Harshavardhan Patil : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय विठोबा भरणे यांचा विजय झाला. कधी स्वतंत्र तर कधी काँग्रेसच्या सोबत जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव नेमका का झाला ? एकेकाळी मुख्यमंत्री पदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा झाली होती, त्यांची आता पिछेहाट का झाली ? सत्तेची समीकरणं इंदापुर मध्ये नेमकी कशी बदलली ? हेच जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून.
Read More
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला. परंतू, त्यांच्या पक्षप्रवेशाने शरद पवार गटाचे नेते प्रविण माने नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे आता ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली. सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजळा देण्यासाठी, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे २ कोटींचे प्रावधान करण्यात येईल. तसेच या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल!, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे.
रक्तपेढींच्या अभ्यासावर पीएच.डी प्राप्त करण्याचा पहिला मान पटाकवणे तसेच तब्बल ९९ वेळा रक्तदान केल्यानंतर शंभरीचा संकल्प करणारे डॉ. शंकर मुगावे यांच्या विषयीचा आढावा...
‘कोविड’ महामारीच्या दोन वर्षांच्या अंधःकारानंतर येणारा प्रत्येक सण हा सर्वांना पर्वणीसारखाच. मग आनंदाची पर्वणी असणार्या पंढरीच्या वारीला काय उपमा द्यावी? वारी हा ऐकण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. ‘एकतरी ओवी अनुभवावी’च्या धर्तीवर ‘एक तरी वारी अनुभवावी’ असंच म्हटलं पाहिजे. रिक्त हातानं कसं जावं, भरल्या मनानं जातोय, तर भरल्या हातानं जावं म्हणून परिवारातील, मित्र परिवारातील मंडळींसोबत राजगिरा लाडू घेऊन जाण्यास सुरुवात केली. यावर्षीदेखील दि. २ व ३ जुलै रोजी दिंडीमध्ये तुकोबांच
छायाचित्रांसाठी पुण्यातील इंदापूरच्या माळरानावर अधिवास करणाऱ्या खोकडांच्या जीवाशी खेळ सुरू असून यामध्ये काही पिल्लांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दै.'मुंबई तरुण भारत'ने (महा MTB) प्रसिद्ध केले होते. यावर वन विभागाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. 'महा MTB'ने बातमीमध्ये नमूद केलेल्या आरोपींच्याच वन अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या आहेत.
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा अपघात : वाहक गंभीर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील रूई गावात ग्लेडर प्रकाराचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे.