर यांना कार्यकर्त्यांनी रोखले आहे. बलरामपुर येथे निवडणूक प्रचारादरम्यान थरुर यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आले. यासंदर्भात एक व्हिडीओदेखील सोशल मीडियातून समोर आला आहे. ज्यात कार्यकर्ते त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. यावेळी खा. थरुर यांना कामगारांनी परत जा, तुम्हाला मत नाही, असे सांगितले.
लोकसभा निवडणूक २०२४ आधीच तामिळनाडूतील कोईम्बतूरमधून कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकून ही रक्कम जप्त केल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तातून समोर आले आहे. दरम्यान, याआधी आयकर विभागाकडून ३२ कोटी रुपये जप्त केले आहे.
लोकसभेचा रणसंग्राम तापू लागला आहे. युती-आघाडीचे जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. अशावेळी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढवण्यात आली आहेत. या निवडणुकीत राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विरोधकांनी फक्त परिवाचा विकास केला असून आमचे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे, असा हल्लाबोल पंतप्रधानांनी मोदींनी विरोधकांवर केला आहे. विरोधकांनी मुंबई मेट्रोचे काम थांबविले, समृध्दी महामार्गाला विरोध केला, काँग्रेस पक्ष हा समस्यांची जननी आहे, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार रंगात येऊ लागला असताना, दुसऱ्या टप्प्यातील पाच मतदारसंघामधून २०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक ३७ उमेदवार अमरावतीत, तर सर्वात कमी १५ उमेदवारांनी अकोल्यातून अर्ज दाखल केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर, तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शिट्टी ही निषाणी देण्यात आली आहे. मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने यासंदर्भातील यादी जाहीर केली.
काँग्रेसने भारताच्या नव्हे तर पाकिस्तानच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा बनविला आहे, असा खोचक टोला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षाला लगावला आहे. ते पुढे म्हणाले, "हा तुष्टीकरणाचा जाहीरनामा असून भारतातील नव्हे, तर पाकिस्तानातील निवडणुकांसाठी आहे असे वाटते, काँग्रेसची मानसिकता समाजात फूट पाडून सत्तेत येण्याची आहे, असेही मुख्यमंत्री सरमा यावेळी म्हणाले.
एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात भाजपच्या माधवी लता या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपकडून लोकसभा उमेदवार असलेल्या माधवी लता तेलंगणाबाहेर अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांची मुलाखत पत्रकार रजत शर्मा यांनी इंडिया टीव्ही शो 'आप की अदालत'मध्ये त्यांची मुलाखतदेखील घेतली आहे.
संदेशखाली येथे माता-भगिनींवर झालेले अत्याचार सबंध देशाने पाहिले असून तृणमूल काँग्रेस हा कायदा व संविधान चिरडणारा पक्ष असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपाईगुडी येथे जाहीर सभेत केली आहे. दरम्यान, जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सुरूवातीला जलपाईगुडीत झालेल्या प्रकरणात पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी तृणमूलसह काँग्रेस पक्षावरही जोरदार टीका केली आहे.
यावेळी अण्णाद्रमुकने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (रालोआ) फारकत घेतली आहे. अर्थात, भाजपलादेखील तेच हवे होते. कारण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आपला मजबूत करण्याच्या इराद्याने उतरल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे यंदा तामिळनाडूमध्ये द्रमुक, अण्णाद्रमुक आणि भाजप अशा तीन पक्षांच्या आघाड्या लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत.