आसाम रायफल्स आणि मिझोरामच्या नार्कोटिक्स विभागाने ऐझॉल येथे केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये एकूण ९.५१ लाख रूपयांच्या ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला असून, एकूण ३ जणांना अटक करण्यात यश आले आहे. शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी जिरीबम येथे ही कारवाई करण्यात आली होती.
Read More
पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आल्यानंतर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मिझोरामधील आयझॉन येथील दगडखाणी कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. वादळामुळे संततधार पावसामुळे आयझॉनमधील दगडखाणी कोसळली आहे.
लोकसभा निवडणुकीस अवघे काही महिने बाकी असताना, आपल्या इच्छित स्थळी म्हणजे सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी पक्ष निघाले तर आहेत. मात्र, गोलचक्करभोवतीच गरगर फिरण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे दिसत आहे. यातून वेळीच मार्ग न काढता आल्यास सत्तेपर्यंत तर सोडा; मात्र सत्तेच्या जवळपासही पोहोचणे, त्यांना शक्य होणार नाही.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने विजयी झाला, तर तेलंगणा काँग्रेसकडे गेला आणि मिझोराममध्ये नवीन पक्ष झेडपीएम सत्तेवर आला. ज्या राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली तेथे थेट काँग्रेसशीच स्पर्धा होती. आम आदमी पार्टी (आप), जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि समाजवादी पार्टी (एसपी) यांनीही या राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, या सर्वच पक्षांच्या उमेदवारांना आपले डिपॉ
मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार विरोधी पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) वर प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे. झेडपीएम सध्या २९ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट फक्त ७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ३ आणि काँग्रेस अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.
मिझोराममध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास ३० ते ३५ वर्षांनी परिवर्तन झाले मणिपूर हिंसाचाराची छाया दिसून आली. राज्यात काँग्रेसला अवघी एक १ जागा मिळाली आहे. त्याचवेळी मिझो नॅशनल फ्रंटचा (एमएनएफ) एकछत्री अंमल संपून जोरम पीपल्स मुव्हमेंटचा (झेडपीएम) सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागच्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिजोराम राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु होती. आज शेवटच्या टप्यात तेलंगणा राज्यात ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. यानंतर लगेच सर्वच वृत्तवाहिन्यांवर एक्झीट पोलची चर्चा सुरु झाली.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगण या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून, आता रविवारी म्हणजे दि. ३ डिसेंबर रोजी साधारणपणे दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वच राज्यांच्या सत्तेचे चित्र स्पष्ट झालेले असेल. या निवडणुकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रमुख चेहरा घेऊन भाजपने निवडणूक लढविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल राज्य नेतृत्वास पुढे करण्यात आले होते. मात्र, खरी लढत ही ‘पंतप्रधान मोदी विरुद्ध विरोधी पक्ष’ अशीच होती.
मिझोराम आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (७ नोव्हेंबर) रोजी पूर्ण झाले. दोन्ही राज्यांतील मतदानात मतदारांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिझोराममधील ४० जागांवर आणि छत्तीसगडमधील ९० पैकी २० जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमधील ७० जागांसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
मणिपूरमधील हिंसक घटनांवरून विरोधकांच्या हल्ल्यांदरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला असला तरी, गेल्या ९ वर्षांत ईशान्य भागात शांतता आहे.
निवडणूक आयोगाने राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली होती. या पाच राज्यांमध्ये ७ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत निवडणूका होणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यापासून या पाचही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केली आहे.
निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा सोमवारी जाहीर केल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर, तर छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे सर्व राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
मिझोराममधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. मिझोराममध्ये एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला आहे. या अपघातात जवळपास १७ कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदकार्य सुरू आहे.
शिक्षण्याची जिद्द असेल तर माणूस कितीही त्रास सहन करायला तयार होतो. शिक्षणासाठी झटणारे अनेक लोक आपण बघितले आहेत. पण 78 वर्षांच्या वयात तब्बल 3 किलोमीटर पायी चालत शाळेत जाणाऱ्या आजोबांची गोष्ट नुकतीच पुढे आली आहे.
मणिपूरमध्ये कुकी समुदायाविरोधात हिंसाचार झाला असून, यामुळे मिझो तरुण दुखावले आहेत, असा त्यांचा दावा आहे. राज्य न सोडल्यास मिझोराममध्ये राहणार्या मैतेई लोकांना काही झाले, तर त्याला ते स्वतः जबाबदार असतील, अशी धमकीही त्यांनी दिली. मिझो हेदेखील कुकी वंशाचे असल्याचा या संघटनेचा दावा. त्यामुळे त्यांनी केवळ मैतेई समुदायालाच राज्य सोडून जाण्यास सांगितले आहे.
मणिपूरमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेजारच्या मिझोराममध्ये ही त्यांची छळ पोहचली. त्यामुळे भीतीचं वातावरण असलेल्या मिझोरममध्ये राहणाऱ्या मैतई समुदायाचे लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती पाहता मणिपूर सरकारनेही लोकांना हवाई मार्गाने आणण्याची ऑफर दिली आहे.
एकीकडे मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मिझोराममधील मैतई समुदायाला आता धमक्या आल्या आहेत. मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ST (अनुसूचित जमाती) दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितले होते, ज्यामध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे कुकी समाजातून संताप व्यक्त होत आहे. आता मिझोराममधील मैतई समुदयाला धमकी मिळाली आहे. जर त्यांना त्यांच्या जीवावर प्रेम असेल तर त्यांनी राज्य सोडावे, अशा स्वरुपाची धमकी मैतई समुदायाला देण्यात आलेली आहे.
'मोचा' चक्रिवादळ हे १६० किमी प्रतितास आणि १८० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील अतितीव्र ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत आहे. त्याच्या प्रभावाखाली आज पश्चिम बंगाल,ओडीशा, बांग्लादेश, आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर अतिवृष्टी अपेक्षित आहे. भारतात त्रिपूरा , मिझोराम, नागालँड, अरूणाचल प्रदेश, आसाममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच महाराष्ट्रात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात उष्माघाताने ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात प्रत्येकाचा आनंदी राहण्याकडे कल वाढत आहे. गुरुग्राम येथील ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ने विविध निकषांवर केलेल्या पाहण्यात देशातील सर्वाधिक आनंदी राज्य म्हणून मिझोरमची निवड केली आहे.
“भारतात राहणार्या सर्वांचा ‘डीएनए’ एकच आहे, सगळे भारतीय हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्यात ‘डीएनए’ समान आहे,” असे विधान सरसंघचालक मोहनराव भागवतांनी केल्यावर देशभर प्रतिक्रिया उमटल्या. संघाला आता हिंदू आणि हिंदुत्वाशी काहीहीदेणंघेणं नाही इथपासून ते भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणेला अनुसरून संघ आता मुस्लीम अनुनय करतो आहे इथपर्यंत या प्रतिक्रिया होत्या. याच्या दोन्ही बाजू तपासण्याची आवश्यकता आहे. सुरुवात दुसर्या बाजूपासून करू...
ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपसाठी आनंदाचे वातावरण असतानाच, देशाच्या राजकारणातही अनेक संदेश दिले आहेत. २०२३ वर्षातील निवडणुकांची ही सुरुवात होती. कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येही यावर्षी विधानसभा निवडणुका होतील. त्यानंतर पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल. तेव्हा, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होणार्या या विधानसभा निवडणुका आणि त्यांचे निकाल हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण, यातून कोणते राजकीय पक्ष किती पाण्यात आहेत, याची कल्पना येणार आ
देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वेगवान पूर्ततेसाठीच्या ‘गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान’अंतर्गत ४०व्या ‘प्रगती बैठकी’स संबोधित केले. यावेळी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच त्यांनी राज्यांना राज्यस्तरावरही ‘गतिशक्ती मास्टर प्लान’ तयार करण्याचे आवाहन केले.
मणिपूर... डोक्यावर म्हणजे उत्तरेला नागालॅण्ड, दक्षिणेला मिझोराम, पश्चिमेला आसाम आणि पूर्व सीमा म्यानमारला सामायिक असणारे हे राज्य. मणिपूर म्हणजे आश्चर्यकारक गमतीजमतींचा पेटाराच. विस्तारवादाच्या हव्यासापायी ब्रिटिशांनी अनेक युद्धे करून भारतावर सत्ता मिळवली. यातले शेवटचे युद्ध 1891 साली मणिपूरच्या भूमीवर लढले गेले. म्हणजे मणिपूर तोपर्यंत स्वतंत्र राज्य होते आणि नंतर १९४४ साली एप्रिलमध्ये नेताजींच्या ‘आझाद हिंद फौज’ आणि ‘जपानी आर्मी’ने इंफाळचे युद्ध लढून मोइरांग येथे स्वतंत्र भारताचा ध्वज प्रथम फडकावला. त्यामु
गेल्या तीन आठवड्यांपासून मी ईशान्य भारताच्या वेगवेगळ्या सीमावर्ती भागांना भेट देत आहे. भारत-म्यानमार सीमेवर ‘आसाम रायफल्स’ सीमेचे रक्षण करण्याकरिता तैनात आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर आधारित हा लेख...
आसाम आणि मिझोराममध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारानंतरही या दोन्ही राज्यांत एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरुच आहेत. त्यानिमित्ताने हे समजून घेतले पाहिजे की, आता हिंसात्मक पद्धतीने समोर आलेला वाद हा कालपरवा सुरू झालेला नाही. यामागे कैक वर्षांचा इतिहास आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. “चर्चेसाठी जोरामथांगा यांनी ऐझॉल येथे येण्याचे निमंत्रण दिले असून सीमावाद गोळीबार प्रकरणी त्यांनी माफी मागितले,” असे सरमा यांनी मंगळवार, दि. २७ जुलै रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन दिवसांपूर्वी आसामच्या दक्षिण सीमेवरील कछर जिल्ह्यात मिझोराम आणि आसामच्या पोलीस दलांमध्ये चकमक झाली. बंदुकीच्या फेरी झाडल्या गेल्या. त्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला. दोन राज्यांच्या पोलीस दलांनी एकमेकांशी शत्रुराष्ट्र असल्याप्रमाणे युद्ध करणे, अशी लाजिरवाणी घटना भारताच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. त्यामुळे या प्रकाराची साद्यंत माहिती आपल्याला असणे क्रमप्राप्तच आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेट म्हणून २,६०० किलोग्रॅम आंबा पाठवला.रंगपूर जिल्ह्यात पिकविल्या जाणार्या हरिभंगा जातीचे आंबे बेनापोल चेकपोस्ट मार्गे जमिनीच्या सीमा ओलांडून पाठविण्यात आले. बेनापोल कस्टम हाऊसचे उपायुक्त अनुपम चकमा यांनी बांगलादेशी माध्यमांना सांगितले की, आंबे हा दोन देशांमधील मैत्रीचा स्मृतिचिन्ह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी ईशान्य भारतातील समस्यांचे निराकरण होत आहे
५.५ रिश्टर स्केलच्या भूकंप; गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप
भारताच्या नकाशावर उगवत्या सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पूर्वांचलमध्ये काश्मीरसारखी समस्या निर्माण होऊन हा प्रदेशदेखील विविध विवंचना आणि समस्या यांनी ग्रासला जाऊ नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दूरदृष्टीचा विचार केला आणि आपल्या येथील कार्याचा आदर्श वस्तुपाठ आजमितीस समाजासमोर उभा केला आहे.
लीगल राईट्स ऑबझर्व्हेटरी संस्थेने (LRO) केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे या शाळा विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी
Result Live :रणसंग्राम पाच राज्यांचा
छत्तीसगढमध्ये हि चौथी विधानसभा लढत आहे, यापूर्वी ३ वेळा भाजपचा झेंडा फडकला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असली तरी मिझोराममध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रन्टला (MNF) स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत असून ४० जागांपैकी २९ जागांवर MNF आघाडी मिळवली
नुकत्याचा पार पडलेल्या तेलंगण विधानसभा निवडणुकीत टीआरसने मोठा विजय मिळविला आहे. २०१४ मध्ये वेगळे राज्य बनल्यानंतर तेलंगणमध्ये पहिली विधानसभा निवडणूक लोकसभेसोबतच झाली होती. येथे २०१९च्या लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा होणार होती.
मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजस्थानमधील अनेक समुदायांना आणि आपल्याच कार्यकर्त्यांना नाराज केले. त्याचाच मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.
गेली दहा वर्षे मिझोरामवर राज्य करूनही मिझोरामने काँग्रेसचा हात नाकारला आहे. त्यामुळे मिझोराममध्ये काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.
छत्तीसगढमध्ये आजही दुर्गम क्षेत्रे विकासांपासून वंचित आहेत. कारण, नक्षली इथे कोणत्याही विकासकामाला हिंसात्मक विरोध करतात पण, जनतेसमोर विरोधकांनी नक्षल्यांचे चित्र क्रांतिकारी रंगवले आणि चित्र निर्माण केले की, १५ वर्षांच्या सत्तेत भाजपने काय केले? दुसरीकडे याच कालावधीत छत्तीसगढमध्ये हिंसाचार माजवत नक्षलींनी जनतेला धमकी दिली की, काँग्रेसला मतदान करा. भाजप पक्षापेक्षा प्रशासनाचे अपयश हे भाजपच्या हरण्याचे कारण आहे.
जनतेचे सर्वोच्च न्यायालय आणि देशाचे सर्वोच्च न्यायालय! या दोन सर्वोच्च न्यायालयांकडून तीन निवाड्यांची प्रतीक्षा केली जात आहे. जे काही दिवसांत घोषित होतील.
निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराम या पाच राज्यांचा समावेश