" पाणी भरणं, साफसफाई करणं, घर चालवणं ही गुलामगिरी इथे तुझ्यासाठी नाही. तू ख्रिश्चन होतीस, पण आता नाहीस.तू नायजेरियामध्ये नाहीस, तर तू आता इस्लामच्या राज्यात आहेस,” असं तिला पळवून आणणारा ‘बोको हराम’ संघटनेचा दहशतवादी सांगत होता. ती १४-१५ वर्षांची मुलगी भेदरली होती. ती विचारात असतानाच तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तिने झिडकारताच तो म्हणाला, ”ठीक आहे, निकाह करू . तयार राहा.” त्याचे म्हणणे ऐकून ती अजूनच घाबरली. ती म्हणाली, ”मी लहान आहे. मी निकाह करू शकत नाही.” यावर त्याने पाच वर्षांच्या एका छ
Read More
आफ्रिकन देश नायजेरियाच्या उत्तर पश्चिम प्रांतातील एका शाळेतून सशस्त्र हल्लेखोरांनी २८७ मुलांचे अपहरण केले. अपहरण करण्यात आलेली सर्व मुले ८ ते १५ वयोगटातील आहेत. या मुलांना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी पळवून नेले. दरम्यान नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या मुलांना मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवले आहे.
हिंदुत्वाची तुलना दहशतखोर ‘इसिस’ आणि ‘बोको हराम’शी करत सलमान खुर्शिदांनी काँग्रेसी हिंदूद्वेषाच्या परंपरेचे ते पाईक असल्याचेच पुनश्च सिद्ध केले. पण, आता हिंदूंनी ही असली अवमानजनक विधाने मुकाट्याने सहन करण्याचा जमाना कधीच गेला. त्यामुळे आपले सेक्युलॅरिझम सिद्ध करण्यासाठी सलमान मियांनी दिलेल्या या हिंदूद्वेष्ट्या बांगेला हिंदू समाज जशास तसे उत्तर देईलच!
‘इस्लामिक ब्रदरहूड’ हा म्हणे इस्लामचा आत्मा आहे. मग ‘बोको हराम’ आणि ‘इस्लामिक स्टेट इन वेस्ट अफ्रिकन प्रोव्हिन्स’ या दोन्ही संघटनेचे म्होरके, सदस्य हे सगळे मुस्लीमच आहेत. तरीही सत्तासंघर्षात ते एकमेकांशी रक्तरंजित क्रूर संघर्ष करत आहेत.
‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने १६ डिसेंबर रोजी नायजेरियाच्या उत्तरी कतसिना प्रांताच्या सरकारी शाळेवर हल्ला केला. शाळेतील ३३० विद्यार्थ्यांचे त्यांनी अपहरणही केले. ‘बोको हराम’ संघटनेचे खरे नाव आहे ‘जमात-ए-हली-सुन्ना-लिदावती-वल जिहाद.’ या संघटनेच्या नावाचा अर्थ होतो की, मोहम्मद पैगंबरांची शिकवण आणि ‘जिहादा’चे जागरण करणे, त्यांना सर्वदूर पोहोचविणे. पण, अशी घृणास्पद हिंसा करून, शाळेतल्या अजाण बालकांचे अपहरण करून, या दहशतवादी संघटनेने जगाला कोणता संदेश आणि विचार दिला आहे? हा कोणता धर्मविचार आहे? हे तर मानवतेला