Jalgaon

उत्तर प्रदेशातील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात; जळगाव घटनेतील आरोपीचे घर पाडणार!

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठवर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीचे घर दोन दिवसात पाडण्यात येईल, याबाबत आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना आदेश दिले असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जमावासमोर केली. शासनाचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक बाप म्हणून आपण एवढेच सांगतो, त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. असेही ते म्हणाले. यामुळे आता मध्य प्रदेशातील आणि उत्तर प्रदेशातील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात येणार आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121