महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे योगदान महत्वाचे आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार, साहित्यिक, खेळाडू नावारुपाला आले असून याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, १ जुलै रोजी प्रभादेवी मुंबई येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई कामगार क्रीडा भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Read More
हिन्दुस्थानच्या इतिहासात राजमाता जिजाऊसाहेबांचे चरित्र वीरकन्या, वीरभगिनी, वीरपत्नी, वीरमाता आणि वीरांगना अशा सर्वांगीण स्त्रीत्वाच्या शक्तिस्वरूपात साकारले गेले आहे आणि ते युगायुगांतील स्त्रीशक्तीला मार्गदर्शक ठरते आहे, अशा शब्दांत जिजाऊसाहेबांची महती इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांनी बोरीवली येथे सांगितली.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्याजवळ महाराष्ट्रातील पहिले वाळू शिल्प संग्रहालय उभे राहिले आहे. कोकणातील वार्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने याची निर्मिती झाली. पूर्वी फक्त ओडिशा आणि म्हैसूरमध्ये हे संग्रहालय अस्तित्वात होते. परंतु आता वेंगुर्ल्यातील पर्यटकांनाही वाळू शिल्पे पाहता येणार आहेत. या विजयश्री वाळू कला संग्रहालयात, शिव, गणपती, येशू, शिवाजी महाराज आणि इतर अजून मूर्तींसह अनेक कलाकृती प्रदर्शनात आहेत.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत (बोरीवली भाग ) आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्र आयोजित 'इतिहास कट्टा:गप्पा इतिहासाच्या' दहाव्या भागात 'साष्टी-वसई मोहीम :मराठी अभिमानाचे सुवर्णपान' हा विषयचर्चीला जाणार आहे. यासाठी वक्ते म्हणून भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रणमत चे उपाध्यक्ष तसेच इतिहास अभ्यासक रविराज पराडकर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम दि .१३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे ज्ञानविहार ग्रंथालय प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह संकुल, सी विंग, तिसरा मजला येथे संपन्न होणार आहे.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आयोजित बोरिवली येथे पहिल्या इतिहास कट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात साष्टीच्या गोष्टी हा विषय इतिहास अभ्यासक रविराज पराडकर. आपल्या ओघवत्या वाणीतून सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास व पुरातत्वज्ञ, प्रा.डॉ.अरविंद जामखेडकर करणार आहेत. अरविंद जामखेडकर हे भारतीय इतिहास अनुसंधान परिषद(भारत सरकार नवी दिल्ली) चे माजी अध्यक्ष व डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे येथील माजी कुलपती आहेत.
अभिनेते ‘रविराज’ यांनी कलाक्षेत्रात तब्बल २५ वर्ष नवनवीन प्रयोग केले. काळाच्या ओघात मागे पडत गेलेल्या या ‘मस्त कलंदर’ अभिनेत्याने बुधवारी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या कलाप्रवासाची माहिती देणारा हा लेख...
ज्येष्ठ अभिनेते रविराज काळाच्या पडद्याआड