नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण उत्पादन धोरणाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवून देशांतर्गत उत्पादनामध्ये १ लाख ६ हजार ८०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे २०२१ – २२ च्या तुलनेत त्यामध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रातील उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आर्थिक वर्ष २०२२ – २३ मध्ये भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राने प्रथमच १ लाख ६ हजार ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये खासगी क्षेत्राकडील आकडेवा
Read More
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना आयपीएस, रेल्वे संरक्षण दल आणि अंदमान-निकोबार, दिल्ली, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप पोलीस सेवेत नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी शुक्रवारी (दि. २५ मार्च) सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली. हा निर्णय अंतरिम असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
‘सी व्हिजिल २१’ युद्धसराव आणि आता त्या पाठोपाठ फक्त चार संरक्षण दलांचा सहभाग असलेला ‘टोपेक्स २१’ हा मुख्य युद्धसराव, याद्वारे देश, शांततेचा काळ अथवा युद्धकाळ यांत उभ्या राहू शकणार्या कोणत्याही सागरी आव्हानाला तोंड देण्यास सज्ज आहे, समर्थ आहे.
अमेरिकेच्या पेंटॅगॉन’ या संरक्षण मुख्यालयाने तीन तबकडक्यांचे व्हिडिओ शेअर केल्याने जगभरात या व्हिडिओत दिसणाऱ्या गोष्टींचे गूढ वाढते आहे.
संरक्षण सौद्यातील दलालांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांची हातमिळवणी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला.
आध्यात्मिक नगरी, द्राक्ष पंढरी, कुंभ नगरी अशा कितीतरी विशेषणांनी नाशिकची ओळख आजवर भारतासह जगातील इतर देशांना झाली आहे. अपवादाने कोणी तरी येथील एचएएल, करन्सी नोट प्रेस, तोफखाना केंद्र अशा आस्थापनांचा परिचय करून देत हेही नाशिकच आहे, असे सांगताना दिसते. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून नाशिक भारतीय संरक्षणदलासाठी केंद्र ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.