"ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक लष्करी अभियान नाही, तर बदलत्या भारताचे उदाहरण आहे. आपल्या सैनिकांनी दहशतवादी तळांचा अचूक नाश केला. हा त्यांच्या धैर्याचा आणि 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्रांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दि. २५ मे रोजी मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते.
Read More
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची सर्वसमावेशक धोरणेही उद्योगधंद्यांना बळ देत आहेत. म्हणूनच, हा नवा भारत आज जागतिक पातळीवर विश्वासार्ह आर्थिक भागीदार अशी स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेला दिसतो.
(Germany backs India in war against terrorism) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) हे सध्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून संयुक्त पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला जर्मनीने पाठिंबा दर्शवला आहे.
Yogi Adityanath on new india "हा नवा भारत आहे. तो कोणाचीही छेड काढत नाही. मात्र जर कोणी छेडलेच तर तो त्यांना सोडतही नाही.", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवार, दि. २३ मे रोजी अयोध्येत आयोजित 'श्री हनुमान कथा मंडपम'च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अयोध्येचे पुनरुज्जीवन, महाकुंभ आणि भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरवरही चर्चा केली.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आता युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.
ड्रग्जच्या व्यसनाने भारतातीलच नव्हे, तर जगभरातील तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त केले. नशेच्या जगात धुंद होऊन वावरणारे खरं तर जगत नसतात, तर दिवसागणिक आपल्या मृत्यूलाच ते आमंत्रण देतात. अशी ही ड्रग्जची समस्या केवळ एखाद्या राज्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण देशाला पोखरणारा एक जीवघेणी कीड आहे. ड्रग्जविरुद्धच्या या लढ्यात केंद्र सरकारनेही व्यापक मोहीम हाती घेत, राज्य सरकारपासून ते अगदी जिल्हा पातळीपर्यंत सामूहिक सहभागावर भर दिला आहे. तसेच, ड्रग्ज तस्करांचे जाळे हाणून पाडण्यासाठी, त्यामागील आर्थिक गुन्हेगारीचे पाळेमुळ
(Pakistan Army official threatens India in Hafiz Saeed's words) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई केली. मात्र, अजूनही पाकिस्तान सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. आता तेथील पाकिस्तानी लष्करानेही दहशतवाद्यांची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. 'जर तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू' अशी पोकळ धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.
(India To Urge FATF To 'Grey List' Pakistan Again) पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारत आणखी मोठं पाऊल उचलणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊन परकीय गुंतवणूक आणि भांडवलाचा प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे.
ईशान्य भारत अष्टलक्ष्मीचे मूर्त स्वरूप आहे, जे समृद्धी आणि संधी आणते. याच सामर्थ्यासह ईशान्येकडील प्रत्येक राज्य गुंतवणूक आणि नेतृत्वासाठी सज्ज असून ऊर्जा व सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी हा प्रदेश केंद्रस्थान बनत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अल्बर्ट आईनस्टाईन यांनी निसर्गातील मधमाशांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले होते की, “पृथ्वीतलावरून मधमाशा नष्ट झाल्या, तर पुढील तीन-चार वर्षांत मानवजातसुद्धा शिल्लक राहणार नाही.” कारण, मधमाशा वनस्पतींच्या परागीभवनात महत्त्वपूर्ण योगदान देतात. निसर्गसाखळीतील मधमाशांची घटणारी संख्या हा आज चिंतेचा विषय असून, त्यांची वसाहत वाढविणे ही काळाची गरज आहे. त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा अभ्यासपूर्ण लेख...
MPs will be representing the government abroad, the message that there is political consensus in India regarding this action will be sent abroad as well विरोधी पक्षांमधील फाटाफुटीचा आणि काही पक्षांतील आंतरिक दुफळीचा अचूक वापर करून मोदी यांनी काही विरोधकांच्या पाकिस्तानवादी भूमिकेला छेद दिला. परदेशात हे खासदार सरकारचीच भूमिका मांडणार असल्याने परदेशांतही भारतात या कारवाईबद्दल राजकीय एकमत असल्याचा संदेश जाईल. शिवाय, शिष्टमंडळातील विरोधी खासदारांच्या अंतर्भावामुळे भारतात खर्या अर्थाने लोकशाही नांदत असल्याचेही
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. 6E2142 क्रमांकाचे हे विमान असून त्याच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोमध्ये दिसतेय. वास्तविक दि. २१ मे रोजी दिल्लीहून श्रीनगर येथे रवाना होत असताना विमान अचानक आलेल्या खराब हवामानाच्या कचाट्यात सापडले. विमानात एकूण २२७ प्रवासी होते, विमानाच्या समोरील भागाचे नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
विशेष प्रतिनिधी पहलगाममध्ये दहशतवाद्य़ांनी धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानचा कणा मोडला आणि त्या चक्रव्युहात पाकला गुडघे टेकावे लागले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर येथे केले. राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करताना ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबुधाबी येथे युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयान यांची तर जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी भारताच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
(Chief Minister Devendra Fadnavis on Virtual Galaxy Infotech Company should contribute to realizing Digital India) डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्षा निवास्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टिंग झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.
( IPL playoffs update ) २०२५ आयपीएल हंगामाच्या प्ले ऑफच्या तिकीटासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहेत. बुधवार, २१ मे रोजीचा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. हा सामना आयपीएलमधील प्ले ऑफचं तिकीट कुणाला मिळणार हे ठरवणार आहे. प्ले ऑफमधील चौथे स्थान मिळवण्यासाठी मुंबई आणि दिल्ली संघासाठी आजचा सामना संधी आहे. त्यामुळे आता ही मॅच कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने कौतूकास्पद कामगिरी केल्याने देशभरात त्यांचा गौरव होत असताना काँग्रेसकडून मात्र, वारंवार त्यांचा अवमान करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे.
माझ्या वैज्ञानिक म्हणून लहानशा कार्यात नारळीकरांच्या एका सिद्धांताला पुराव्यांसोबत सिद्ध करण्याची संधी मिळाली. पुरावा सापडलासुद्धा, पण आज एक खंत वाटते की, मी थोडे धाडस नाही केले? की मी त्यांच्याशी संपर्क नाही साधला? आज कदाचित या अभिवादनातून मी अनंतात विलीन झालेल्या जयंत विष्णू नारळीकर या थोर महानुभावाशी थेट माझे मनोगत व्यक्त करू शकेन...
(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या
( India is not a dharmshala Supreme Court rejects Sri Lankan man’s plea for setting in india) “जगभरातील निर्वासितांना सामावून घेता येईल, यासाठी भारत ही धर्मशाळा नाही,” असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले. ‘बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्या’अंतर्गत अलीकडेच तुरुंगवास भोगलेल्या श्रीलंकेच्या एका व्यक्तीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना याविषयी टिप्पणी केली.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून भारतीय सैन्याचा अवमान करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागितले असून यामुळे उबाठा गटाची काँग्रेसी मानसिकता पुन्हा उघड झाल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.
(Veteran Nuclear Scientist M. R. Srinivasan passes away at 95) प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे निधन झाले आहे. मंगळवारी २० मे रोजी त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी तामिळनाडूतील उदगमंडलम येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारताने एक असा शास्त्रज्ञ गमावला आहे ज्यांनी देशाला अणुऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न साकार केले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक सामान्य लोक जखमी झाले किंवा त्यांचं नुकसान झालं. याच लोकांसाठी भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे.
( India-Pakistan Tensions ) “भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल,” अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’ची कोणतीही नियोजित चर्चा होणार नाही. दि. १२ मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी-शर्थी ठरवण्यात आल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची शेवटची चर्चा होती.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षामुळे क्रीडाविश्वावर विपरीत परिणाम झाला. अनेक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या, तर काही क्रीडापटूंना काही स्पर्धांना मुकावे लागले. या तणाव आणि अशांततेमुळे क्रीडा क्षेत्रावर होणार्या परिणामांचा घेतलेला हा आढावा...
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर होणारा संभाव्य हल्ला परतवून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. ८ मे रोजी रात्री, पाकिस्तानकडून पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन्स पाठवले गेले होते. त्याचा मुख्य उद्देश अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा होता. भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने या ड्रोन्सना आधीच वर्तवले होते. त्यामुळे नाश करणे सोपे झाले. या घटनेचा व्हिडिओ भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी ड्रोन्सना कसे पाडले हे दाखवले आहे.
Operation Sindoor new India पहलगाममधील पाकिस्तान पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून चोख प्रत्युत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे एकीकडे पाकिस्तानची लष्करी क्षमता क्षीण झाली, तर भारताच्या अचाट युद्धकौशल्याचे दर्शन जगाला झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामधील सुप्त घटनांचा हा घेतलेला आढावा...
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सेनादलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा-चिचोली ग्रामपंचायत क्षेत्रात आज सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे आणि सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती.
पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ
( Maharashtra in Khelo India Youth Championship) 'भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकाचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की ग्राउंड-हँडलिंग कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.
Bangladeshi in rajsthan पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आता कडक कारवाई सुरू झाली आहे. राजस्थानच्या अजमेर येथील स्पेशल टास्क फोर्सने बेकायदेशीररीत्या भारतात राहत असलेल्या फूलजान या बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली संबधित महिला ही गंज पोलीस स्टेशन हद्दीतील नागफणी परिसरात राहत होती. ती बांगलादेशच्या विविध भागात राहिली. त्यानंतर ती अजमेरला आली, तेव्हापासून ती नागफणी परिसरात राहत होती.
( pak ishak Dar exposed ) पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा आणखी एक बुरखा फाडण्यात आला आहे. भारताच्या कारवाईचे पुरावे द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात छापून आल्यानंतर पाकिस्तानच्या उपपंतप्रधांनांनी मुर्खपणाचा कळसच गाठला आहे. पाकचे मंत्री इशाक दार यांनी यूकेतील वृत्तपत्र असलेल्या ‘द डेली टेलिग्राफ’च्या पहिल्या पानाची बनावट प्रत तयार केली. ज्यात पाकिस्तानच्या हवाई दलाचे कौतूक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
( Loan to Pakistan means funding terrorism) भारत आणि पाकिस्तान यांच्या युध्द तणावाच्या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाला हिरवा कंदील दिला होता. आता या प्रकरणी अमेरिकेचे माजी अधिकारी असलेल्या मायकल रुबिन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला चांगलेच फटकारले आहे. एका अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मायकल रुबीन यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे.
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, आता त्याच ट्रम्प यांनी आपण केवळ तणाव निवळण्यासाठी मदत केली, असे म्हटल्याने, भारताची कूटनीतिक शक्ती अधोरेखित होण्याबरोबरच विरोधकही तोंडावर आपटले आहेत.
आपल्या शेजारचे राष्ट्र आपला किती द्वेष करते, हे युद्धविराम झाल्यानंतरदेखील दिसून येते. त्यामुळे येऊन-जाऊन पाकिस्तान्यांची तळी उचलणार्यांनी ‘उचलली जीभ’ असे प्रकार जे समाजमाध्यमांतून सुरू केले आहेत, त्याला जरा आवर घालावा. आपल्या शूर सैनिकांनी अतिशय अचूक मारा केला, म्हणूनच तुर्कीने पाकिस्तानला दिलेले ड्रोन नष्ट करण्यात यश आले, हे जरा ध्यानी ठेवावे. ते जर का भारतात पडले असते, तर पहलगामपेक्षा आणि काँग्रेस-डावे आणि पुरोगाम्यांच्या सरकारच्या काळात जेवढे दहशतवादी बळी गेले, त्यांपेक्षा कितीतरी बळी आपल्या देशात गेले
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जसा भारतीय सैन्याचा पराक्रम चर्चेत आला, तसेच पकिस्तानच्या फाळणीच्या चर्चेलाही उधाण आले होते. त्यातच बलुचिस्तानने स्वातंत्र्य घोषित करून भारत, संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांकडे पाठिंबादेखील मागितला. त्यामुळे पाकिस्तानचे तेथील प्रांतांवर होणारे जुलूम उघड झाले. पाकिस्तानातील परिस्थितीचा हा आढावा...
China, Turkey, Azerbaijan stood behind Pakistan even provided military assistance to Pakistan पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला. तरीही चीन, तुर्कीए, अजरबैजानसारखे काही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहिले. त्यांनी पाकला लष्करी मदतही केली. त्यामुळे साहजिकच या देशांविरोधात भारतातही संतापाची लाट उसळली असून, या देशांशी व्यापार-पर्यटनावरील बंदीची मागणी तीव्र झाली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला भारताने जोरदार दणका देण्यास सुरुवात केली आहे. या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी बुकिंग केलेल्या भारतीय नागरिकांनी त्यांची तिकिटे रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
( Masala King Dhananjay Datar ) “महाराष्ट्रातील नवउद्योजकांची उत्पादने दुबईसह संयुक्त अरब अमिरातीत निर्यात करण्यासाठी आम्ही मदत करू. तसेच दुबईच्या उंबरठ्यावरून जागतिक बाजारपेठेत व्यवसाय वाढवण्यास इच्छुक असलेल्यांना मनापासून मार्गदर्शन करणार आहोत,” असे प्रतिपादन मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी केले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर हल्ले केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठीकत पाकीस्तानच्या ठिकाणांचे झालेले नुकसान सॅटलाईट चित्रांच्या सहाय्याने दाखवले. पण पाकिस्तान ने हे सगळे खोटे आहे, असा दावा केला होता. मात्र, आता ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका रिपोर्टने पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
( Draupadi Murmu questions to Supreme Court ) विशेष प्रतिनिधी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या कलम १४३ (१) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला एक संदर्भ पाठवला आहे, ज्या अंतर्गत न्यायालयाने राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कायदेमंडळांनी अलीकडेच मंजूर केलेल्या विधेयकांना मान्यता देण्यासाठी वेळ मर्यादा निश्चित केली आहे. भारताच्या इतिहासातील हे एक दुर्मिळ पाऊल आहे.
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता पाकिस्तानने एक पत्र लिहीत सिंधू जल कराराचा पुनर्विचार करा अशी विनवणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.
(Minister Rajnath Singh warning ) विशेष प्रतिनिधी पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत, हे आता जगाने बघितले आहे. त्यामुळे पाकची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएइए) देखरेखीखाली येणे आवश्यक आहे, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जगाला दिला आहे.
जागतिक पातळीवर कालानुरुप औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगतीचे स्वरुपही आमूलाग्र पालटले. तांत्रिक आधुनिकीकरणासह सामाजिक विकास, पर्यावरणाशी सांगड यांसारख्या बाबींनाही आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झालेले दिसते. त्यानिमित्ताने ‘इंडस्ट्री 5.0’ या औद्योगिक टप्प्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यातील बदलांची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारा हा लेख...
विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. १४ मे रोजी ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात ५ हजार १२७ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून २७ हजार ५१० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
भारताच्या एआय-चालित, पूर्णपणे स्वयंचलित 'आकाशतीर' हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांदरम्यान आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्यांनी भारताच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताच धोक्यांना निष्प्रभ केले आहे. त्यामुळे पाकसाठी भारताची आकाशतीर प्रणाली ‘काळ’ ठरली आहे.
आदिवासी समाज हा आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी झगडत आहे. त्याचे जीवनमान स्थिर नाही. त्यासाठी त्यांना जमीनीची मोजणी करुन आणि नकाशा तयार करुन देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच जमीन मोजण्याबाबत काही आर्थिक आणि तांत्रिक धोरण तयार करता येईल का याबाबत जमाबंदी आयुक्तांकडून माहिती घ्यावी. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या मुळावरच घाव घातला. त्यामुळे पाकने आता अमेरिकेसमोर लोटांगण घालत काश्मीरवरुन कितीही कांगावा केला, तरी आता भारताकडून चर्चा होणार ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच!