मुंबई : हवामानबदलाशी ( Climate Change ) झगडण्याकरिता चांगल्या उपाययोजना करणार्या ६५ देशांच्या यादीत भारताला दहाव्या स्थानावर नामांकित करण्यात आले आहे. जर्मनवॉच, न्यूक्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट अॅक्शन नेटवर्कने प्रकाशित केलेल्या ’क्लायमेट चेंज पर्फोमन्स इन्डेक्स’ या अहवालात भारताला दहावे स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दहा क्रमाकांमध्ये ’जी-२०’ देशांमधील केवळ भारत आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. याच अहवालात भारत गेल्यावर्षी सातव्या क्रमांकावर होता.
Read More
ऐन निवडणूकीत नरेंद्र मोदींचा दौरा ब्राझील-नायजेरीयात काय आहेत संकेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या रिओ दी जनेरिओ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी२०’ परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलच्या दौर्यावर गेले असता, तत्पूर्वी त्यांनी आफ्रिका खंडातील नायजेरिया आणि गयानालाही भेट दिली. त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या दौर्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत. या परिषदेला जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अशातच या राष्ट्रप्रमुखांशी भेट घेत, विविध विषयांवर चर्चा केली आहे. ब्राझील, सिंगापूर, स्पेन, या देशांच्या प्रमुखांशी मोदी यांनी भेट घेतली. भारताने स्विकारलेल्या ' ग्लोबल साऊथ 'च्या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचा दौरा करत आहेत. नायजेरिया सारख्या देशाने त्यांना सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव सुद्धा केला होता. अशातच ब्राझील मधल्या रिओ दि जानेरोच्या विमानतळावर उतरल्यानंतर मोदी यांचे स्वागत वेदमंत्रांद्वारे करण्यात आले. ब्राझीलच्या वैदिक पंडितांनी मंत्रांचे उच्चार करत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
जी-७ नावाने प्रसिद्ध असणारी जगातील ७ प्रमुख देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे संमेलन इटलीमध्ये सुरू आहे. यासाठी या सात देशांव्यतिरिक्त इतरही अनेक देशांचे प्रमुख या संमेलनास हजर राहणार आहेत. या संमेलनात चर्चेला येणार्या विषयांकडे जगाचे लक्ष लागले असल्याने, हे संमेलन कायमच चर्चेचा विषय असते.
मॅक्रॉन यांनी भारताच्या निमंत्रणाला मान देऊन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, भारत-फ्रान्स यांच्यातील सामरिक भागीदारीला २५ वर्षं पूर्ण होत असताना, ही भेट पार पडली. या भेटीदरम्यान २०४७ सालापर्यंत भारत आणि फ्रान्स संबंध कुठे असावेत, याबाबत एक दृष्टिपत्र तयार करण्यात आले.
आपल्या कला, आपला निसर्ग वगैरे आठवलं की, त्याला जोडूनच असलेल्या क्रीडेला आपण वेगळे करू शकत नाही. आपण क्रीडा क्षेत्र हे ‘वसुंधरा’अंतर्गत असलेल्या घटकांचा कसा चपखल वापर करून, आपले दायित्व प्रदान करते, ते बघण्याचा या लेखाच्या दोन भागांत क्रमशः प्रयत्न करू. ‘शुभंकर’ अर्थात ‘मॅस्कॉट’ हे सगळ्याच क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. तेव्हा क्रीडा क्षेत्रातील अशाच काही शुभंकरांविषयी...
भारताने ‘जी २०’चे अध्यक्षपद स्वीकारून आज ३६५ दिवस पूर्ण झाले आहेत. ‘वसुधैव कुटुम्बकम्’, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेच्या पुनर्जागरणाचा, त्याप्रति पुन्हा वचनबद्धता व्यक्त करण्याचा आणि ती प्रतिबिंबित करण्याचा हा क्षण आहे.
'वसुधैव कुटुम्बकम्’ हा शब्द भारतीयांसाठी नवीन नाही. पाश्चात्य देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ’जी २०’च्या निमित्ताने त्याची नव्याने ओळख करून दिली. हा शब्दप्रयोग विविध देशांत वेगवेगळ्या स्वरुपांत वापरला जातो. नोव्हेंबर महिना उजाडताच अमेरिकेसह कॅनडा आणि लगतच्या देशांमध्ये ‘थँक्सगिव्हिंग’ची चर्चा होत असते. ’थँक्सगिव्हिंग’ म्हणजेच ’कृतज्ञता’ अथवा ‘आभार.’ गेल्या काही वर्षांत त्याचे वारे आपल्याकडेही वाहू लागले आहेत. ‘थँक्सगिव्हिंग’ म्हणजे नेमके काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या नकारात्मक वापराबद्दल जगभरातील चिंता वाढत आहे. त्यामुळे एआयच्या जागतिक नियमनावर एकत्र काम केले पाहिजे, अशी भारताची भूमिका असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
‘जी 20’ शिखर परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक नेत्यांसमोर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असाच आपल्या मातृभूमीचा केलेला उल्लेख सर्वस्वी सुखावणारा होताच. आता पाठ्यपुस्तकांतूनही ‘भारत’ हेच नाव वापरण्यात यावे, अशी शिफारस ‘एनसीईआरटी’च्या समितीने केली आहे. वसाहतवादी मानसिकतेचे हे ओझे आजच्या आणि पुढील पिढीच्या खांद्यावर न देण्यासाठी केलेली ही शिफारस सर्वस्वी कौतुकास्पदच!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील यशोभूमी येथे ९व्या जी२० संसदीय स्पीकर समिटचे (पी२०) उद्घाटन केले. 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद' या थीमसह भारताच्या जी२० अध्यक्षतेच्या व्यापक फ्रेमवर्क अंतर्गत भारतीय संसदेद्वारे शिखर परिषद आयोजित केली जात आहे.
"भारताच्या जी-२० शिखर परिषदेत राष्ट्राला जागतिक मान्यता मिळाली ती हिंदुत्वाच्या मूल्यांमुळे. जी सध्या उर्वरित जग प्राप्त करू इच्छित आहे. उर्वरित जग जागतिक बाजारपेठेशी परिचित असले तरी त्यांना जागतिक कुटुंबाच्या संकल्पनेचा फारसा अनुभव नाही. तर दुसरीकडे भारत ३ हजार वर्षांपासून हे वास्तव जगत आला आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केरळ येथे केले.
महिला आरक्षणाचा राजकीय पैलूसह सामाजिक पैलूही महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी २०’ या जागतिक व्यासपीठावर महिलांच्या नेतृत्वाखाली विकास हा मुद्दा अतिशय ठामपणे मांडला. कारण, महिलाकेंद्रित आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास साध्य होणे शक्य आहे.
‘न भूतो, न भविष्यती’ असेच नुकत्याच नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या दिमाखदार ‘जी २०’ शिखर परिषदेचे वर्णन करावे लागेल. केवळ भारताचेच नाही, तर अख्ख्या जगाचे लक्ष या शिखर परिषदेकडे होते. ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताने सर्वार्थाने सार्थकी लावले. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या नीती-संस्कारांतर्गत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा संदेश भारताने दिला आणि त्यादृष्टीने ‘जी २०’ची यशस्वी वाटचालही करुन दाखवली. त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धासारख्या वैश्विक प्रश्नावर नवी दिल्ली घोषणापत्रातही सर्व देशांनी सहमती दर्शविली. त्याचबरो
भारताचं बदलतं स्वरूप, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राष्ट्राचे वाढणारे महत्त्व, देशांतर्गत विकासाची आलेली लाट या सर्वांमुळेच १४२ कोटी भारतीयांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो. आज संपूर्ण जगाचा विश्वास संपादन करून भारत ‘विश्वगुरू’ म्हणून उदयास येतोय आणि या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एकच सांगावेसे वाटते की, विश्वगुरू भारताचे नायक म्हटलं की, डोळ्यासमोर आपलं नाव येतं.
‘सब का साथ, सब का विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन प्रारंभ झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दमदार वाटचाल ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या वैश्विक सूत्रापर्यंत पोचली. याचसोबत ’चांद्रयान’ या भारताच्या चंद्रविषयक मोहिमेपर्यंतची यशकथा म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मनाला मिळवून दिलेला जबर आत्मविश्वास आहे.
जगभरात गेल्या वर्षभरात युक्रेनमधील युद्धाबरोबरच सर्वाधिक चर्चा भारतातर्फे आयोजन होत असलेल्या ‘जी २०’ परिषदेची झाली. भारतातील ६० शहरांमध्ये पर्यावरण, हवामान बदल, ऊर्जा, शाश्वत विकास, शिक्षण, पर्यटनासह ३२ विषयांवरील चर्चा आणि २०० बैठका अशी विस्तृत व खोलवर चर्चा झाली. ‘जी २०’च्या इतिहासात यजमान राष्ट्राने देशाच्या विविध भागांत बैठका घेतल्याचे हे १८ वर्षांतील पहिलेच उदाहरण आहे. या परिषदेचे सर्व श्रेय विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. या यशस्वी परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारताच्या शिरपेचात
सत्ता केवळ सेवेचे साधन, असे मानत भारताच्या अत्यंजांचा विकास करण्यासाठी कार्य करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस. विश्वात आज नरेंद्र मोदींच्या कार्याचा नावाचा डंका वाजत आहे. त्यांचे राजकीय विकासात्मक कार्य, यावर चर्चा होतात. मात्र, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या नरेंद्र मोदींचे सामाजिक समरसता तसेच महिला-बाल सशक्तीकरणासंदर्भातले विचार आणि कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. या लेखात त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वातल्या या पैलूचा सारांश रुपाने आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतमातेचा प्रखर राष्ट्रभक्त, देशातील १४० कोटी भारतीयांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणारा आणि ते सातत्याने जोपासणारा नेता, कठोर प्रशासक पण वेळप्रसंगी लोण्याहून मऊ वाटावा, असा हळव्या मनाचा संवेदनशील माणूस. ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे’ या उक्तीला साजेसे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, ‘राष्ट्र प्रथम’ भावनेने विकासाच्या वाटेवर सदासर्वदा चालत असणारा पांथस्थ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली आहे. नऊ वर्षांपूर्वी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेत स
‘जी २०’ अध्यक्षपदाच्या काळात भारताने जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर ठाम मत मांडून तोडगा सुचविला. त्याचवेळी नवी दिल्ली घोषणापत्राद्वारे संघर्षाच्या स्थितीतूनही मार्ग काढण्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. ‘जी २०’ अध्यक्षपद भारतासाठी आणि जगासाठी कसे महत्त्वाचे ठरले, याविषयी भाजपच्या विदेश विभागाचे प्रभारी डॉ. विजय चौथाईवाले यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे नवी दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी साधलेला विशेष संवाद...
'एखाद्या राज्यासाठी शेजारील राज्य स्वाभाविकरित्या शत्रू असते,’ असे चाणक्यने म्हटले होते. चीनसाठी त्याचे शेजारील राष्ट्रही असाच विचार करतात. चीनच्या कुरातपतींमुळे चीनचे जगभरात अनेक शत्रू निर्माण झाले. चीनने नुकताच आपला नवा नकाशा प्रसिद्ध केला.
‘जी २०’चे संमेलन चालू असताना योगायोगाने अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे (The World As I see It) हे पुस्तक माझ्या वाचनात आले. हे पुस्तक वाचल्यानंतर मला असे वाटले की, २०२३च्या ‘जी २०’ संमेलनाची अनुकूल पृष्ठभूमी ज्या थोर पुरुषांनी केली, त्यात आईन्स्टाईन यांचे नाव घ्यावे लागेल.
'जी २०’ परिषदेत उपस्थित प्रत्येक मुद्दा सर्वानुमते मान्य झाला, हे भारताचे मोठे यशच. त्यातच ‘जी २०’चे यजमानपद सांभाळणार्या भारताच्या पंतप्रधानांनी उपस्थित सगळ्यांचेच आदरातिथ्य अगदी भरभरून केले. सक्षम भारत, सजग भारताचे समर्थ रूप मोदींनी त्यावेळी सर्व जगासमोर मांडले. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आदरातिथ्यही अगदी भारतीय परंपरेने उदार स्वरुपात केले.
भारतात झालेल्या G-२० शिखर परिषदेचे जगभरातून कौतुक होत आहे. अमेरिकेने याला संपूर्ण यश म्हटले आहे. तसेच दिल्लीचा जाहीरनामाही महत्त्वाचा ठरला आहे. ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
सुपरस्टार रजनीकांत यांनी कुआलालम्पुरमध्ये मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची भेट घेतली. दक्षिण कुआलालम्पुर येथील पुत्रजया येथील 'Bangunan Perdana Putra' इमारतीत पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली. लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी चालवल्या जात असलेल्या योजनांचा सन्मान केल्याबद्दल अन्वर इब्राहिम यांनी सुपरस्टार रजनीकांत यांचे आभार मानले. अन्वर इब्राहिम म्हणाले की, आम्ही ज्या सामाजिक मुद्यांवर बोलतोय. त्यांच मुद्यांवर तुम्ही भाष्य केले.
G२० परिषदेदरम्यान आयोजित केलेल्या डिनरचे काही छायाचित्रे अजूनही चर्चेत आहेत. दि. ९ सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे आयोजित 'गाला डिनर'चे आणखी काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची वेगळी शैली पाहायला मिळते.
‘जी २०’ परिषदेच्या यशस्वी आयोजनातून भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील आपले स्थान आणखी पक्के केले. परस्परांमध्ये विसंवाद असलेल्या देशांमध्ये जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर मतैक्य घडवून आणण्यात भारताला यश मिळाले. या परिषदेत भारत विश्वातील गरीब आणि विकसनशील देशांचा आवाज बनला. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केल्यामुळे अरब आणि मुस्लीम जगतातही आपले स्थान निर्माण झाले.
'जी २०’ शिखर परिषदेच्या भव्यदिव्य आयोजनानंतरही भारताला रशिया-युक्रेन युद्धावर रशिया-चीन आणि पाश्चिमात्य देशातील मतभेदांमुळे दिल्ली घोषणापत्रावर सहमती मिळवता येणार नाही, असा अंदाज होता. पण, दिल्ली घोषणापत्रावर सर्वच देशांची सहमती मिळवून भारताने जगाला आपल्या कुटनीतिक ताकदीचे दर्शन घडवले. दिल्ली घोषणापत्राचे सर्वांनीच स्वागत केले.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी जी २० परिषदेबाबत मोदी सरकारचं कौतुक केलंय. दिल्ली डिक्लरेशन हे भारतासाठी मोठं राजनैतिक यश असल्याचं थरूर म्हणाले. तसेच रशिया युक्रेन युद्धाबाबत भारताने यशस्वी फॉर्म्युला शोधून काढल्याचं थरूर म्हणाले. भारत युरोप या रेल्वे कॉरिडोरमध्येही प्रचंड क्षमता असल्याचं ते म्हणाले.
राज्यात बालविवाह करणाऱ्या अथवा त्याच्याशी संबंध असणाऱ्या ३ हजार व्यक्तींना येत्या दहा दिवसात अटक केली जाणार आहे, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या कार्यकारिणीचे आयोजन आसाममध्ये करण्यात आले होते. कार्यकारिणीच्या समारो आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्या उपस्थितीत झा
चित्रपट हिट होत नसले की, मग ‘लाईमलाईट’मध्ये राहण्याचा खटाटोप सुरू होतो. त्यासाठी वादग्रस्त मुद्द्यांना हात घालायचा आणि नकारात्मक का होईना प्रसिद्धी मिळवायची, असा काहींचा शिरस्ता. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते नसरुद्दीन शाह यांचे नाव यामध्ये तर अग्रक्रमावर. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चित्रपटांची, वेबसीरिजची पोळी भाजून त्यांना उदरनिर्वाह.
भारतात वास्तव्यास असलेल्या तिबेटी नेत्यांची, ’जी २०’ परिषदेमध्ये तिबेटच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी होती. चीनने आमचा देश ताब्यात घेतला आहे आणि त्यामुळेच चीन हा देश विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, असा संदेश या परिषदेसाठी येणार्या नेत्यांना देऊ इच्छित आहोत, असे निदर्शकांचे म्हणणे होते. ही निदर्शने ‘तिबेटी युथ काँग्रेस’ने आयोजित केली होती.
आयातीत कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाला अनुकूल, अशा जैवइंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ची घोषणा ‘जी २०’ शिखर परिषदेत करण्यात आली. भारतासह ब्राझील आणि अमेरिका याचे सहयोगी देश आहेत. जैवइंधनासाठीचे आदर्श ठरवून देण्याची सुवर्णसंधीच भारताला यानिमित्ताने मिळाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘जी २०’ शिखर परिषदेच्या नवी दिल्ली घोषणापत्रामध्ये प्रारंभीच ‘हे युद्धाचे युग नाही’ या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार करून संपूर्ण घोषणापत्रास एकमताने मान्यता देण्यात आली. त्यामुळे खरे तर अनेकांना धक्का बसला; मात्र ‘विश्वमित्र’ भारताची तपश्चर्या जगासाठीही महत्त्वाची ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कालानुरूप बदल न केल्यास व्यक्ती आणि संस्थांचे महत्त्व नष्ट होते. त्यामुळेच नवी जागतिक रचना प्रतिबिंबीत होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (युएनएससी) बदल होणे अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भारताच्या ‘जी२०’ अध्यक्षपदाच्या सक्रिय भूमिकेद्वारे इतिहासात प्रथमच ग्लोबल साऊथमधील देशांना एकत्रित करण्यात आले आहे. याद्वारे नवी सत्ताकेंद्रे उदयास येत असल्याचे रशियास दिसून येत आहे. हितसंबंधांच्या स्पष्ट व न्याय्य समतोलासाठीसाठी प्रयत्न करण्याच्या मुद्द्याच्या समावेशामुळे नवी दिल्ली घोषणापत्र हे ‘माईलस्टोन’ ठरले आहे, असे प्रतिपादन रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० शिखर परिषदेदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारविनिमय करून द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला.
‘जी२०’ शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय माध्यम कक्षास भेट देऊन परिषदेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसोबत अल्पसंवाद साधला. ‘जी२०’ शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील नव्याकोऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात करण्यात आले होते. या परिषदेचे वार्तांकन करण्यासाठी देशविदेशातून सुमारे दोन ते तीन हजार पत्रकार आले होते. त्यांच्यासाठी परिषदेस्थानी भव्य अशा दोन आंतरराष्ट्रीय माध्यम कक्षांची उभारणी करण्यात आली होती.
‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील दिग्गज नेते राजधानी नवी दिल्लीत दाखल होत असताना, काँग्रेसी राहुल गांधी युरोपवारीला गेले. नेहमीप्रमाणेच भारतविरोधी भूमिका त्यांनी तेथे मांडली. देशद्रोही शक्तींना बळ देण्याचेच काम त्यांनी तेथे केले. यापूर्वीही त्यांनी असे कृत्य वारंवार केले आहे. देशद्रोह हाच काँग्रेसी स्वभाव असल्याने, त्याचे आश्चर्य वाटत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘जी२०’ राष्ट्रप्रमुखांचे दिल्ली येथील राजघाटावर अनवाणी पायांनी गांधीवंदन केले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पचक्र अर्पण केले.
G-20 शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले आहे. त्यावेळी 'भारत मंडपम'चे रूपांतर पाहुण्यांसाठी मिनी मार्केटमध्ये करण्यात आले आहे. या मिनी मार्केटमध्ये अनेक गोष्टीमधून भारतीय संस्कृती आणि कलेचा साक्षात्कार होत आहे. याअंतर्गत पाहुण्यांना बिहारी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी बिहार सरकार आणि उद्योग बिहार यांच्यातर्फे बिहारमधील हस्तकला बाजारात प्रदर्शित करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांची शुक्रवारी रात्री नवी दिल्लीत भेट घेतली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून नवी दिल्लीत होणाऱ्या जी २० शिखर परिषदेत ते सहभागी झाले आहेत.
जागतिक अर्थव्यवस्थेतील गोंधळ, जगातील दुभंग, दहशतवाद, आरोग्य, ऊर्जा यासह अनेक जुन्याच समस्यांवर नव्याने तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रित तोडगा काढण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'जी२०' शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रास संबोधित करताना केले.
दिल्ली येथे शनिवारपासून जी-20 परिषदेला सुरुवात झाली आहे. यादरम्यान वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्वांचे स्वागत केले आहे. दरम्यान, भारत मंडपममध्ये असलेल्या कोणार्क चक्राची सध्या चर्चा रंगली आहे.
"आजचे युग युद्धाचे नाही" ही रशिया - युक्रेन संघर्षाविषयीची भारताची भूमिका 'जी२०' देशांनी एकमताने मान्य केली आहे. त्यामुळे जागतिक संघर्षावर तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेस बळ प्राप्त झाले आहे.
'जी२०' परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीत भारताकडून आणखी एक महत्त्वाचा उपक्रम जाहीर केला. यावेळी त्यांनी 'ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स' स्थापन करण्याची घोषणा केली.
'जी२०' शिखर परिषदेत 'भारत - पश्चिम आशिया - युरोप' असा विशेष आर्थिक कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, युरोपीय महासंघ, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका यांचा समावेश असलेल्या कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांवरील सहकार्याचा हा ऐतिहासिक आणि पहिलाच उपक्रम आहे.
हैदराबाद येथे दि. १६ आणि १७ जून रोजी झालेल्या ‘जी २०’ कृषी मंत्र्यांच्या बैठकीत काही महत्त्वाच्या तत्त्वांवर आणि विविध आघाड्यांवर काम करण्यासाठी कृती योजना निश्चित करण्यावर सहमती झाली. सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत शेती आणि अन्न प्रणालींच्या विकासाद्वारे सर्वांसाठी अन्नसुरक्षा आणि पोषणासाठीची वचनबद्धता कायम ठेवत, इतर विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक प्रमुख साधन म्हणून, डिजिटल धोरणांवर देण्यात आलेला भर, ही गोष्ट विशेष लक्षात घेण्याजोगी ठरली. यामध्ये विशेषतः भारतासाठी महत्त्वाच्या गरजा आणि संधी आहेत. त्याव