( Taxpayers take advantage of the Abhay Yojana Goods and Services Tax Department ) ‘जीएसटी’ कायदा नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यावसायिक, करदात्यांकडून ‘जीएसटी कायद्या’चे अनुपालन, करभरणा करताना अनवधानाने चुका झाल्या आहेत. या चुकांमुळे व्याज आणि दंड याचा आर्थिक भुर्दंड करदात्याला लागू नये. तसेच, वस्तू व सेवाकर विवादांचे निराकरण सुलभतेने होऊन विवादित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘जीएसटी अभय योजना‘ सुरु केली आहे. पात्र करदात्यांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आ
Read More
जीएसटी कायदा नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यवासायिक, करदात्यांकडून जीएसटी कायद्याचे अनुपालन, कर भरणा करताना अनावधानाने चुका झाल्या आहेत. या चुकांमुळे व्याज आणि दंड याचा आर्थिक र्भुदंड करदात्याला लागू नये. तसेच वस्तू व सेवा कर विवादांचे निराकरण सुलभतेने होऊन विवादित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जीएसटी अभय योजना सुरु केली आहे. पात्र करदात्यांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्तू व सेवा कर विभागाद्वारे करण्यात आले आहे.
सीक्वेंट सायंटिफिक आणि वियश लाइफ साइंसेज यांनी विलिनीकरणाची घोषणा केली आहे. या कंपन्यांच्या विलिनीकरणामुळे देशातील सर्वात मोठी पशु आरोग्य सेवा कंपनी तयार होणार आहे. २०२३ मध्ये भारतीय पशु आरोग्य सेवा बाजार तब्बल ८ हजार कोटी रुपयांचा होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर २०३२ पर्यंत १६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
आपण इस्लामिक बिझनेस ग्रुप आहोत, असे सांगणार्या ‘ग्लोबल इखवान सर्विसेज अॅण्ड बिझनेस होल्डिंग्स’च्या धार्मिक वसतिगृहामध्ये बालकांचे शोषण होते, अशा तक्रारी मलेशियाच्या पोलिसांकडे आल्या. पोलिसांनी ’ग्लोबत इखवाना’च्या २० धार्मिक Islamic वसतिगृहांवर छापाही टाकला. ४०२ बालकांची सुटका केली. कोण आहेत ही बालक?
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंती दिनानिमित्ताने मुंबई महानगरपालिका, केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने तसेच केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने दि. १ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
२० जूनपासून Dindigul Farm Product व Winny Immigration and Education Services Pvt Ltd या दोन कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. जाणून घेऊयात आयपीओबद्दल माहिती....
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक दबाव कायम असताना भारतातील विना बँकिंग वित्तीय सेवेत वाढच होत आहे. एसबीआयने आपल्या नव्या अहवालात स्पष्ट केल्याप्रमाणे, विना बँकिग वित्तीय सेवा १० टक्क्यांनी वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सेवेत मात्र ३ टक्क्यांनी घसरण होणार आहे. प्रामुख्याने ही होणारी वाढ आरबीआयच्या विशेष प्रयोजनमूलक कामगिरीमुळे तसेच असेट क्वालिटीत वाढ झाल्यामुळे, बँकिंग पायभूत सुविधेत वाढ झाल्याने, सरकारच्या चांगल्या धोरणामुळे व मायक्रो इकॉनॉमी फंडामेंटलमुळे झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
टेलिकॉम क्षेत्रातील नवीन माहिती पुढे आली आहे. या माहितीत म्हटल्याप्रमाणे, एकाहून अधिक टेलिकॉम कनेक्शन असल्यास अतिरिक्त फी आकारली जाईल ही केवळ अफवा असल्याचे ट्राय (Telecom Regulatory Authority of India) ने स्पष्ट केले आहे. ही केवळ अफवा असून असा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावर ट्रायने 'Numbering Plan' या विषयी लागू करावे का यासाठी प्रतिक्रिया मागवल्या होत्या.
देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) यांच्या सहकार्याने, (Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities) एंगेज महाराष्ट्र अनलॉकींग आय.टी. ॲण्ड आय.टी. ऐनेबल्ड सव्ह्रिसेस ऑर्पोच्युनिटीज, हा आगामी संवादात्मक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विकास आयुक्त (उद्योग) दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली राज्यशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या कार्यक्रमाम
जिओ फायनाशिंयल कंपनीने वन क्लिक ॲप बाजारात लाँच केले आहे. डिजिटल खाते उघडण्यापासून बँक मॅनेजमेंट सुविधांसाठी जिओ फायनांशियल सर्विसेसने 'जिओ फायनान्स' (Jio Finance) नावाचे ॲप काढले आहे.गुगल अमेझॉनला टक्कर देण्यासाठी कंपनीने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. युपीआय, डिजिटल पेमेंट सेनेसह इतर सुविधांचा समावेश या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे.जिओ फायनांशियल सर्विसेसचे आपल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, युपीआय व्यवहार, बिल सेटलमेंट, विमा अँडव्हायजरी, एकत्रित बचत व इतर खाते सुविधा अशा सगळ्या सेवेसाठी युजर फ्रेंडली अँप बाजार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ चे सुधारीत पत्रक जारी केले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यानंतर फेब्रुवारी महीन्यात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण लागु केले. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मराठा आरक्षणासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला.
गेल्या १८ वर्षांत भारताची सेवा क्षेत्रातील निर्यात ही दुपटीहून अधिक वाढली असून, २०३० पर्यंत ती ८०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल, असा अंदाज ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालात नुकताच वर्तविण्यात आला आहे. मोदी सरकारच्या सेवा क्षेत्राच्या कासासाठी अनुकूल ध्येय-धोरणांचाच हा परिपाक म्हणावा लागेल.
ब्लू डार्ट, ही दक्षिण आशियाची जलद हवाई आणि एकात्मिक वाहतूक तसेच वितरण कंपनी असून त्यांच्या तर्फे गुजरात येथील गिफ्ट सिटीत मध्यवर्ती अस्तित्वाची घोषणा करण्यात आली. बदलत्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि भारताच्या विकास मार्गाशी सुसंगत असलेल्या नवीन सुविधेच्या उद्घाटनासह अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि अनुभवी कर्मचाऱ्यांसह सुसज्ज, ब्लू डार्टच्या गिफ्ट सिटी सुविधेमार्फत प्रमुख महानगरांमधून 20 तासांची वितरण सेवा सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे लागलीच दुसऱ्या दिवसाची डिलिव्हरी इच्छित स्थळी वितरणाची वचनबद
'IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ' अंतर्गत नोकरची मोठी संधी निर्माण झाली आहे. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १०७४ रिक्त पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
आजपासून क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस आयपीओ बाजारात नोंदणीकृत (लिस्टिंग) होणार आहे.अपेक्षेप्रमाणे अधिक प्रतिसाद या आयपीओला मिळाला असून शेअर बाजारात १० टक्के प्रिमियम दराने हा समभाग (शेअर) नोंदणीकृत झाला आहे. सुरूवातीला ७८५ रूपये प्रति समभाग या भावाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत झाला आहे. कंपनीचा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आयपीओ १४ ते १८ मार्च या कालावधीत आला होता.
शेअर बाजारातील कमाईसाठी गुंतवणूकदार सज्ज झाले आहेत. याचे कारण म्हणजे अजून एक कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. रिपोर्टनुसार क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेसचा (Crystal Integrated Services) चा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. १४ मार्चला कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer) शेअर बाजारात दाखल होणार आहे. १४ ते १८ मार्चपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला असणार आहे.क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस कंपनी हेल्थकेअर,एज्युकेशन,पब्लिक अँडमिनिस्ट्रेशन, रेल रोड,मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सुविधा पुरवणारी फॅसिलिटी मॅनेजम
रेनॉ इंडिया हा भारतातील युरोपियन कार ब्रॅण्ड आणि बीएलएस ई-सर्विसेस ही बीएलएस इंटरनॅशनलची उपकंपनी यांनी ग्रामीण भारतात रेनॉच्या क्विड, ट्रायबर व कायगरच्या नवीन २०२४ श्रेणीची उपलब्धता व पोहोच वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
बीएलएस ई-सर्विसेस लि. या नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवा, बिझनेस करस्पॉण्डंट सेवा आणि असिस्टेड ई-सर्विसेस देणाऱ्या तंत्रज्ञान-सक्षम डिजिटल सेवा प्रदाता कंपनीने डिसेंबर २०२३ तिमाहीसाठी आणि नऊमाहीसाठी त्यांच्या लेखापरिक्षित न केलेल्या एकत्रित आर्थिक निकालांची घोषणा केली. बीएलएस ई-सर्विसेसने भारतीय स्टॉक एक्स्चेंज उदा. एनएसई आणि बीएसईवर शेअर्सना सूचीबद्ध केल्यानंतर त्यांचे पहिले तिमाही आर्थिक निकाल सादर केले. डिसेंबर २३ तिमाहीसाठी कंपनीचा एकत्रित महसूल संबंधित मागील तिमाहीमधील ६९.०७ कोटी रूपयांच्या तुल
'एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड(एआयईएसएल) अंतर्गत भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीद्वारे एआयईएसएल अंतर्गत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'एआयईएसएल'मधील एकूण १०० रिक्त जागांसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी १९ जानेवारीला जाहीर करण्यात आली. त्यात कोल्हापुरच्या विनायक पाटील याने पहिला क्रमांक मिळवला आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अंतर्गत राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा यंदाचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.
कोविड केंद्रात झालेल्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरोधात गुन्हा दाखल केला. कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविड केंद्राचे कंत्राट सुजीत पाटकर व त्यांच्या भागीदारांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला मिळाले होते. मात्र, या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या घोटाळ्याबद्दल आता नवीन बातमी समोर येत आहे.
'आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण' अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 'आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण' कडून भरतीप्रक्रियेसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून “कार्यकारी संचालक (सुरक्षा बाजार), मुख्य महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन)” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मणिपूरमध्ये रजेवर गेलेल्या डिफेन्स सर्व्हिसेस कॉर्प्स (DSC) मधील भारतीय सैन्यातील 41 वर्षीय सेर्टो थांगथांग कॉमची हत्या करण्यात आली आहे. कॉम या भारतीय लष्कराच्या जवानाचे अज्ञात लोकांनी अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या केली.
१४ सप्टेंबर २०२३ पासून Zaggle Prepaid Ocean Services Limited चा IPO १८ सप्टेंबर पर्यंत गुंतवणूकीसाठी मार्केट मध्ये खुला राहणार आहे. कंपनीने या IPO ( Initial Public Offer) ची घोषणा आज मुंबई येथे केली. हा कंपनीचा फ्रेश इश्यू असणार आहे.एकूण ३९२० मिलियन रुपयांचे हे इक्विटी शेअर्स असतील. त्यातील १०,४४९,८१६ किंमतीचे शेअर्स Offer for Sale ( OFS) असणार आहेत. अँकर गुंतवणूकदारांसाठी ( Institutional Investors) साठी बिडिंग साठी तारीख १३ सप्टेंबर असणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात (युपीएससी) अंतर्गत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२४ अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, युपीएससी अंतर्गत होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२४ नोंदणी प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.
सहावे ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस लवकरच आयोजित केले जाणार आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागांतर्गत सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे आयोजित केले जाणारे ग्लोबल एक्झिबिशन ऑफ सर्व्हिसेस २०२३ ग्रेटर नोएडा येथे इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्टमध्ये १४ ते १६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
भारतातील सर्वात जुन्या बँकापैकी एक The Catholic Syrian Bank Limited ( CSB Bank) ने ज्येष्ठ नागरिक आणि महिला खातेधारकांसाठी स्पेशल ऑफर बाजारात आणली आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र सेव्हिंग खाते आणि वूमन पॉवर सेव्हिंग खाते या दोन प्रकारची खाते योजना सुरू केली आहे. बँकेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, या खात्यावर अनेक प्रकारच्या सुविधा, लाभ असणार आहेत. लॉकर रेंटल, एअरपोर्ट विश्रामगृहाचा मोफत प्रवेश, व रुपे प्लाटिनम डेबिट कार्ड असे वेगवेगळे लाभ या खात्यावर मिळणार आहेत.
रस्त्यांच्या खड्ड्यांवर आदळत आपटत चालणार्या सरकारी बस आणि धुळीचा होणारा त्रास, हे चित्र येत्या काही वर्षांमध्ये पालटण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारतर्फे ‘पंतप्रधान ई-बस सेवा योजने’ची घोषणा झाली. महिन्याभरातच या संदर्भातील पुढील नियोजन ठरविले जाणार आहे, याच संदर्भातील हा उहापोह...
मायक्रोसॉफ्टने नेहमीच तंत्रज्ञान क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी केली आहे. मायक्रोसॉफ्टचा ऑफिस 365 ने कॉर्पोरेट जगतात यशाचे नवे शिखर गाठले असल्याचे आपण पाहिले. यात नवे पाऊल म्हणून मायक्रोसॉफ्टने फिल्ड वर्कर्स करता अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. यामुळे फील्ड सर्विसेसचा उपाययोजनांसाठी त्याचा लाभ होणार आहे.' कोपायलट ए आय 'असिस्टंट म्हणून ड्युटीवर असलेल्या पर्यावेक्षकांना कामगारांचा कामाचा आढावा मिळण्याची इत्यंभूत माहिती मिळवणे शक्य होणार आहे.
जगातील विशाल असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लँकरॉक कंपनीने मुकेश अंबानी यांच्या जियो फायनाशिअल सर्विसेस या समुहाशी हातमिळवणी केली आहे.ब्लँकरॉक ने जियो फायनाशिअल शी हातमिळवणी केल्याने नवीन वेचंरचे जियो ब्लँकरॉक कंपनी असे नामकरण करण्यात आले आहे.दोन्ही कंपन्यांनी हातमिळवणी केल्याने मुबलक भांडवल व व्यवस्थापन या जोरावर बाजारात ही कंपनी अग्रेसर राहिल असे सांगण्यात आले आहे.
कधीकाळी जगभरात भारताची ओळख असलेली ‘एअर इंडिया’ ही विमान कंपनी पुन्हा एकदा जगभरात अधिराज्य गाजविण्यास सज्ज होत आहे. ‘एअर इंडिया’चे ‘टाटा समूहा’कडे पुनरागमन झाल्याने त्यांचे दिवस पालटू लागले आहेत. ‘टाटा समूहा’चे संपूर्ण लक्ष ‘एअर इंडिया’ला तिची हरवलेली ओळख परत मिळवून देणे आणि तिला जागतिक विमान कंपनी बनवण्यावर आहे.
जम्मू आणि काश्मीर सरकारने केंद्रशासित प्रदेशातील विविध विभागांद्वारे ऑफर केलेल्या आणखी आठ ऑनलाइन सेवा आपल्या स्वयं-अपील यंत्रणेच्या अंतर्गत जोडल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या 22 झाली आहे.पब्लिक सर्व्हिसेस गॅरंटी ऍक्ट (PSGA) अंतर्गत निर्धारित वेळेच्या मर्यादेत सेवा पुरविल्या गेल्या नसल्याच्या बाबतीत ऑटो-अपील वैशिष्ट्य नागरिकांच्या अपीलांना स्वयं-वाढविण्यात मदत करेल. सरकारने एका प्रकाशनात म्हटले आहे, नुकत्याच जोडलेल्या सेवांमध्ये अविवाहित/विधवा/घटस्फोट प्रमाणपत्रे जारी करणे समाविष्ट आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.
कोरोनाच्या महाभयंकर झटक्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळ्या झालेल्या असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र सुस्थितीत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हरवल्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत, एवढेच नव्हे तर सर्वच घटकांची जोरदार घौडदौड सुरु झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अजून एक मोठी चांगली बातमी मिळाली आहे. गेल्या तिमाही मध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये थेट करांमधून येणाऱ्या उत्पन्नात तब्बल ३० टक्क्यां
समाजातील विषमता दूर करण्यासाठी व समाज सबलीकरणासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकजण काही ना काही कार्य करत असतो. अशातच येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून वनवासी विभागातील गरजू बांधवांसाठी हिंदू सेवा संघ, महाराष्ट्र या संस्थेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या संस्थेमार्फत ज्यांच्या घरी गणपती बसतात अशांसाठी एक विशिष्ट 'दानपेटी' तयार करण्यात आहे. या दानपेटीत जमा होणारा निधी वनवासी विभागातील गरजूंच्या भवितव्यासाठी वापरला जाणार आहे.
कोरोनाच्या निमित्ताने आपल्या संगणक क्षेत्रापुढे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दुहेरी आव्हान उभे ठाकले. एक म्हणजे, कोरोनाकाळत संगणक सेवा क्षेत्राचा उपयोग अनपेक्षितपणे व दुपटीने वाढला. त्याअनुषंगाने कर्मचाऱ्यांची संख्या अर्थातच तोकडी ठरली. दुसरी बाब म्हणजे, त्याचदरम्यान कोरोना व त्याच्याशी निगडित विविध कारणांनी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याने कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या समस्येत दुहेरी भर पडली.
नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२१ महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण १,३०,१२७ कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी २३,८६१ कोटी रुपये,एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोट
जातीपातीपलीकडे जाऊन शाश्वत मानवी मूल्य जपत स्वत:चे आयुष्य घडवत, समाजाला प्रेरणा देणार्या अनामिका सोनवणे-यादव यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला आढावा...
गणेशोत्सव, गावच्या वार्षिक जत्रोत्सवापाठोपाठ आता होळी-शिमग्यालाही कोरोनाचा डंख लागला आहे. ठाणे, मुंबई परिसरातील चाकरमान्यांना या सणांसाठी गावाकडे जाण्याचे वेध लागतात. परंतु, सरकारकडून शिमगा सणाबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने कोकणवासी संभ्रमात पडले आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता यंदा शिमगा साजरा करायचा की नाही? याबाबतचे नियम व अटी सरकारने स्पष्ट करावेत, असे गार्हाणे ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’ने घातले आहे.
कोरोना संकटाच्या काळानंतर ठप्प झालेला अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर येताना दिसतोय. मोदी सरकारला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबरमधील महसूल हा २०२०मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे.
देशभरात वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे गतवर्षी आजच्या दिवशी निधन झाले. भारतीय अर्थकारणातील एक आमुलाग्र बदल म्हणून या कायद्याकडे पाहिले जाते. १ जुलै २०१७ रोजीच्या मध्यरात्री संपूर्ण देशाने अकल्पित असा क्षण अनुभवला. देशभरातील विविध बाजारपेठा, उद्योगधंदे यांची गुंतागुंतीच्या करप्रणालीतून मुक्तता झाली. एक देश एक कररचनेमुळे मिळालेल्या नव्या संधी आणि फायदे पुन्हा देशासमोर ठेवणे ही जेटलीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.
श्री गुरुजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समिती मार्फत सध्या करोणा विषाणूचा वाढता प्रभाव व संचारबंदी मुळे प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याकरीता २२ आरोग्य रक्षकांना पुढील औषधी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कार्यातून सेवा संकल्प समिती सेवाभावी कार्य करत असल्याची प्रतिक्रिया समाजमनात उमटत आहे.
दि कल्याण जनता सहकारी बँकेचा ४६वा वर्धापन दिन साजरा
उल्हासनगरचे नामवंत उद्योजक अशी महेशभाई (खैरारी) अग्रवाल यांची ख्याती. 'रिजन्सी ग्रुप'च्या नावे संपूर्ण महाराष्ट्रात गृहसंकुलांची शृंखला त्यांनी उभारली आहे. रिजन्सी समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची ख्याती जितकी दूरवर परसलेली, तितकेच त्यांच्या विनम्रतेचे आणि साधेपणाचे किस्से सांगितले जातात. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
‘दि कल्याण जनता सहकारी बँक लि. संचालक समाजसेवा पुरस्कार निधी न्यास’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून २०१७ साली लक्ष्मीकांत उपाध्याय यांनी जबाबदारी स्वीकारली. गेली तीन वर्षे त्यांनी ही धुरा लीलया पेलली. संस्थेच्या अनेक उपक्रमांना त्यांच्या नेतृत्वात दिशा मिळाली. यंदाच्या ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ सोहळ्याच्या निमित्ताने दै. मुंबई तरुण भारतशी त्यांनी केलेली ही खास बातचित...
एका हॉटेलमध्ये काम करणारा साधा मुलगा आज कल्याणमध्ये 'भास्करशेठ' म्हणून अगदी सुपरिचित. आपल्या विनम्र स्वभावामुळे समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचा मान लाभलेले संचालक समाजसेवा पुरस्कारार्थी भास्कर शेट्टी यांचा उद्योजकीय प्रवास...
१९७० मध्ये ‘ठाणे जनता सहकारी बँके’ची स्थापना झाली. साधारणतः १९७१ साली ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’ची, तर २३ डिसेंबर, १९७३ साली ‘दि. कल्याण जनता सहकारी बँके’ची स्थापना झाली. मध्यंतरी लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “सहकार हा एक मंत्र व संस्कार आहे.” त्याच ध्येयाने ‘दि कल्याण जनता बँके’ची स्थापनेपासून वाटचाल सुरु आहे.
सध्या जगासमोर उभी असलेली गंभीर समस्या म्हणजे पाणीटंचाई व प्रदूषण होय. 'वृक्ष लावा वृक्ष जगवा' या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी 'दि कल्याण जनता सहकारी बँक कल्याण' आणि 'दि ठाणे भारत सहकारी बँक लि' या ठाणे जिल्ह्यातील दोन शेड्युल्ड सहकारी बँकांनी 'संचालक समाजसेवा पुरस्कार निधी' या अशासकीय संस्थेच्या सहकार्याने प्रकल्प राबविला.
“चांगल्या विचारांच्या चांगल्या व्यक्ती एकत्रित आल्या की, परिणाम चांगलेच होतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘दि. कल्याण जनता सहकारी बँक.” दि कल्याण जनता सहकारी बँके’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरव्यवस्थापक अतुल खिरवडकर यांनी ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ सोहळ्यानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख प्रस्तुत केलाच, पण बँकेच्या या प्रगतीचे श्रेय त्यांनी सहकारीवर्गालाही दिले. मुलाखतीतून त्यांनी व्यक्त केलेले विचार...