मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसेच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Read More
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
मुंबईतील गिरणगाव म्हणजे संस्कृतीचे संचित घेऊन जगणारी नगरी. या नगरीचा उगम, त्यातील कामोगारांची चळवळ, इथल्या निरनिराळ्या माणसांच्या गोष्टी हे सारे वैभव अशोक राणे यांनी आपल्या ‘आणखी एक मोहेंजोदारो’ या माहितीपटात रेखाटले आहे. नुकतेच ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलना’त या माहितीपटाचे प्रदर्शन पार पडले. त्यानिमित्ताने या माहितीपटाचा घेतलेला आढावा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत मराठी भाषेचा जागर नागरिकांना अनुभवायला मिळाला. गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या शोभायत्रेमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. या शोभायात्रेत मोठ्या प्रमणात युवकांनी आपला सहभाग नोंदवला. विविध चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन या शोभायात्रेत नागरिकांना अनुभवायला मिळाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा याव
Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी पहाट
विल्यम शेक्सपियर हा नाटककार प्रत्येक पिढीला नव्याने उलगडत जातो. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’पासून ते अगदी विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ या सिनेमापर्यंत, शेक्सपियरच्या लिखाणाची जादू लोकांना नव्याने अनुभवायला मिळते. प्रायोगिक रंगभूमीच्या विश्वात शेक्सपियरच्या लिखाणाचे नवनवीन अर्थ लावले जातात. मानवी वर्तनाचे विलक्षण पैलू शेक्सपियरच्या लिखाणात आपल्याला सापडतात. परंतु, याच शेक्सपियरचा वापर सांस्कृतिक वर्चस्ववाद प्रस्थापित करण्यासाठी, काही शतकांपूर्वी सुरू झाला होता. हाच सांस्कृतिक वर्चस्ववाद पुसण्यासाठी, शेक्सपियरच्या
डॉ. शंकर तत्ववादी यांचे दि. १३ मार्च रोजी हिंदू धर्मासाठी समर्पित जीवनाची ९३ वर्षे पूर्ण होण्याच्या एक आठवडा आधी निधन झाले. दि. २० मार्च २००८... दिल्लीच्या झंडेवाला येथील केशव कुंज संघ कार्यालय. गुरुवार असल्याने सकाळची शाखा विविध क्षेत्रांतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. शंकरराव दिल्लीत असल्याने त्यांनीही हजेरी लावली. दि. २० मार्च हा त्यांचा वाढदिवस असल्याचे लक्षात येताच, सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कोणीतरी ’जीवेत शरदः शतम्’ म्हटले, तेव्हा शंकरराव संकोचले आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्
प्राध्यापक डॉ. शंकररावजी तत्ववादी हे एक प्रख्यात विद्वान, शिक्षक आणि समर्पित स्वयंसेवक होते, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या जागतिक मोहिमेसाठी अर्पण केले. १९३३ साली जन्मलेले तत्ववादी राष्ट्रनिर्माण आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी भारतात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या मोठ्या योगदानासाठी ओळखले जात. तत्ववादी यांचे शैक्षणिक जीवन अत्यंत प्रगल्भ होते. त्यांनी नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तून ‘डॉक्टरेट’ प्राप्त केली. त
( Maharashtra Cultural Bhavan to be built in Mumbai Ashish Shelar ) महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक भवन आणि वस्तू संग्रहालय मुंबईत उभारणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी विधानसभेत केली. वांद्रे कुर्ला संकुलात साडेतीन ऐकर हून अधिक जागेवर ही भव्य वास्तू उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी जेएनपीएने निर्यात-आयात सह देशांतर्गत कृषी वस्तू-आधारित प्रक्रिया आणि साठवणूक सुविधा विकासासाठी दोन प्रमुख भागधारकांसह सवलत करारांवर स्वाक्षरी केली आहे. अंदाजे २८५ कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मोड अंतर्गत डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) मॉडेलवर विकसित केला जाईल.
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु होऊन, आता तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. लाखोंच्या संख्येने झालेल्या मनुष्यहानीनंतरही, हा संघर्ष थांबण्याचे नाव नाही. अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर या संघर्षाला पूर्णविराम मिळेल, या आशेवर कोट्यवधी लोक जगत आहेत. युद्ध ही गोष्ट भीषण आहे, पण त्याहून भयावह म्हणजे या युद्धाचा परिणाम! दुसर्या विश्वयुद्धानंतर अनेक राष्ट्रांना स्थिरस्थावर होण्यासाठी, काही दशकांचा काळ जावा लागला. या दशकांमध्ये झालेली राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरांमुळे, जगभरातील समाजमन ढवळून निघाले. वर्तमा
महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेले सांस्कृतिक धोरण, मराठी संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांना व्यापणारे आहे. या सांस्कृतिक धोरणात आपल्याला कुठल्या नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत, या सांस्कृतिक धोरणाचा तुमच्या माझ्या जीवनाशी नेमका काय संबंध आहे, याविषयी सविस्तर जाणून घेतले. राज्यसभेचे माजी खासदार, तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या निमित्ताने, दै. ‘मुंबई तरूण भारत’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीमधला हा अंश.
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
" महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण तयार झाले असून, येणाऱ्या काळात या लोककेंद्रीत सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे " असे प्रतिपादन सांस्कृतिक समितीच्या अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ३ मार्च रोजी मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. यावेळी पद्मश्री गिरीष प्रभुणे, संगीतका
पावसापाण्यावर चाललेला पिकांवरचा संवाद आपल्याला जुनाच! पण ‘पावसाचा परिणाम उत्पादनावर फारसा होणार नाही,’ हे कधीतरी ऐकू येईल का? तर तशी शक्यता नाकारता येत नाही. भारतातील शेतीविषयक आमूलाग्र बदल वर्तवलेला ‘अन्नटंचाई ते धान्यसंपन्नता’ अशा आशयाचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला; त्याचेच हे आकलन...
भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात(अपेडा) अॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा या डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.
Orange Festival महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पने अंतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनमागे आहे.
मुंबई : "मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार" असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी केली आहे. तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.
एखादा देश एखाद्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होतो, तेव्हा त्या यशामागे अनेकांचे बहुमोल योगदान असते. शास्त्रज्ञ असो वा शेतकरी, ( Agricultural Museum ) या सर्वांचेच मोल राज्यकर्त्यांना समजले पाहिजे. तसे न झाल्यास, राष्ट्राच्या प्रगतीसाठी ते अहितकारक ठरते. रशियाच्या बाबतीत हे चपखल लागू होते. शास्त्रज्ञांच्या दूरदृष्टीमुळे रशिया अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला, या सत्याचा हा मागोवा...
मुंबई : राज्यातील गड किल्ल्यांवरील ( Forts ) अतिक्रमण काढण्यासह नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी शनिवार, दि. १८ जानेवारी रोजी दिली.
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने मेसर्स ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कन्सोर्टियम) यांना निर्यात-आयात सह देशांतर्गत कृषी कमोडिटी-आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधा उभारण्यासाठी पुरस्कार पत्र जारी केले. या प्रकल्पासाठी अंदाजे २८४ कोटी रुपये इतका खर्च येईल. हे केंद्र पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये २७ एकर जमिनीवर बांधण्यात येणार आहे.
ठाणे : सिमेंट, कॉक्रीटच्या जंगलात विकासाचे इमले उभे राहत असले तरी पायाभूत सुविधासाठी निसर्गातील शाश्वत पर्यायाची गरज निर्माण झाली आहे. या अनुषंगाने सौर उर्जा ( Solar Energy ) आणि पर्जन्य जल यासारख्या पर्यावरणपुरक बाबींकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. ठाण्यात पार पडलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामधील प्रदर्शनात पर्यावरणपुरक सुविधा पुरवणाऱ्या स्टॉलवर हजारो नागरीकांची झुंबड उडाल्याचे दिसुन आले.
शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'च्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीर्घ काळाचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी हा निर्णय दिला आहे. बाजार समितीच्या मासिक सभेला सात वेळा गैरहजर राहिल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे : कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्यावतीने (दि.३० मार्च) गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा २५ वे वर्षे आहे. त्यामुळे यंदाची हि हिंदू नववर्ष ( hindu new year ) स्वागतयात्रा अनोख्या पद्धतीने करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यंदाच्या स्वागत यात्रेत तरुणाईचा सहभाग वाढावा म्हणुन आयोजकांनी युवा दिनाचे औचित्य साधून १२ जाने. रोजी शहरात युवा दौड आयोजित केली आहे. यासाठी शहरातील विविध संस्थांना जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला, अनुभवायची संधी दिली. महोत्सवाची ही पर्वणी अशीच लाभत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१४मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या दहा महिन्यातच त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावं लागलं. २०१५मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसच प्रमाण कमी होतं, परिणामी २०१५च्या ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोर जाण्याची वेळ आली. शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे पीक घेता येत नव्हती तर दुसरीकडे पाण्याअभावी पीक जाळून गेली. जनावरांना पुरेसा चारा, पाणी नव्हतं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाचा सामन
भारत हा कृषिप्रधान देश असला, तरी देशातील शेती ही आजही पावसावरच अवलंबून आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर हवामानाचे अचूक अंदाज उपलब्ध व्हावे आणि सरकारी यंत्रणेवरील शेतकर्यांचे अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने ग्रामपंचायत स्तरावरील हवामान अंदाज देणारा एक स्तुत्य उपक्रम नुकताच सुरू केला. त्यानिमित्ताने देशातील अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींना लाभदायी ठरणार्या पण तरीही चर्चेत नसलेला विषय समजून घ्यायलाच हवा.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार व बापू भेगडे यांची निवड करण्यात आली असून या पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे.
(Maharashtra Film, Stage and Cultural Development Corporation) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी अमोल जाधव यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
(CM Eknath Shinde) पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशाच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, १३,९६६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सात मोठ्या प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली असून कृषी संशोधन, डिजिटल शेती आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आगरी समाजाला पूर्वी जी वागणूक मिळत होती त्याबद्दल दुःख होत असे. त्यातुनच काहीतरी प्रगती करण्यासाठी समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचा अट्टाहास होता. तो आमचा उद्देश सफल झाला. आता समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाला असून, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक मानाने समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आगरी युथ फोरम डोंबिवलीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संकुल येथे 32 व्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करणार असून यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत. कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट, आयसीइए) वतीने आयोजित होणारी
भारतातून अमेरिकेत होणाऱ्या प्राचीन वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान 'सांस्कृतिक संपत्ती करार' करण्यात आला आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीची ४६ वी बैठक झाली.
"मी २५ देशांत जाऊन आले पण त्या देशांतील त्यांच्या सगळ्या संस्कृती मृत बनल्या आहेत. त्यांना त्यांच्या संस्कृतीविषयी अजिबात जिव्हाळा उरलेला नाही. याउलट आपल्याकडे इतकी आक्रमणं झालेली असतानाही आपण आपल्या संस्कृतीला घट्ट चिकटून आहोत आणि ती संस्कृती आपण जिवंत ठेवली आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी त्याग केला असून तो जिवंत ठेवण्यासाठी मी हा यज्ञ पुढे नेत आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य यांनी केले आहे. शनिवार, २९ जून रोजी ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन सप्तरंग आयोजित 'सरस्वती पुरस्कार
चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईतील सर्वात मोठा 'योगा ऑन स्ट्रीट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ३ हजार योग साधक दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात. दरम्यान शुक्रवार दि. २१ जून २०२४ रोजी चारकोप मार्केट, कांदिवली (पश्चिम) मुंबई येथे सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच या भव्य-दिव्य अशा 'योगा ऑन स्ट्रीट' कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चारकोप कल्चरल अॅण्ड स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी केले आहे.
राज्यातील प्रजेला सुखी आणि समाधानी करायचे असेल, तर राज्यात उत्तम शासन व्यवस्था आणि त्याचबरोबर कृषीपूरक वातावरण हवे, याचे महत्त्व अहिल्यादेवी पुरते जाणून होत्या. राज्यातील शेतीचा विकास व्हावा, तसेच व्यापार वृद्धिंगत व्हावा आणि राज्य समृद्ध व्हावे, यासाठी अहिल्यादेवींनी केलेल्या अनेकविध क्रांतिकारक उपाययोजनांचा आढावा घेणारा हा लेख...
वैयक्तिक दुखाने कोलमडून गेले तरीसुद्धा त्या कठीण समयीसुद्धा समाजाच्या कल्याणासाठीचे व्रत अंगीकारणारे मुंबईचे शेखर पारखी. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
भारताने ऑस्ट्रेलियाच्या कृषी उत्पादनांना आयात शुल्कात सवलत दिल्यास, तो भारताला अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करेल, असा एक प्रस्ताव ऑस्ट्रेलियाने नुकताच भारताला दिला. तसेच साठवणूक करण्यासाठीचे प्रगत तंत्रज्ञानही भारताला देण्याचे आश्वासनही ऑस्ट्रेलियाने दिले. कृषीहित विचारात घेऊन, त्यावर निर्णय झाल्यास दोन्ही देशांना त्याचा नक्कीच लाभ होईल.
गोकूळ जाधव या उच्चशिक्षित तरुणाने पारंपरिक शेतीत संकरित गव्हाचा प्रयोग करत भरघोस उत्पन्न तर मिळवलेच, पण सोबतच इतर शेतकर्यांचे मार्गदर्शनही केले. त्यांची ही यशोगाथा...
आय.बी.पी.एस संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषीत करण्यासाठी आय.बी.पी.एस संस्थेस कळविले गेले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालय पुणेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानचंद्र गित्ते यांनी कळविले आहे.
फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असणार्या तुषार प्रल्हाद काळभोर यांच्या आजवरच्या प्रयोगशील प्रवासाची ही कहाणी...
राज्य सरकारकडून व्यावसायिक नाटकांसाठी देण्यात येणारे प्रलंबित अनुदान अदा करण्याबरोबरच नाटकांच्या अनुदानाच्या रकमेत दुप्पट वाढ करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. या बाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी दिले.
सप्टेंबर २०२३ मध्ये ’युनेस्को’ने आपली जागतिक वारसा स्थळांची ताजी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतातील दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे बंगालमधील शांतिनिकेतन आणि दुसरं म्हणजे कर्नाटकातील होयसळ राजांनी बांधलेली अप्रतिम वास्तुकलेचे नमुने असलेली तीन मंदिरं.
‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या 'शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठा'तील सात विद्यार्थ्यांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या काश्मिरी विद्यार्थ्यांवर १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर जल्लोष करण्याचा आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप
कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना मंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भाजप नेते पाशा पटेल सध्या या आयोगाचे अध्यक्ष आहेत. राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा, या दुहेरी उद्देशाने राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.