युरोपचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश म्हणून रशियाचा लौकिक होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर मात्र रशियाची जागा अमेरिकेने घेतली आहे. रशियावरील निर्बंधांमुळे गेल्या हिवाळ्यात युरोपला महागड्या दराने इंधन खरेदी करावी लागली. परिणामी, युरोपमध्ये महागाई वाढली. यंदा मात्र युरोपने अमेरिकी कंपन्यांबरोबर दीर्घकालीन करार करण्याला प्राधान्य देत ऊर्जा सुरक्षा केली आहे.
Read More
मुंबई : भारताच्या जी-२० अध्यक्षतेखालील उर्जा संक्रमण कार्य गटाची (ETWG) तिसरी बैठक १५ ते १७ मे २०२३ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जी-२० सदस्य देश, विशेष आमंत्रित देश तसेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (आयईए) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थामधील १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांशी योजनांपैकी एक असलेल्या सौभाग्य योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक खेड्यामध्ये विज पोहोचत आहे, उज्वला योजनेद्वारे देशातील प्रत्येक घरात स्वयंपाक गॅस जोडणीचे काम सुरू आहे. संपूर्ण जगाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब असल्याचे मत आंतरराष्ट्रीय उर्जा एजन्सीने (आयईए) व्यक्त केले आहे. स्वच्छ इंधनासाठी मोदी सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे भारतात प्रदुषणामुळे होणारे अकाली मृत्यूंचे प्रमाण घटल्याचेही ‘आयईए’ने म्हटले आहे.