पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
Read More
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या 'एकात्म मानवदर्शन ' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल, त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी समाजात आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक करावे असे, आवाहन भाजपचे अखिल भारतीय संघटन महामंत्री व्ही. सतीश यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव अंतर्गत सर्व धर्मीय अध्यात्मिक साधकांच्या संवादाचा विशेष कार्यक्रम रुईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, साठ वर्षांनी, २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते.
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
pandit Deendayal Upadhyay national liberation thoughts पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दि. 22 ते 25 एप्रिल,1965 दरम्यान एका ऐतिहासिक व्याखानमाला सादर केली होती. त्या माध्यमातून ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ अशा विचारांची दीनदयाळजींनी मांडणी केली. याच पार्श्वभूमीवर ‘एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रोद्धारक विचारांचा घेतलेला आढावा...
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
राज्यभरात येत्या २२ ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून शासनाच्या सर्व विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी दिले.
आज दि. ११ फेब्रुवारी... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची ५७वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने दीनदयाळजींनी मांडलेल्या ‘एकात्म मानवतावाद’ या चिरंतन तत्त्वज्ञानाचे हे चिंतन...
मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलो. आजन्म मी त्यांच्या विचारांवर माझी वाटचाल सुरू ठेवली, असे प्रतिपादन माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले.राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शनिवार, दि. ९ मार्च रोजी बोरीवली पूर्व येथील गोपाळजी हायस्कूलमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे मुंबई अध्य
राजकारण्यांची भौतिकवादी मानसिकता त्यांना लोभी, अहंकारी आणि भ्रष्ट बनवते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. वाजपेयीजी, दीनदयाळजी आणि मोदींजीसारखे संघ प्रचारक जेव्हा राजकारणात वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि लोकाभिमुख कारभार पाळतात, तेव्हा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की, कोणी इतका नि:स्वार्थी कसा असू शकतो?
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतातील अशा विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी ‘विचारांचे स्वराज’ - म्हणजेच ‘भारतीय मनाचे उपनिवेशीकरण’ हा विचार मांडला. भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला आहे. पण, वैचारिकदृष्ट्या अजूनही वसाहतवादी मानसिकता मोठ्या प्रमाणात रुजू आहे. तेव्हा, नवीन संसद भवनाचे होणारे राष्ट्रार्पण आणि ‘भारत काय विचार करतो, याकडे जगाचे लक्ष आहे,’ या पंतप्रधान मोदींच्या विधानाचा एकात्म मानवदर्शनाच्या माध्यमातून मांडलेला हा विचार...
देवेंद्र फडणवीसांनी काल विधिमंडळात सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे ‘अंत्योदया’चे पंचामृतच! केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांना पूरक, राज्याच्या सर्वांगीण विकासाला समर्पित, सर्व जातीधर्म-व्यवसायांना सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक, संतुलित अर्थसंकल्प निश्चितच महाराष्ट्राचा भाग्योदय करणारा ठरेल.
प्रत्येक गावात ‘कोऑपरेटिव्ह‘ संलग्न करून ‘सहकारातून समृद्धी‘च्या मंत्रासह प्रत्येक गावाला समृद्ध करणं, ही सहकाराची मुख्य भूमिका आहे. सत्तारूढ सरकारचे धोरण हे दीनदयाळ उपाध्याय यांच्या या कल्पनेनुरूप आहे. शहरासमवेत सरकार ग्रामीण क्षेत्रात सहकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलत आहे. दुग्धोत्पादन, खते तसेच बँकिंगसारख्या क्षेत्रांत सहकाराच्या यशानंतर आता सरकार सर्व क्षेत्रांत हे लागू करण्यासाठी पुढाकार घेते आहे.
हवामान बदल, कोविड महामारी, रशिया-युक्रेन युद्धामुळे पसरलेली अस्थिरता यांमुळे जगभरात गोंधळ माजला असून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवड्यामुळे जगातील गरीबांचे जगणे बिकट झाले आहे. जागतिक स्तरावरील पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत. अशा स्थितीस तोंड देण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे प्रचंड सामाजिक दरी निर्माण झाली आहे.
आज, दि. 11 नोव्हेंबर रोजी ‘सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अॅण्ड रिसर्च’च्या (उखडठ) वतीने पुणे येथे ‘एकात्म मानव दर्शन संकल्पना कोश’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता हा प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. भारतीय संकल्पनांचा नेमका अर्थ उलगडणार्या ‘एकात्म मानव दर्शन - ग्लॉसरी ऑफ कंसेप्ट्स’ या विशेष कोशाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन समारंभास अध्यक्ष
सर्पिलाकार मंडलाकृतीच्या केंद्रस्थानी व्यक्ती, व्यक्तीशी संबंधित एक वर्तुळ कुटुंबाचे, कुटुंबाशी संबंधित एक वर्तुळ समाज, जात, नंतर राष्ट्र, विश्व आणि नंतर अनंत ब्रह्मांड व सर्वजण एकमेकांचे पूरक आणि सहकारी, कोणातही संघर्ष नाही, असे ‘एकात्म मानवदर्शन’ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी २२ ते २५ एप्रिल १९६५ दरम्यान मुंबईत दिलेल्या व्याख्यानांमध्ये प्रस्तुत केले. त्या पृष्ठभूमीवर ‘एकात्म मानवदर्शना’विषयीच्या लेखाचा आज दुसरा व अखेरचा भाग...
सर्पिलाकार मंडलाकृतीच्या केंद्रस्थानी व्यक्ती, व्यक्तीशी संबंधित एक वर्तुळ कुटुंबाचे, कुटुंबाशी संबंधित एक वर्तुळ समाज, जात, नंतर राष्ट्र, विश्व आणि नंतर अनंत ब्रह्मांड व सर्वजण एकमेकांचे पूरक आणि सहकारी, कोणातही संघर्ष नाही, असे ‘एकात्म मानवदर्शन’ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी २२ ते २५ एप्रिल १९६५ दरम्यान मुंबईत दिलेल्या व्याख्यानांमध्ये प्रस्तुत केले. त्या पृष्ठभूमीवर ‘एकात्म मानवदर्शना’विषयीच्या लेखाचा आज पहिला भाग...
आज भारताच्या संसदीय राजकारणात चारही दिशांनी ‘कमळ’ उमलल्याचे दिसते, त्याच्या मूळाशी एकात्म मानव दर्शनच आहे. त्याची सर्वात सहज आणि प्रखर अभिव्यक्ती नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्वाच्या रुपात आपल्या समोर प्रकट होत आहे.
भारताच्या राजकीय क्षितिजावर दीनदयाळ उपाध्याय यांच्या रूपाने एक नवा तारा उदयास आला होता. पण, दुर्दैवाने अवघ्या ४३ दिवसांतच उपाध्याय यांची हत्या झाली. इतिहासाच्या पानात आजही ती एक गूढ बनून राहिली आहे. आज पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त या एकूणच घटनाक्रमावर प्रकाश टाकणारा हा लेख...
उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी आज २५ सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनाचे ट्विट केले होते. मात्र, काही वेळातच हे ट्विट त्यांनी डिलीट करून टाकले आहे. याची चर्चा आता राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे. एकात्म मानववाद देशाला देणाऱ्या राष्ट्रपुरुषांना अभिवादन केल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ट्विट डिलीट करण्याची वेळ का यावी, याबद्दल खुद्द अजित पवारांनीच उत्तर दिले आहे.
आज २५ सप्टेंबर, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. त्यानिमित्ताने ‘एकात्म मानवतावादा’ चे वैश्विक चिंतन पाहूया...
पंडित दीनदयाळ यांच्या कार्यातून प्रतेकाने प्रेरणा घेणे गरजेचे
खासदार सुखदेव धिंडसा यांनी संसदेत प्रश्न विचारला असता केंद्रीय गृहराज्यमंत्री रेड्डी यांनी ही माहिती दिली
पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज ५१ वी पुण्यतीथी. देशभरात भाजपकडून आज विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतीधीनिमित्त भाजपतर्फे समर्पण दिवस घोषित केला आहे. ११ ते १५ फेब्रुवारीपर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतीथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून प्रत्येक बूथवर समर्पण दिवस साजरा केला जाणार आहे. पंडित दीनदयाल यांच्यापासून प्रेरणा घेत सामाजिक जीवनातील प्रामाणिकपणा जपत हा दिवस साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनाला आज चार दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांचे चिंतन आजही ताज्या फुलांप्रमाणे टवटवीत आहेत.
आपली वाटचाल जुन्याच ध्येयधोरणांवर वा तत्त्वांवर आधारित असावी का? याचा विचार करता आता आपल्याला देशविकासासाठी स्वतःची नवीन मॉडेल्स, धोरणे, योजना, तत्त्वे तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.
२०१५ साली जेव्हा मोदींनी सर्व गावात वीज पोहोचविण्याची घोषणा केली, तेव्हा त्यासाठी ७५ हजार ६०० कोटींची तरतूद केली होती. आज आपल्याला त्याच्याच परिणाम स्वरुप सर्व देश उजळलेला दिसतो.