( CM rekha gupta CAG report on DTC presented in the Legislative Assembly ) दारू आणि मोहल्ला क्लिनिकनंतर भाजप सरकारने दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) वरील कॅग अहवालही विधानसभेत सोमवारी सादर केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोमवारी दिल्ली विधानसभेत डीटीसी कॅग अहवाल सादर केला.
Read More
विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार
( Devendra Fadnavis on team india ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार विजय मिळवल्याबद्दल सोमवार, १० मार्च रोजी विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी भारतीय संघाचे तोंडभरून कौतुकही केले.
दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अजित पवार, पार्थ पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीसाठी पक्षाचे ११ उमेदवार रिंगणात आहेत.
(Tamil Nadu) विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान झाल्याने तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित न करताच सभागृह सोडले.
(Maharashtra Assembly) गेल्या सहा दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. दि. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २६ फेब्रुवारी पासून मुंबईत होणार आहे.
(Chhagan Bhujbal) मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवले जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपण राज्यसभेवर जाणार नाही, असे भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. "आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारसंघातील मतदारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल", असं भुजबळ म्हणाले आहेत.
मुंबई : "विरोधी पक्षातील नेत्यांनी संवैधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे, हे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे माझी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे, संवैधानिक संस्थांवर असे आरोप करून त्यांचा सन्मान कमी करू नका", असे प्रतिपादन आमदार अॅड. राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी केले.
उल्हासनगर : विधानसभा मतदारसंघ १४१ मध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी ( Kumar Ailani ) हे ८२ हजार, २३१ मते मिळवून विजयी झाले आहेत. निकाल आल्यापासून आमदार आयलानी यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची आमदार कार्यालयात रीघ लागली आहे. या विजयाचे श्रेय शहरातील जनता, भाजप व मित्रपक्षांचे कार्यकर्ते आणि विशेषत: लाडक्या भगिनी व तरुण मतदारांना त्यांनी दिले आहे.
कल्याण : विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस ( Fadanvis ) यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले, तर यावेळी कल्याण पश्चिम आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल फडणवीसांकडून नरेंद्र पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
पुणे : “महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला २०० हून अधिक जागा देत निर्विवाद बहुमत दिले आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेल, असे एक उद्योजक या नात्याने वाटते,” असे सांगत ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार ( Dr. Dhananjay Datar ) यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ऐतिहासिक हार झाली. तर महायुती, भाजपाची त्सुनामी आली. या भगव्या लाटेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला त्यामुळे आता महायुती दिमाखात सत्तेत परत येतेय. 'माझा पक्ष चोरला, माझ्या वडिलांचं नाव चोरलं आता जनताच आम्हाला न्याय देईल. निवडणुकांचं ठरवेल की खरी शिवसेना कोण?' असा आत्मविश्वास बाळगून विधानसभा निवडणुकांत भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना या निवडणुकांत केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. महायुतीच्या पारड्यात जनतेने भरभरून मतांचे दान टाकले आहे. पाच वर्षांपूर्वी दगाफटका करुन जनतेच्या आदेशाचा ज्यांनी अपमान केला होता, त्यांना खर्या अर्थाने आज जनताजनार्दनाने न्याय मिळवून दिला. मात्र, पराभवाबाबत चिंतन करून, त्यातून काही बोध घ्यावा इतकेही शहाणपण विरोधकांकडे उरलेले दिसत नाही. सातत्याने आम्ही म्हणजे असामान्य नेतृत्व अशी शेखी मिरवण्यात विरोधी पक्षातील नेत्यांची हयात गेल्याने, त्यांच्याकडे बाप पुण्याई वगळता आप पुण्याईची वानवाच. त्यामुळेच झालेल्या
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी ओवळा - माजिवडा विधानसभा मतदार संघात १ लाख ९ हजार ११६ मतांचे लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून आला.
लोकसभेची निवडणूक असो वा विधानसभेची निवडणूक, काँग्रेस पक्षाने ‘जातनिहाय जनगणना’ हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यातून मोदी सरकार कसे जातविरोधी आणि आरक्षणविरोधी आहे, यासाठी काँग्रेसने आरोपांच्या फैरीदेखील झाडल्या. पण, २०११ साली केलेल्या सामाजिक-आर्थिक राष्ट्रीय सर्वेक्षणातील माहिती सार्वजनिक न करणे ही आमची चूक होती, अशी कबुली खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खा. राहुल गांधींनीच काल दिली. त्यामागच्या कारणांवरही खरं तर राहुल गांधींनी प्रकाश टाकायला हवा होता. पण, तसे न करता त
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान ( Voting ) झाले आहे.
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान ( Voters ) झाले आहे.
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर ( Mumbai City ) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झाले आहे.
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी आपली सभा पार पडल्यानंतर ‘राष्ट्र भाषा समिती, पुणे’चे अध्यक्ष जयराम फगरे (वय ९४) यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारले. फगरे यांनी चांदीचे सन्मानचिन्ह कधीचे मोदींना देण्यासाठी तयार करून ठेवले होते. पंतप्रधान हिंदी भाषेचे दूत आहेत, म्हणून त्यांचा सत्कार करायचा होता. पण ते देण्याचा योग मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या दौर्यात आला. ‘एकता’ मासिकाच्या संपादिका रूपाली भुसारी यांनी सप्टेंबरच्या अंकात फगरे यां
मध्य रेल्वे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दि. १९-२० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री) रोजी आणि दि. २०-२१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री) रोजी विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या मेन लाइन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल) वर खाली सूचीबद्ध केलेल्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या वेळेसह चालतील.
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात बंडाळीचे ग्रहण लागल्याने ‘मविआ’ची ताकद क्षीण बनल्याचे दिसत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे शिवसेना महायुतीमधून येथे लढत आहेत. ‘मविआ’मधील काँग्रेसच्या दोन पदाधिकार्यांनी बंड केले असुन मनसेनेही इथे उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे कोपरी-पाचपाखाडीत पुन्हा चौथ्यांदा जनतेचा कौल शिंदेशाहीला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई : "मोदीसाहेब अकोल्यामध्ये येत आहेत. आत्ता.. मग का येणार नाही राज्यात महायुतीची सत्ता? पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणून तर गिरवत आहेत विकासाचा कित्ता” अशी कविता सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे स्वागत केले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आयोजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ रद्द केल्यावर पाच वर्षांत त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारली. राज्यातील फुटीरतावाद व दहशतवादही आटोक्यात आला. पण, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता गेल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात पुन्हा ‘कलम ३७०’चे तुणतुणे वाजविले गेले. त्यामुळे अशा फुटीरतावादी शक्तींना विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही आळा घालण्याचे आव्हान ओमर अब्दुल्ला सरकारसह केंद्र सरकारलाही पेलावे लागणार आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत २० नोव्होबर रोजी पुन्हा दिवाळी साजरी होणार असल्याचे भाष्य केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. महायुती, महाविकास आघडी आणि तिसऱ्या आघाडीत लढत होणार आहे. याचपार्श्वभूमीवर येत्या २० नोव्हेबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.
विरोधकांसाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. ते शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी संविधान चौक ते आकाशवाणी चौक अशी भव्य रॅली काढली. यावेळी ते बोलत होते.
मुंबई : राज्यात आरक्षणाची गरज नाही असे अत्यंत चुकीचे बे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या विरोधातील केलेले विधान मागे घ्यावे त्यांनी जर अशीच आरक्षण विरोधी भूमिका कायम ठेवले तर आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांवर दलित बहु आदिवासी ओबीसी बहुजन सर्व मतदारांनी बहिष्कार घालावा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले.
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. परंतू, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. दरम्यान, आज विधानसभेत त्याचे पडसाद उमटले असून सभागृहात एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे ५ मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
मुंबईतील नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी सभागृहात केली आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सर्वत्र पाणी साचले असून त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. हा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला होता.
कर्नाटक विधानसभेत पाकिस्तानच्या समर्थनार्थ झालेल्या घोषणांवरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी गुरुवारी, दि. ७ मार्च २०२४ भाजप पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. गौरव भाटिया यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा उल्लेख भारत तोडो अन्याय यात्रा असा केला.
मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली भुमिका स्पष्ट केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.
मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर आक्षेप घेत मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरु असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाला जागृत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मुंबई : आज १० जानेवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल सुनावणार आहेत. या निकालाची संपुर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अध्यक्ष काय निकाल देणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राहूल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल अस म्हटल आहे.
विधान परिषदेचे उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहीली. महाराष्ट्र विधान सभेचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु आहे. त्यावेळी १२ डिसेंबरला विधान परिषदेच्या सकाळच्या सत्रात ते बोलत होते.
"इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांसोबत जागावाटप न केल्यामुळे काँग्रेसला तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केले. त्या रविवारी जाहीर करण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करत होत्या.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संकल्प पत्र (जाहिरनामा) प्रसिद्ध केले. 'मोदींची हमी, भाजपचा विश्वास' असा जाहिरनाम्याचा गाभा आहे. भगिनींना कायमस्वरूपी घरे देण्याचे आश्वासन दिले असून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना केजी ते बारावीपर्यंत आणि मुलींना पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर अनुक्रमे ३१ डिसेंबर २०२३ आणि ३१ जानेवारी २०२४ पूर्वी निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडिवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
घाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ६६ राष्ट्रकुल संसदीय परिषदेला जगभरातील संसदीय देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत जागतिक संसदीय आणि राजकीय प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे. या परिषदेला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित राहणार आहेत.
तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांची पदयात्रा राज्यातील २३४ विधानसभा क्षेत्रांना भेट देणार आहे. केंद्रातील सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. त्याशिवाय द्रमुकच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन स्टॅलिन सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण यांवर प्रहार करणारी अण्णामलाईंची पदयात्रा तामिळनाडूमधील नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी ठरु शकते.
राज्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्य सरकारकडून राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मह्त्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना म्हणाले, सोलापूरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येतील.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे विधानसभेच्या १६ अपात्र आमदारांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माध्यमांना दिली. विदेश दौऱ्यावरून परत आल्यावर ते मुंबई विमानतळावर असताना पत्रकारांशी बोलत होते. तसेच निर्णय काय घेणार हे आताच सांगू शकत नाही, असेही राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
कर्नाटक : कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात सुन्नी वक्फ बोर्डाच्या वकतव्याने खळबळ माजलेली पाहायला मिळते आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. त्याचबरोबर मुस्लीम समाजाला पाच मंत्रीपद द्यावीत अशी मागणीसुध्दा सुव्नी वक्फ बोर्डाने काँग्रेसकडे केली आहे. मंत्रीपदाच्या मागणीत गृह, महसूल, आरोग्य अशी अत्यंत महत्त्वाच्या पदांची मागणी बोर्डाने केली आहे.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा विजय हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळेच झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी माध्यमांना दिली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम असल्याचे राज ठाकरेंनी विधान केले. तसेच काँग्रेसच्या कर्नाटक विधानसभा विजयाचे श्रेय ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी भाजपने मंगळवारी रात्री उशिरा जाहिर केली. यामध्ये १८९ जणांचा समावेश असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे त्यांच्या शिग्गाव या मतदारसंघातूनत निवडणूक लढविणार आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करताना नागरिकांमध्येही उत्साह असून प्रत्येक जण देवाकडे आपल्या मनोकामनांची सिद्धी होण्यासाठी प्रार्थना करत आहे
महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देणारी युती झाली आहे.
राज्यातील वाढत्या धर्मांतरणाच्या घटना आणि अल्पवयीन मुलींचे फसवून, अपहरण करून बळजबरीने होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी राज्य सरकार धर्मांतरणविरोधी कायद्यातील तरतुदी अधिक कठोर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली
महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विधीमंडळ पायऱ्यांवर झालेल्या घोषणाबाजीत अभूतपूर्व राडा झाला. गेल्या काही दिवसांपासून अधिवेशनादरम्यान विरोधक आंदोलन करत होते. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांनी खुद्द मातोश्रीविरोधातच घोषणाबाजी केली.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजमान होणार? यामुळे महाविकास आघाडीत सध्या चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. 'विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं', असा दावा महाराष्ट्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (दि. १० ऑगस्ट) ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस केल्याने त्यांची वर्णी लागली. त्यामुळे ठाकरेंच्या याच निर्णयामुळे सध्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या मित्रपक्षांकडून नाराजीचे वारे वाहताना दिसतायत. इतकंच नव्हे तर ठाकरे गट
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आता ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत या प्रकरणात निवडणूक आयोगालाही बाजू मांडण्यासाठी सांगण्यात आले आहे.