( USA challenge to European Union ) अमेरिकेने जे आयात शुल्क लागू केले, त्याचा मोठा फटका युरोपीय महासंघ तसेच इंग्लंडलाही बसणार आहे. म्हणूनच तेथे मोठी अस्थिरता तसेच असंतोष उफाळल्याचे दिसते. ट्रम्प यांनी जे व्यापारयुद्ध छेडले आहे, त्याचा भारताला फायदा होणार असला, तरी जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होताना दिसून येईल.
Read More
जर्मनीत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे फ्रेडरिक मर्झ जर्मनीचे अध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे. युरोपातील जर्मनीचे स्थान बघता, एकूणच युरोपच्या भवितव्यावर परिणाम घडवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकातील निकालांचा आणि संभाव्य परिणामांचा घेतलेला हा आढावा...
युरोपियन महासंघातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणार्या जर्मनीमध्ये रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी निवडणुका पार पडतील. तेव्हा, या निवडणुकीत जर्मनीला भेडसावणार्या समस्यांना सामोरे जाणार्या पक्षाला तेथील नागरिक मतदान करतात की, पुन्हा एकदा विविध विचारसरणींचे पक्षच एकत्र येऊन खिचडी सरकार बनवितात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आगमनामुळे या निवडणुकीवर काय प्रभाव पडू शकेल, याचे विश्लेषण करणारा हा लेख...
अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो असं म्हणतात. आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीत हा ‘अनुभव’ ज्याचा त्याने मिळवायचा असतो. एकूण शिक्षणाच्या बजेटमध्ये अनुभवाचा खर्च समाविष्ट नसतो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थी पुस्तकी अभ्यासात अव्वल येतात, पण जेव्हा निष्ठूर जगाशी त्यांचा मुकाबला होतो, तेव्हा हाच अनुभव एक तर त्यांच्यासाठी ‘सुपर हिरो’ ठरतो किंवा ‘सुपर व्हिलन...’
युरोपियन युनियनच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या असून, यंदा उजव्या विचारसरणीच्या सदस्यांनी बाजी मारलेली दिसते. या निवडणुकीचा प्रभाव केवळ युरोपियन युनियन आणि युरोपातील राष्ट्रांपुरताच मर्यादित नाही, तर जगभरात त्याचे पडसाद उमटलेले आगामी काळात दिसतील. त्यानिमित्ताने युरोपियन युनियनची एकंदर रचना, तेथील निवडणुकांचे समीकरण आणि आता उजव्या विचारसरणीच्या सदस्यांच्या सरशीचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
युरोपीय महासंघाच्या दूध उत्पादनात यंदा घट होईल, अशी शक्यता एका अहवालात वर्तविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दूध उत्पादन कमी होणार असल्याने, उपलब्ध दुधाचा वापर कोणत्या उत्पादनासाठी करायचा, याची निवड काळजीपूर्वक करावी लागणार आहे. त्यामुळे भारतातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी ही एक नामी संधी ठरु शकते. त्याविषयी सविस्तर...
संपूर्ण युरोपाचा एक आवाज असणारी जागतिक संघटना म्हणजे युरोपीय महासंघ होय. पण याच युरोपातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. अनेक राष्ट्रवादी विचारधारा असणार्या लहान लहान पक्षांचे बळ युरोपात वाढत आहे. आशातच महासंघाच्या निवडणूका जवळ आल्याने, एकूणच तिकडच्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दमदार कामगिरी करत असून, देशाच्या सर्वंकष विकासाला चालना देत आहे. म्हणूनच आज सर्वच क्षेत्रांत देशाची विक्रमी गतीने वाढ होताना दिसते. विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतील वाढती गुंतवणूक आणि ‘युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन’सोबतचा भारताचा नुकताच संपन्न झालेला मुक्त व्यापार करार हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.
२०२२च्या प्रारंभी ठिणगी पडलेल्या, रशिया-युक्रेन युद्धाला आता ६५० हून अधिक दिवस लोटले. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, या युद्धात रशियाचे जवळपास ८० टक्के म्हणजे ३ लाख, १५ हजार सैनिक मृत्युमुखी पडले, तर दुसरीकडे युक्रेनच्याही दोन लाख सैनिकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे हा अहवाल सांगतो.
‘एक्स’, ‘टेस्ला’ आणि ‘स्टारलिंक’ या जागतिक कंपन्यांचे सर्वेसर्वा आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी नुकतीच इस्रायलला भेट दिली. काही दिवसांपूर्वी एका ज्यूविरोधी वक्तव्याला मस्क यांनी चक्क समर्थन दिले आणि त्यानंतर ते जागतिक टीकेचे धनी ठरले. या पार्श्वभूमीवर मस्क यांची इस्रायल भेट ज्यूविरोधी टीकेचा पश्चाताप की आणखी काही...?
इन्स्टाग्राम किंवा फेसबुक या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय असणाऱ्यांना नेहमीच एका गोष्टीचा कंटाळा येतो तो म्हणजे जाहिराती. जर आपण पाहिलं तर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर स्क्रोलिंग करत असताना बऱ्याचदा जाहिराती येत असतात. त्यामुळे युझर्स वैतागतात. यावर मेटा कंपनीकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘जी २०’चे संमेलन चालू असताना योगायोगाने अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे (The World As I see It) हे पुस्तक माझ्या वाचनात आले. हे पुस्तक वाचल्यानंतर मला असे वाटले की, २०२३च्या ‘जी २०’ संमेलनाची अनुकूल पृष्ठभूमी ज्या थोर पुरुषांनी केली, त्यात आईन्स्टाईन यांचे नाव घ्यावे लागेल.
भारताला थेट युरोपपर्यंत जोडणारा प्रकल्प म्हणून ‘आयएमईसी’कडे पाहावे लागेल. भारतीय मालाच्या निर्यातीला चालना देणारा, लाखो रोजगाराच्या संधी प्रदान करणारा; तसेच प्रदेशातील भारताचे महत्त्व वाढवणारा हा प्रकल्प आहे. विस्तारवादी चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाला समर्थ पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. अमेरिका, ‘युरोपीय महासंघ’ यात भारताचे भागीदार असणार आहेत.
अमेरिका, सौदी अरेबिया आणि इतर देश जी-20 शिखर परिषदेत भारत आणि युरोपसह अरब देशांना जोडण्यासाठी एक मोठा रेल्वे प्रकल्प आणि बंदर बांधण्यासाठी करारावर स्वाक्षरी करणार आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
गातील चौथ्या क्रमांकाची आणि युरोपमधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनी सध्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचा ‘जीडीपी’ ऋण ०.३ टक्क्यांनी घसरला होता, तर दुसर्या तिमाहीत या देशाचा आर्थिक विकास दर शून्य टक्क्यांवर राहिला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहे. जर्मनीतील या आर्थिक मंदीमुळे युरोपबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेलाही संकटाचा सामना करावा लागणार आहे.
रशियाला कमजोर करायचे अमेरिकेचे धोरण असले तरी या रशियाविरोधी खेळामध्ये ‘नाटो’मधील संपूर्ण देश आणि युरोपियन महासंघातील देश नुसते ओढले गेलेले नाहीत, तर ते सर्व देश आता मंदी, भडकलेली महागाई, बेकारी, अन्नधान्याची टंचाई यामुळे चिंताग्रस्त झालेले दिसतात.
रशियाची आर्थिककोंडी करण्यासाठी म्हणून ‘युरोपीय महासंघा’ने रशियावर निर्बंध लादले आहेत. मात्र, त्याचा विपरित परिणाम युरोपच्या अर्थव्यवस्थांवर झाला. ऊर्जा महागल्याने तेथील अर्थव्यवस्था मंदीकडे चालल्या आहेत. म्हणूनच युरोपातील काही देशांनी रशियाकडून ऊर्जा खरेदीचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या जीडीपीत घट नोंद झाली असली, तरी महसूल मात्र वाढलेला दिसून येतो. त्यावरुनच रशियावरील निर्बंध गैरलागू ठरले असल्याचे दिसून येते.
युरोपचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश म्हणून रशियाचा लौकिक होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर मात्र रशियाची जागा अमेरिकेने घेतली आहे. रशियावरील निर्बंधांमुळे गेल्या हिवाळ्यात युरोपला महागड्या दराने इंधन खरेदी करावी लागली. परिणामी, युरोपमध्ये महागाई वाढली. यंदा मात्र युरोपने अमेरिकी कंपन्यांबरोबर दीर्घकालीन करार करण्याला प्राधान्य देत ऊर्जा सुरक्षा केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराचा सामना करत असलेल्या मणिपूरबाबत युरोपियन युनियनच्या ब्रसेल्सस्थित संसदेत दि. १२ जुलै रोजी एक ठराव मांडण्यात आला, तो भारत सरकारने फेटाळला आहे. मणिपूरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून मणिपूर हिंसाचारावर भारताने आपली भूमिका स्पष्ट करूनही युरोपियन संसदेत ठरावावर चर्चा सुरू असल्याचे भारताचे म्हणणे आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानच्या एका प्रस्तावाचे नुकतेच समर्थन केले. पाकिस्तानने स्वीडनमध्ये वारंवार कुराण जाळण्याविरोधात ‘युएनएचआरसी’मध्ये एक प्रस्ताव मांडला होता. त्यावर मतदानादरम्यान भारताने पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले. ’युएनएचआरसी’मध्ये एकूण ४७ सदस्य असून, त्यात ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’चे (जखउ) १९ देशही समाविष्ट आहेत. या सर्वांनीच या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
भारताच्या सीफूड निर्यातीने २०२२-२३ मध्ये ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. भारताने आर्थिक वर्षात ६३,९६९.१४ कोटी (८.०९ अब्ज डॉलर) किमतीचे १.७ दशलक्ष टन सीफूड निर्यात केलं आहे.
नुकतीच भारताने समुद्री खाद्यान्नाची सर्वकालीन उच्चांकी निर्यात नोंदवली. २०१० मध्ये केवळ २.९ अब्ज डॉलर मूल्याची समुद्री खाद्यान्न निर्यात करणारा आपला देश, आज ८.०९ अब्ज डॉलर मूल्याची निर्यात करत आहे. तसेच २०२५ पर्यंत या क्षेत्रातील निर्यात दहा अब्ज डॉलरपर्यंत लक्ष्य केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. त्यानिमित्ताने...
भारताने रशियाकडून सवलतीच्या दरातील तेलाची विक्रमी आयात केली. मे महिन्यात रशियाने भारताला ४२ टक्के इतका तेलपुरवठा केला. गेले तीन महिने रशिया भारताचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश राहिला आहे. भारतातील तेल कंपन्या शुद्धीकरण केलेले तेल युरोपला निर्यात करून भरपूर पैसे कमवत आहेत. त्यामुळेच आता देशांतर्गत ग्राहकांना इंधनाचे दर कसे कमी करून देता येईल, हे पाहण्यासाठी केंद्र सरकारने तेल कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
फेसबुकृ, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइट्सची मूळ कंपनी मेटा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. जगातील आघाडीची सोशल मीडिया साइट मेटाला तब्बल १.३ अब्ज डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. युरोपियन युनियनने हा दंड ठोठावला आहे. EU ने गोपनीयतेशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात ही कारवाई केली आहे.
गेल्या वर्षीपर्यंत जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश अशी भारताची ओळख होती. ती पुसून युरोपला सर्वाधिक शुद्ध तेल पुरवणारा देश अशी भारताची नवी ओळख प्रस्थापित झाली आहे. ती सहजासहजी झालेली नाही. रशियावरील निर्बंधांनंतर परिणामांची पर्वा न करता, भारताने सवलतीच्या दरात मिळणार्या तेलाची आयात करण्याची संधी साधली. त्याचे सोने केले. म्हणूनच भारत स्वतःची गरज पूर्ण करून युरोपची तेलाची तहान भागवू शकला आहे. तेल निर्यातदार भारत ही नवी ओळख नक्कीच कौतुकास्पद अशीच आहे.
देशाच्या सैन्याचे कमांडर जनरल अब्देल-फतह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आरएसएफ)चे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्या संघर्षामध्ये सुदानची सध्या वाताहात सुरु आहे.
तैवान मुद्द्यावरून महासत्तांमध्ये भविष्यात उद्भवू शकणार्या संघर्षात युरोपने का सहभागी व्हावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकताच तीन दिवसांचा चीनचा दौरा केला. त्याचा केलेला ऊहापोह...
रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या लष्करी ताकदीच्या अवास्तव कल्पना उघड्या पडल्या आहेत. रशियाचे सैन्य कुचकामी ठरल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. युरोपीय महासंघाकडून युक्रेनला होणारी मदत बंद करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमधील एकी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी रशियाने नैसर्गिक वायू आणि तेलाचे शस्त्र उगारले आहे.
म्यानमारच्या सैन्याने दि. १ फेब्रुवारी, २०२१ रोजी २०२०च्या निवडणुकीत व्यापक निवडणूक हेराफेरीच्या कथित दाव्यांचा हवाला देत दुसर्यांदा निवडलेल्या ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’सरकारचे (एनएलडी) अधिकार ताब्यात घेतले होते. त्यावेळी म्यानमारच्या ‘स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की’ यांना इतर काही ‘एनएलडी’ नेत्यांसह अटक करण्यात आली आणि ‘एनएलडी’ पक्षावर ‘जंटा’ने बंदी घातली. सत्तापालटामुळे हुकूमशाही विरोधात निदर्शने झाली आणि देशव्यापी बहिष्कार, निषेध आंदोलन सुरू झाले होते. मात्र, या सत्तांतरानंतरच्या वर्षभरानंतर म्यानमारची
सध्या इस्लामिक कट्टरतावाद, अल्पसंख्याकांचा छळ, ईशनिंदा कायद्यांचा गैरवापर आणि पाकिस्तानमधील मानवी हक्कांचे उल्लंघन यामुळे पाकिस्तानच्या ‘जीएसपी’ स्थितीचे युरोपियन युनियनच्या संसदेद्वारे पुनरावलोकन केले जात आहे
“युक्रेनमधील परिस्थिती सातत्याने बिघडत असून तेथे अडकलेल्या नागरिकांच्या मानवी हक्कांचा गंभीर मुद्दा निर्माण झाला आहे. त्यामुळे युक्रेनमधील या मानवतावादी संकटाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,” असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत नुकतेच व्यक्त केले. युक्रेनमधील बिघडत चाललेली परिस्थिती आणि मानवतावादी संकटाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
ही सगळीच गणिते अत्यंत लहान गटांची आहेत, जी एकत्र येऊन एका मोठ्या समीकरणाला जन्म देतात. अखंड भारताचेही काही असेच आहे. धर्म, भाषा, वंश हे सर्व बाजूला ठेवले, तर वर उल्लेखलेल्या घटकांच्या आधारावर अन्य मंडळींनी भारताच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली एकवटायला हरकत नाही. विचार करायला काय हरकत आहे?
दोन्ही देशांची ही महत्त्वाकांक्षी शिखर परिषद आता होणारच नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. कोरोनाच्या टाळेबंदीवरील उपाय म्हणून डिजिटल प्रणालीचा अवलंब या शिखर परिषदेसाठीही करण्याविषयी विचार सुरू झाला आहे. अर्थात, या बातमीमुळे दोन्ही देशातील संबंधितांच्या आशा पल्लवित होतील.
भारताच्या मित्रराष्ट्रांनी पाकिस्तानच्या मित्रराष्ट्रांवर मिळवलेला हा विजय
भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या बाजारपेठेशी असलेले दृढ आर्थिक आणि व्यापारी संबंध ‘सीएए’सारख्या मुद्द्यावरून बिघडवण्याचे पाऊल युरोपीय संघ उचलणार नाही, असे सध्यातरी वाटते. कारण, डाव्या आणि मानवाधिकारवाल्या टोळक्याच्या नादी लागून आपले आर्थिक नुकसान कोण करुन घेईल?
जागतिक स्तरावर ‘ब्रेक्झिट’ हा विषय अतिशय गंभीर चर्चेचा विषय झालेला आहे. त्याच वेळी भारतात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) यावर रणकंदन माजलेले आहे. ‘ब्रेक्झिट’ म्हणजे काय आणि त्याचा संबंध ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’शी कसा येतो, हे आपण बघूया.
ब्रिटन जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था समजला जातो. त्यामुळे ब्रेक्झीटच्या चर्चा अनेकांची धोरणबदलास कारणीभूत ठरतात. आर्थिक दृष्ट्या आज जग एकमेकांत पुरते विणले गेलेले असल्यामुळे ब्रिटनच्या युरोपियन युनियन मध्ये असण्यानसण्यात अनेकांचे हित-अहित सामावलेले असते.
‘नाझी’च्या मुद्द्यावरून युरोपियन खासदारांनी ओवेसींना सुनावले
युरोपियन संघाचे प्रतिनिधी मंडळ काश्मीर दौर्यावर नुकतेच दाखल झाले. त्यावर 'बाहेरच्यांना काश्मिरात प्रवेश आणि येथील लोकप्रतिनिधींना का नाही,' असा सवाल प्रियांका गांधींनी उपस्थित केला. परंतु, भाजपचा हा अजब राष्ट्रवाद असल्याची टीका करणार्या प्रियांका गांधी आणि काँग्रेसने खरंतर राष्ट्रवादावर बोलण्याचा नैतिक अधिकार कधीच गमावला आहे.
पाकिस्तानच्या अस्थिर अर्थव्यवस्थेबरोबरच खोलवर रुतलेल्या नकारात्मक बाबी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गहिर्या मंदीच्या, अधिकधिक बेरोजगारीच्या आणि महागाईच्या दीर्घ दुष्टचक्रात ढकलू शकतात.
युरोपीय संघ आणि ब्रिटनशी संबंध ठेवणाऱ्या देशांवर ‘ब्रेक्झिट’चा प्रभाव पडणे स्वाभाविक आहे आणि अशा स्थितीत पाकिस्तानदेखील यापासून वेगळा राहू शकणार नाही.
पुलवामा हल्ल्यानंतर फसवेगिरी करणे, मनी लॉन्ड्रिंग, अतिरेक्यांना आर्थिक मदत करणे या आरोपाखाली पाकला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा युरोपियन युनियनचा निर्णय