मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, कुणबी प्रमाणपत्र तपासण्याची ८५ टक्के कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना देण्यात आली.
Read More
'सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास आमचा पाठिंबा नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना त्याच्या जात प्रमाणपत्रावर मराठा असाच उल्लेख असायला हवा', असे स्पष्ट मत भाजप आमदार नितेश राणे यांनी मंगळवार, दि. ११ डिसेंबर रोजी विधानसभेत मांडले.
राज्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५७ हजार ६८८ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात ४५ हजारापेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत. तर धुळे जिल्ह्यात ३१ हजार ४५३ नोंदी सापडल्या आहेत.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार ही केवळ अफवा आहे. मंत्र्यांनी शक्यतो वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत. समाजात जाती आणि धर्मांमध्ये कोणताही तेढ निर्माण होऊ न देण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांनी विरोधी भुमिका घेतली आहे. यावर मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी संवाद साधला.
कुणबी दाखल्यांचं वाटप धाराशिव येथे करण्यात आलं. धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्याकडून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं होतं. हे प्रमाणपत्र लाभार्थींनी जाळले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार ज्यांच्याकडे कुणबी जातीच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
शिंदे समितीने मराठा आरक्षणसंदर्भात प्राथमिक अहवाल सादर केला. १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. यात ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आणखी कुणबी नोंदी शोधण्यासाठी समितीने मुदतवाढ मागितली आहे. मूळ मराठा आरक्षणावर सरकार काम करत आहे. इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठीही काम सुरू होणार असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचं आवाहन समितीला करण्यात आलं आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.
ओबीसी समाजाचं उद्या आंदोलन सुरु होत आहे, त्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे. मी ओबीसी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा ओबीसी आंदोलनाला पाठिंबाच असेल. ओबीसींच्या हक्कात कोणी वाटेकरु होऊ नये. त्यामुळे उद्यापासुन सुरु होणाऱ्या ओबीसी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. घटनादुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आमची हरकत नसेल. उलट आम्ही त्याला पाठिंबाच देऊ. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.