Corruption

पुणे भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल

Chandrashekhar Bawankule पुणे जिल्ह्यातील भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराच्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांनंतर भूमी अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांच्या विरोधात पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई केली.

Read More

भ्रष्टाचाराविरुद्ध संवेदनशीलता वाढवून सत्यनिष्ठेची संस्कृती जोपासूया!

‘केंद्रीय दक्षता आयोगा’च्या निर्देशाप्रमाणे, यावर्षी दि. २८ ऑक्टोबर ते दि. ४ नोव्हेंबर, या कालावधीत देशभरात भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज सक्षम करण्यासाठी सप्ताह घोषित करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या सर्व संबंधितांना एकत्र आणून जनप्रबोधन करणे व भ्रष्टाचारामुळे पीडित असणार्‍या लोकांपर्यंत पोहचून त्यांना दिलासा देणे, हे या सप्ताहाचे उद्दिष्ट. त्यामुळे शासन कारभारात व सामान्य प्रशासनात नैतिकता व पारदर्शीपणाचे महत्त्व याबद्दल अधिक संवेदनशीलता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्व नागरिकांच्या साहाय्याने

Read More

भाजपचा ३७० जागांवर विजय म्हणजे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना आदरांजली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० जागांवर विजय प्राप्त करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यक्त केला. भाजपच्या दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनास नवी दिल्लीतील प्रगती मैदानस्थित भारतमंडपम येथे प्रारंभ झाला. यावेळी सकाळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस संबोधित केले. त्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

Read More

मोदी सरकार आणणार काँग्रेसकालीन घोटाळ्यांवर 'हा ' नवा पेपर

मोदी सरकारने युपीए सरकारच्या कथित गैरव्यवहारांची पोलखोल करण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याचे ठरवले आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी काळात झालेला भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाने ठरवले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या निर्णयाची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांची प्रतिमा पारदर्शक असली तरी याकाळात मात्र अनेक मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे चर्चेत आली. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा ,चारा घोटाळा अशा घोटाळ्य

Read More

हे तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक!

भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली दोनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे, तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्

Read More

ईडी प्रमुख कोणीही असो, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रमुखपदावर कोणीही व्यक्ती असला, तरीदेखील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होणारच; अशा इशारा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. ईडीचे विद्यमान प्रमुख संजय कुमार मिश्रा यांच्या कार्यकाळास मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. त्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Read More

भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये ५५ महानगरपालिका कर्मचारी बडतर्फ, तर ५३ कर्मचारी निलंबित

मुंबईकरांना सर्वोत्कृष्ट नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपल्या कामकाजात देखील तितकीच उत्कृष्ट शिस्त राखण्यावर कटाक्ष ठेवला आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले ५५ कर्मचारी बडतर्फ / सेवेतून कमी केले / सेवेतून काढून टाकले तर सदरच्या गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेले ८१ याप्रमाणे एकूण १३४ कर्मचारी निलंबित करुन महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास कचरत नसल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121