हिंदू नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याला (३० मार्च रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) मुख्याल रेशिमबाग येथे भेट देणार आहेत. हिंदू नववर्षानिमित्त रा. स्व. संघाने 'प्रतिपदा' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिरास भेट देऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांना आदरांजली वाहतील. Narendra Modi at Reshimbaug
Read More
"संघाचे कार्य व्यक्ती विकासापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंतचे आहे. त्यासाठी संस्कार हे माध्यम म्हणून वापरले जाते आणि संस्कार मजबूत ठेवण्यासाठी त्याचे पुन:पुन्हा आचरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून इतर सामाजिक दुष्कृत्यांमुळे चांगले संस्कार कमकुवत होणार नाहीत आणि व्यक्तीचे चारित्र्य व सामाजिक अध:पतन होणार नाही.". असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अरुण कुमार यांनी केले. (Varsha Pratipada)
आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना असते. देवी नवरात्राची सुरुवात या दिवशी असते. नवरात्रीतून साधकाच्या तंत्रसाधनेने संपन्न होणार्या नवदुर्गा या काळात येतात. दुर्गेचे तंत्रज्ञान वैदिक काळापासूनच आहे. ऐन युद्धाच्या धुमश्चक्रीत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला देवी साधना करायला सांगितले होते. क्लीबावस्थेत नटणार्या अर्जुनरूपी बृहन्नडेला याच दुर्गादेवीने शक्तिसंपन्न करून विजयादशमीच्या दिवशी कौरवांचा पराजय करण्यास साहाय्य केले होते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निःपात केला होता. याच पराक्रमी