Kalyan

कल्याण डोंबिवलीचे क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊल - कडोंमपा आयुक्त डॉ. अभिनव गोयल

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरांतील रहिवासी सोसायट्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन विद्युत विभागातर्फे बनवण्यात आलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचे कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याण डोंबिवली शहरांनी क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केल्याची प्रतिक्रिया यावेळी कडोंमपा आयुक्तांनी

Read More

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात आहे

Read More

उज्ज्वल निकम मांडणार कल्याणमधील पीडितेची बाजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

(Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगित

Read More

मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरविणार : राजेश मोरे

(Rajesh More) डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात तेरा उमेदवार असले, तरी विद्यमान आ. राजू पाटील आणि माजी आ. सुभाष भोईर यांच्याशी मोरे यांची थेट लढत असल्याचे मानले जात आहे. आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. समोर तुल्यबळ उमेदवाद असताना राजेश मोरे येत्या विधानसभेच्या

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित; कल्याणमधील लाडक्या बहिणी करणार शासकीय योजनांचा प्रचार - प्रसार

(Kalyan) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यापासून आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक समाजहिताच्या योजना लागू करत सामाजिक निर्णयांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या लोकोपयोगी कामांनी प्रभावित कल्याणमधील ५० लाडक्या बहिणींनी राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कोकण वसाहत परिसरात झालेल्या लाडकी बहीण सन्मान योजनेच्या कार्यक्रमा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121