जागतिक पर्यावरण व्यवस्थेत महासागरांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. जलचक्राचे होणारे व्यवस्थापन हे केवळ अन् केवळ महासागरांवर अवलंबून आहे. विविध उद्योग, दळणवळण, पर्यटन यात सागर व सागर किनारे यांचे महत्त्व वेगळे विशद करण्याची नक्कीच आवश्यकता नाही.
Read More
दरवर्षी ८ जून रोजी आपण महासागरात राहणारे प्राणी आणि त्यांच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक महासागर दिन साजरा करतो. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार हे महासागर पृथ्वीच्या ५० टक्के 'ऑक्सिजन'चे उत्पादन करते. त्याचबरोबर जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील निर्णायक आहे.
जगातील महासागर, समुद्र, नद्या-नाले, ओढे, पर्वत इतकेच काय, जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टदेखील मानवनिर्मित कचर्यामुळे आच्छादित झालेले दिसते. इतकेच काय तर पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर अंतराळातही असाच कचरा तरंगतोय.