उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये, मशीद समितीने घोष कंपनी चौकातील अबू हुरैरा मशिदीचे अवैध बांधकाम पाडण्याचे काम सुरू केले आहे. ही मशीद अवैधपणे बांधण्यात आली होती. गौरखपूर विकास प्राधिकारणाने १५ दिवसांपूर्वी अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. नोटीशीचा कालावधी संपल्यानंतर मशीद समितीने शनिवारी १ मार्च रोजी स्वत:च बांधकाम पाडण्यास सुरूवात केली.
Read More
(Nilesh Rane Malvan) भारताविरोधात घोषणाबाजी एका परप्रांतीय भंगार व्यावसायिकाला भलतीच महागात पडली आहे. आ. निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेताच, या परप्रांतीयाच्या अनधिकृत दुकानावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. मालवण नगर परिषदेने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी ही धडक कारवाई केली.
Madani Masjid तोडफोडीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश प्रशासनाला भूमिका घेण्यास सांगितली. या प्रकरणामध्ये न्यायालयाने अधिकाऱ्यांना या प्रकरणी नोटीस जारी केली. तसेच दोन आठवड्यांत त्यामागील उत्तर लवकरात लवकर द्यावे अशी मागणी केली. या प्रकरणाबाबत पुढील सुनावणीपर्यंत मशिदीच्या कोणत्याही भागाचे आणखी नुकसान करु नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात ९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशासनाने अवैध बांधकाम मशीद मदनी पाडली. मशिदीचा नकाशा मंजूर नसल्याने आणि त्यातील काही भाग पोलीस ठाणे आणि नगरपालिकेच्या जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचे आढळून आले. यामुळे अवैध मशिदीवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली.
bulldozers उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये जुबैद नावाच्या वकट्टरपंथीने सती मठाच्या अवैध जमिनीवरील दुकानांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी ८० चौरस मीटर जागेवर बेकायदेशीरपणे अवैधरित्या दावा करण्यात आला होता. यामुळे मठाच्या शेजारी असलेल्या जागेवर करण्यात आलेल्या कब्जामुळे हद्दीत वाढ निर्माण झाली होती. तक्रारीवरून प्रशासनाने अवैध दुकानांवर बुलडोझर फिरवर जमिनीचा ताबा सोडण्यास भाग पाडले.
Jama Masjid उत्तर प्रदेशातील संभलच्या चंदौसीमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले. या कारवाईअंतर्गत शहरातील मुन्सिफ रोडवर असलेल्या न्यायालयासमोर बळकावलेली व बांधलेली अवैध दुकांनावर पालिका प्रशासनाने बुलडोझर चढवत बांधकाम जमीनदोस्त केले.
Mukesh Chandrakar छत्तीसगडमधील विजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्रकार हत्या प्रकरणात प्रशासनाने आरोपीवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपी काँग्रेस नेते आणि कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे. प्रशासनाने बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरूवात केली आहे या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी सुरू आहे. तसेच आरोपींची तीन बँक खाती जप्त करण्यात आली आहे.
Khwaja Garib Nawaz Dargah राजस्थान प्रशासनाने अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याजवळ असलेल्या अवैध जागेत असलेले बांधकाम बिलडोझरने तोडले. यावेळी असलेल्या संबंधित दुकानावर आणि इतर लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. अतिक्रमण हटवताना दुकानदारांनी प्रशासनाशी वाद घालण्यास सुरूवात केली. याप्रकरणाबाबतची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासन सांगितले. ही घटना गुरुवारी २६ डिसेंबर २०२४ रोजी घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
Illegal Construction मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील तासगंज येथील कोटा येथे असलेल्या रामजानकी मंदिराच्या सुमारे ९ विविध जागांवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. आता हे अतिक्रमण हटवण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत या जमिनीवर १०० कोटी एवढा खर्चांएवढी बांदलेली भिंत आणि इतर बेकायदा बांधकामे शनिवारी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी बुलडोजझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.
नवी दिल्ली : ( Jammu-Kashmir ) जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर बुलडोझरची कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची घरे जमीनदोस्त केली जातील, असा इशारा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला आहे. या कारवाईबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बहराइच येथील झालेल्या हिंसाचारात आरोपींच्या घरावर बुलडोझरच्या कारवाई होत आहेत. हे प्रकरण आता मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील डॉ. गजेंद्र सिंह यादव यांनी आयोगात याचिका दाखल करून आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्यास बंदीची मागणी केली आहे. असे कृत्य केल्यास मानवी हक्कांचे उल्लंघन असेल असे ते म्हणाले आहेत.
Bulldozer Pattern उत्तर प्रदेशातील कानपूर येथे मुबीन नावाचा कट्टरपंथी मामा-भांजे या नावाने रेस्टॉरंट चालवत होता. त्याने आपली ओळख लपवून अवैध खाद्यपदार्थ विकल्याचा आरोप आहे. मुबीनने शाकाहारी जेवणाच्या नावाखाली अवैध मांसाहरी पदार्थ विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कानपूर महापालिकेने आता त्यांच्या रेस्टॉरंटवर बुलडोझर चालवला असल्याची माहिती आहे.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात महाराजगंज येथील शहरातील हिंसाचाराची घटना घडली होती. आता त्याच ठिकाणी बुलडोजरची कारवाई केली जाऊ शकते. प्रासरामाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनासने बेकायदा बांधकामांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या वृत्तानुसार दुर्गा विसर्जन मिरवणुकीवेळी हल्ला केला होता. त्यावेळी दगडफेक, विटा आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. या हिंसाचारात १३ ऑक्टोबर रोजी राम गोपाल मिश्राची हत्या करण्यात आली होती.
Land Jihad लँड जिहादविरोधात (Land Jihad) छत्तीसगड येथील भिलाईच्या महानगरपालिकेच्या पथकाने अवैध अतिक्रमण उद्घ्वस्त केले. करबला समितीने धार्मिक बाबींसाठी संबंधित जागा दिली होती. मात्र त्या जागांवर कट्टरपंथींनी दुकाने, हॉल बांधले आहेत. यामुळे आता उच्च न्यायालयाने महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सांगितले. यामुळे महापालिकेच्या पथकाने संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे काम केले आहे.
उत्तरप्रदेशातील आयोध्येत समाजवादी पार्टीचे सपाचे नेते मोईद खान (Moid khan Ayodhya) यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोईद खानच्या बेकरीवर बुलडोजर चढवला आहे. तसेच मोईद खानच्या इतर संपत्तीची देखील चौकशी केली जाणार आहे. मोईद खानने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मात्र, खासदार अवदेश प्रसाद यांनी वकिलपत्र घेतलं. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नेते आणि मंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई केली
उत्तर प्रदेशातील बरेली येथील गौसगंजमध्ये मोहरमच्या दिवशी उपद्रव निर्माण करणाऱ्या आरोपींवर योगी सरकारने बुलडोझरची कारवाई केली आहे. आरोपी इर्शादच्या दोन घरांचे बेकायदा बांधकाम प्रशासनाने बुलडोझरच्या सहाय्याने पाडल्याची बातमी समोर येत आहे. मोहरमच्या दिवशी उपद्रव निर्माण करणाऱ्यांविरोधात शासनाचा हा निर्णय महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीनंतर घेण्यात आला आहे.
जुहू येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम मुंबई महापालिकेने तीव्र केली आहे. जुहू चर्च मार्गावरील 'व्हाईस ग्लोबल तपस बार' ने केलेल्या अंदाजे ३ हजार ५०० चौरस फुटाच्या वाढीव, अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या वतीने दि. १० जुलै रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. स्वयंपाकघर, तळमजला आणि बंदिस्त छतावरील वाढीव, अनधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवण्यात आला. वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहने यांच बारमध्ये पार्टी केल्ययाची माहिती आहे.
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या बेकायदेशीर संपत्तीवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आझम खान यांच्या 'हमसफर रिसॉर्ट'वर बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे. मंगळवार, दि. ९ जुलै २०२४ करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या संख्येने पोलीस दल उपस्थित आहे. या कारवाईच्या विरोधात आझमची पत्नी न्यायालयात गेली होती, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. हे रिसॉर्ट सरकारी जमिनीवर बांधलेले आहे. याविरोधात भाजप आमदार आकाश सक्सेना यांनी तक्रार दाखल केली होती.
मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील एका गावातून सातत्याने गोहत्या, तस्करी आणि गोमांसाचा व्यापार होत असल्याच्या बातम्या आल्यानंतर प्रशासनाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. शुक्रवार, दि. १४ जून २०२४, प्रशासनाने गौतस्करीशी संबंधित गावात छापा टाकला, ज्यामध्ये ११ घरांमधून गायींचे अवशेष सापडले. या घरांमध्ये गायींचे अवशेषही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचवेळी १५० जिवंत गायींचीही सुटका करण्यात आली, त्यानंतर प्रशासनाने बुलडोझरची कारवाई करत सर्व ११ घरे जमीनदोस्त केली आहेत.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा योगींचा बुलडोझर फिरला आहे. लखनौ विकास प्राधिकरण (एलडीए), लखनौ महानगरपालिका आणि पोलिसांनी लखनौच्या अकबरनगरमधील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरची कारवाई सुरू केली.
गुजरातमधील मेहसाणाच्या खेरालू येथील हटाडिया बाजार परिसरात बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. हा तोच भाग आहे जिथे दि. २१ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्री रामाच्या शोभा यात्रेत दगडफेक झाली होती. खेरालूच्या हातडिया मार्केट आणि जकातनाक्याजवळ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. हा तोच भाग आहेत जिथे प्रभू रामाच्या दर्शनावर कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली होती.
मुंबईतील मीरा रोडवर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मीरा रोडवर करण्यात आलेल्या हिंसाचारातील आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते.
उत्तराखंडच्या सरकारने बेकायदेशीर मदरशावर मोठी कारवाई केली आहे. उत्तराखंडमधील नैनीताल येथील बेकायदेशीर मदरशावर बुलडोझर चालवण्यात आले आहे. यासोबतच बेकायदेशीरपणे बांधलेली शौचालये आणि टिनशेडही पाडण्यात आले आहे.
आसाममधील मदरसे म्हणजे जिहादी दहशतवादाचे केंद्रबिंदू असल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी वारंवार अधोरेखित केले. एवढ्यावरच न थांबता, दहशतवादी कनेक्शन सिद्ध झालेल्या तीन मदरशांवर त्यांनी अलीकडेच बुलडोझरही फिरवला. पण, नुकतेच अशाच एका जिहादी मदरशाला तेथील स्थानिक मुस्लिमांनीच जमीनदोस्त करुन राष्ट्रदोही शक्तींना थेट आव्हान दिले आहे.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील गावात हुंडा न दिल्यामुळे एका महिलेला घरातून बाहेर काढण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलेला बुलडोझरच्या सहाय्याने घरी सोडले. इतर वेळी बुलडोझरचा वापर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी केला जातो. परंतु, या वेळी बुलडोझरच्या सहाय्याने एका महिलेला घरी सोडण्यात आले.
उत्तरप्रदेश मधील माफियाराज संपवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरु केलेल्या बुलडोझर कारवाईने आतापर्यंत चांगलेच यश मिळवले असून गेल्या पाच महिन्यात तब्बल ८६८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे
कार्यक्षम आणि कर्तबगार सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून मंगळवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नुकत्याच घरे आणि अन्य इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या कारवाईचे समर्थन केले आहे. ही कारवाई करताना कायद्याचे पूर्णपणे पालन करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे.
प्रयागराजमध्ये झालेल्या हिंसाचार घटनेचा सूत्रधार मोहम्मद उर्फ जावेद पंपच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत मुळेशाह दर्ग्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवला आहे. ही कारवाई रविवार दि. 15 मे रोजी करण्यात आली. या कारवाईचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. समाजवादी पक्षाने प्रशासनाच्या या कारवाईला विरोध दर्शवला आहे.
शाहीनबागेत सुरु झालेल्या बुलडोझर कारवाईस स्थानिकांचा जोरदार विरोध बघायला मिळत आहेत. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेकडून ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईला होणाऱ्या नागरिकांच्या विरोधामुळे या कारवाईस पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे
मशिदीचे नाव ज्ञानवापी कसे, नंदीचे तोंड मंदिराकडे नव्हे, तर मशिदीकडे कसे? ही हिंदूंना जाचणारी प्रतीकेच नव्हे, तर काय आहेत? मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर आणि शाही ईदगाह मशिदीचा मुद्दाही असाच आहे. अनेक ऐतिहासिक पुराव्यांतून इथली मशीद मंदिर उद्ध्वस्त करून बांधल्याचे समोर आलेले आहे. हिंदूंनी त्या प्रतीकांचे जाच किती दिवस सहन करायचा?
दिल्लीतील जहांगीरपुरी येथे महानगरपालिकेच्या अतिक्रमणाविरोधातील कारवाईवर स्थगिती कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील राजगढमध्ये अनेक वर्षे जुने हिंदू मंदिर जमीनदोस्त करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अधिकाऱ्यांनी मास्टरप्लॅनचा हवाला देत 'रस्ता रुंदीकरण' मोहिमेत 85 हून अधिक हिंदू कुटुंबांची घरे पाडली मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारच्या या निर्णयावर टीका होत आहे.