इक्बालसिंह चहल यांना मुंबई पालिका आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी मराठमोळे अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणूका जाहीर होण्याआधी प्रत्येक मुंबईकराचा मताधिकार सुनिश्चित व्हावा या हेतूनं, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये नवमतदार नोंदणी विशेष मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ फेब्रुवारी रोजी ही विशेष मोहिम राबवणार आहे.आज मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, बेस्टचे व्यवस्थापकीय संच
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदुषणाच्या तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने एण्ड्रॉईडवर ‘मुंबई एअर’ नावाचे एक विशेष ऍप्लिकेशन विकसित केले आहे. मुंबईतील नागरिकांना या ऍप्लिकेशनचा वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील ऍपमध्ये दिली आहे. प्रारंभी एण्ड्रॉईड प्लॅटफॉर्
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता एकूण ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, गेली सलग दोन वर्षे मुंबई महापालिकेच्या निवडणूका झाल्या नसल्यामुळे प्रशासकांच्या हाती कार्यभार देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी मांडण्यात येईल, अशी चर्चा मुंबई महापालिकेत रंगू लागली आहे. प्रशासकीय राजवटीतील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. एकीकडे पालिकेच्या निवडणुकीबाबत असणारी अनभिज्ञता आणि लवकरच होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यां. व वि.) यांची सुमारे ४०० पदे आणि दुय्यम अभियंता (स्थापत्य, यां. व वि.) यांची सुमारे ३५० पदे अशी एकूण ७५० पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती तसेच पदोन्नतीमुळेदेखील रिक्तन पदात वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेतील कार्यरत अभियंत्यांवर रिक्त पदांचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांना मानसिक ताणतणावास सामोरे जावे लागत आहे, असा आरोप करत रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि सरचिटणीस यशवंत धुरी यां
केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला मुंबई महानगरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत लक्षावधी नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. यात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना फायदा मिळाला आहे. दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. आपल्या परिसरात येणाऱ्या या यात्रेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात
मलबार हिल येथील जलाशयाच्या टाकीची क्षमता वाढवण्याच्या संदर्भातील अहवाल देण्यासाठी स्थापन समितीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
मुंबईकरांना आकारण्यात येणार्या पाणीपट्टीत आठ टक्के दरवाढीसाठी जल अभियंता विभागाने मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यांकडे नुकताच प्रस्ताव पाठवला होता. त्यावर शनिवार, दि. २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीत प्रस्तावित केलेली दर सुधारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहे, असे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून नागरिकांच्या सुविधेसाठी उपनगर जिल्ह्यात विविध सोईसुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री कक्षाची स्थापना केली आहे. या उपमक्रमाचे कौतुक होत आहे. पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून शिक्षण, आरोग्य, उन्नतीकरण व सुशोभीकरण, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, जलपुरवठा इत्यादी सुविधा सुधारण्यासाठी आमूलाग्र बदल घडवण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये बृहन्मुंबई महापालिका कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षण विभागातील अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र, आरोग्य विभागातील आपला दवाखाना, पाळणाघर, रुग्णालय मदत कक्ष, स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालय (नवीन व नूतनीकरण), उद्यान विभागातील उद्या
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून नागरिकांच्या सुविधेसाठी उपनगर जिल्ह्यात विविध सोयीसुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री कक्षाची स्थापना केली आहे. पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून शिक्षण, आरोग्य, उन्नतीकरण व सुशोभीकरण, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, जल पुरवठा इत्यादी सुविधा सुधारण्यासाठी आमूलाग्र बदल घडवण्यात आले आहेत. पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून सुरु झाल
कॅबिनेट मंत्री तथा मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीबाबत पत्र लिहिले.
गणेशउत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीत महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्राद्वारे कळवले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध जागा रिक्त असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ने केला आहे. दि म्युनिसिपल युनियनने म्हटल्याप्रमाणे महापालिकेतील तब्बल ४२ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय सुविधा सुधारणा आणि रुग्णांसाठी पायाभूत सुविधा विकास करण्याबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सायन येथील लोकमान्य टिळक सामान्य रुग्णालयास भेट दिली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि संबंधित अधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या ६ तरण तलावांच्या संख्येत आता लवकरच आणखी एका तरण तलावाची भर पडणार आहे. यासाठी निमित्त ठरणार आहे, तो वडाळा येथील अग्निशमन केंद्र परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेला तरण-तलाव. यापूर्वी केवळ अग्निशमन दलासाठी राखीव असलेला हा तलाव १ ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी खुला करण्यात येत असून त्यासाठी ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
मुंबई : मुंबईतील पर्जन्य जल, मलनिसारण व इतर सेवांसाठी असलेल्या वाहिन्यांवरील प्रवेशमार्ग अर्थात मॅनहोल्सशी निगडित दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून या प्रवेशिकांमध्ये मजबूत अशा संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची प्रतिकृती देखील तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीनुसार मुंबईतील सर्व मॅनहोल्स मध्ये या जाळ्या टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार असून त्यादृष्टीने लवकरच कार्यवाही सुरु होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिलक्क नसल्यायन ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. १ जुलै पासून पालिकेकडून मुंबईमध्ये १० टक्के पाणी कपात करण्यात आली असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा न वाढल्यास पुढील आठवड्यापासून १५ टक्के पाणी कपात करण्यात येण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून बुधवार दिनांक २८ जून रोजी मुंबईतील मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कौशल महेंद्र दोषी (वय ३८)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवार सकाळपासूनच मुंबईत पावसाची रिमझिम सुरु असून मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरातील मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे ३५ फूट उंचीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. यावेळी झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल या ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबई उपनगरातील काही भागांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून मिलन सबवे येथे प्रत्यक्ष भेट देऊन पावसात पाणी साठू नये म्हणून यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पावसामुळे सांताक्रुझ परिसरातील मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली असून मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी पंपिंगद
मुंबई, दि. २२ : भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने मुंबईतील संभाव्य दरडी कोसळण्याच्या २४९ ठिकाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाआधारे २४९ पैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक घोषित केली आहेत. या ७४ ठिकाणांच्या निकटच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य धोका उद्भवल्यास काय करावे, काय करू नये; याचे प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत २५० नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण यापुढेही सुर
मुंबई : मुंबईतील कचरा एकाच ठिकाणी जमा करता यावा याकरिता मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी २४० लिटर क्षमतेच्या मोठ्या आकाराच्या कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र यातील बहुतांशी कचरापेड्यांची दुर्दशा झाल्यामुळे पालिकेकडून मोठ्या आकाराच्या कचरापेट्यांची नव्याने खरेदी करण्यात येत आहे. दरम्यान सुमारे १२,००० कचरापेट्या खरेदी करण्यात येत असून एक ते दीड वर्षांपूर्वी दोन हजारांनी खरेदी केलेल्या कचरापेटीची किंमत २,४६६ रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे या कचरापेट्यांच्या किंमतीत सुमारे ४०० रुपयांची वाढ झाली आहे.
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षलागवडीचा पर्याय हा कधीही फायदेशीर. परंतु, मुंबईसारख्या फारसे मोकळे भूखंड नसलेल्या शहरात वृक्षलागवडीलाही मर्यादा येतात. त्यावरच उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मियावाकी वनांच्या उभारणीला वेग दिला. तेव्हा, या मियावाकी वनांचे फायदे व मुंबईतील या वनांची सद्यस्थिती याचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मुंबईतही मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्याकडून देण्यात आली आहे. विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्त
देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने तयारी सुरू केली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.तसेच मुंबई महापालिकांच्या रुग्णालयातदेखील दि.११ एप्रिलपासून मास्क वापरण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) अशा २० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यानुसार त्यांचा कायापालट येणार आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु असताना, मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई –२’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती झाली होती. त्यामुळे दिनांक २७ मार्च २०२३ पासून पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱया या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते.
मुंबई महानगर क्षेत्रातील हवा प्रदूषण विशेषतः धूळ नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशान्वये गठीत करण्यात आलेली समिती आणि तांत्रिक सल्लागार समिती यांची संयुक्त बैठक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. यात हवा शुद्धीकरण तंत्रज्ञान क्षेत्रातील ७ ते ८ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी या समितीसमोर आपापल्या तंत्रज्ञानाची माहिती सादर केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगर पालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते.
'गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे, आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट बनविले जात होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र, २५ वर्ष कायम असलेले हे आता नुकत्याच जाहीर झालेल्या बजेटमुळे बदलले आहे. मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे मुंबईकरांच्या मागण्या आणि अपेक्षा याचा विचार करून त्यानुसारच तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन अन कंत्राटदारांचे नसुन मुंबईकरांचेच आहे,' या शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
कोरोना काळातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरुन मुंबई महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांची ईडी चौकशी सोमवारी तीन तास चौकशी झाली. कोविड जंबो सेंटरचे कंत्राट देत असताना अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांची ईडीने चौकशी केली आहे. चहल यांनी ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असतानाच मुंबई महापालिकेसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती समोर येत असून ईडीने चहल यांना सोमवार १६ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचेही माहिती समोर आली आहे.
नालेसफाईची पोलखोल या विषयासंदर्भात भाजप आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे. मुंबईतील अपूर्ण नालेसफाई संदर्भातील कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांना कुठल्याही प्रकारची देयक रक्कम वर्ग करु नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
दरवर्षी मुंबई महापालिका मुंबईतील खड्डे बुजवण्याचा दावा करते, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करते पण इतके पैसे खर्च करूनही मुंबईत खड्डे पडतातच. या खड्यांमधून जीव मुठीत घेऊन वाट काढत राहणे हे आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडले आहे
मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेचे आयुक्त आणि विद्यमान प्रशासक इकबालसिंह चहल यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे ‘शिवसेना नेते विरुद्ध महापालिका आयुक्त’ हा सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दि. ७ मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने सध्या पालिकेचा कारभार आयुक्त असलेल्या प्रशासकांकडे सोपविण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या कारभारावर आ. नितेश राणेंचे आरोप
मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधील गाळ काढणे आणि रस्त्यांवरील चर पुनर्बांधणी या दोन कामांची निकड लक्षात घेता त्यासाठीच्या मिळून एकूण ३० निविदांना महापालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे
मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली चार समित्या स्थापना करण्यात येणार आहेत. स्थायी समिती, सुधार समिती, महापालिका आणि या व्यतिरिक्त असलेल्या समित्यांपैकी इतर एक समिती, अशा एकूण चार समित्या असण्याची शक्यता आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल हा ७ मार्चपर्यंत होता. तो कार्यकाळ संपल्यामुळे पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे.
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी संबंधित चौकशीत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली होती
गायक सोनू निगम यांना मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या नातेवाईकांकडून धमकी देण्यात येत असल्याची माहिती आ अमित साटम यांनी विधानसभेत दिली. तसेच राज्य सरकारने इकबाल चहल आणि त्यांच्या नातेवाईकावर कारवाईची मागणीही केली.
बई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडींनंतर, महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनाही आयकर विभागाने समन्स बजावले होते
मार्च महिन्याचे १५ दिवस उलटले आहेत तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील नालेसफाई अजून सुरु झालेली नाही
मंगळवारी झालेल्या स्थायी समिती समितीची सर्व कागदपत्रे तातडीने ताब्यात घ्यावीत आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, चिटणीस कार्यालय, प्रशासकीय समिती व कंत्राटदार यांचे कॉल डिटेल्स तपासावेत, अशी लेखी मागणी भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे केली आहे
ताडदेव येथील 'सचिनम हाईट्स' या इमारतीला आगीत झालेल्या मृत्यूंसाठी अग्निसुरक्षा यंत्रणेतील गंभीर त्रुटी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या चौकशी समितीने काढला आहे
ताडदेव येथील आगीच्या दुर्घटनेतील राशिवाश्यांवर पालिकेकडून नव्या वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झालेले नसल्याने भाड्याच्या घरात राहायची वेळ आलेली आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल आज मुंबईमहापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प आज सादर करतील.
मुंबई महापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प गुरूवार, ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी तो सादर केला. मात्र नेहमी होणाऱ्या सभांप्रमाणे हा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात न घेता तो प्रत्यक्षात सादर केला गेला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात होणे हे मुंबईकरांचे दुर्दैव असल्याची टीका भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली हाती. त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रत्यक्षात अर्थसंकल्प सादर करणे भाग पडले.
ठराविक कंत्राटदारांना कामे मिळवून देण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न ; पालकमंत्री अस्लम शेख यांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप