‘रॅंचो स्कूल’ म्हणजेच द्रुक पद्मा कार्पो स्कूलला अखेर CBSE मान्यता मिळाली. या शाळेची स्थापना २० वर्षापूर्वी झाली होती. २००९ मध्ये आलेल्या ३ इडियट्स मुळे देसभर प्रसिद्ध झालेली ही शाळा.
Read More
Madrasa उत्तर प्रदेशातील लखनऊमधील मलीहाबादमध्ये सफा पब्लिक स्कूल या सीबीएसई शाळेत इयत्ता ५ वीच्या १५ वर्षीय विद्यार्थी अल्तमस खानचा मृतदेह हा एका दोरीच्या फासाला अडकवण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांसह आता राज्य अल्पसंख्यांक कल्याण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. या शाळेच्या अवारात अवैधपणे मदरशाचे शिक्षण दिले जात होते. आता संबंधित मदरशाचाही तपास करण्यात येणार आहे.
उत्तर भारतातील वाढत्या थंडीमुळे धुक्याची चादर पसरलेली पाहावयास मिळत आहे. या दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक दोन्ही प्रभावित झाल्याचेदेखील दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये दाट धुके पसरल्यामुळे येथील शाळा दि. १ ते ६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रश्न बोर्डाच्या परीक्षा एकदा घ्यायच्या की दोनदा, हा नाहीच. उचित मूल्यमापन हा खरा प्रश्न आहे. आकलन क्षमता योग्य शास्त्रीय पद्धतीने तपासायची कशी, हा कळीचा मुद्दा आहे.
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्। तत् त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये॥ सत्याचा चेहरा तेजस्वी सोनेरी आवरणाने झाकलेला आहे; हे तेजोमय सूर्य! सत्याच्या प्राप्तीसाठी, प्रत्यक्ष दर्शनासाठी तुम्ही ते आवरण काढून टाका. भारतीय शिक्षण व्यवस्थेला लागलेले मेकॉलेप्रणित ग्रहण आता राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या लागू होण्याने सुटण्याच्या दृष्टिपथात आहे.
पुणे : राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. पुणे विभागाचा निकाल ९३. ३४ टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे.
SSC बोर्डाच्या शाळांच्या दहावीचे वर्ग आता एप्रिल महिन्यातच सुरु होणार आहेत. CBSE, ICSE बोर्डाचे शैक्षणिक वर्ष मार्च-एप्रिलमध्येच सुरु केलं जात. त्याच धरतीवर हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. SSC बोर्डाचे दहावीचे वर्ग नववीची वार्षिक परिक्षा झाल्यावर लगेच दोन दिवसांत सुरु होतील.
बिहारमधील सासाराम आणि नालंदातील अनेक गावं दंगलीच्या आगीत होरपळत असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. श्रीराम नवमीनंतर सुरू झालेल्या या दंगलीने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कथित सुशासनावर प्रश्न निर्माण झाले. घरांवर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ आणि मरणाच्या भीतीने सासाराम आणि नालंदातील शेकडो जण आपल्या घरांना टाळे लावून गाव सोडून गेली आहेत. शाळा, महाविद्यालये, इंटरनेट सेवा बंद असून अनेक ठिकाणी ‘कर्फ्यू’ लावण्यात आला. सासाराममधील सैफुलगंज, कादीरगंज आणि शहजलाल पीर येथील दंगलीने भयभीत शेकडो कुटुंबांनी घर
आपण १५-२० वर्षे वयाच्या तरुण मुला-मुलींच्या भविष्याशी खेळतो आहोत, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. सवलती मागणारे विद्यार्थी, त्यांना चिथावणी देणारे पुढारी अन् घरात मूग गिळून बसलेले अस्वस्थ पालक यातून निर्माण होणारे भवितव्य, हे कोरोनापेक्षाही अधिक गंभीर असणार, हे अजूनही आपल्या लक्षात येत नाही.
उत्तर प्रदेशातील कोणत्याही खासगी शाळेला यावर्षी फी वाढ न करण्याचा आदेश योगी सरकारने दिला आहे. ७ जानेवारी रोजी हा आदेश जारी करण्यात आला. कोरोनाच्या काळात जनतेवरील महागाईचा भार कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
'सीबीएसई' बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता असून बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
शाळा मालक शहा यांच्या आश्वासनानंतर पालकांचे आंदोलन मागे
सर्व राज्यांच्या १२ वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या व मूल्यांकनाच्या समान धोरणाच्या मागणीवरील याचिकेच्या सुनावणीदरम्यान आंध्र प्रदेशने आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले
‘सीबीएसई’पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. “बारावीची परीक्षा दि. 23 एप्रिलला होणार होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. केंद्राने ‘सीबीएसई’च्या परीक्षा नुकत्याच रद्द केल्या. राज्य सरकारनेही याबाबत विचारणा केली होती. आम्ही मंत्रिमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली.
शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानकपणे सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. यावेळी पालकांनीदेखील परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
देशातील करोना संसर्गाची स्थिती ध्यानात घेऊन सीबीएसईची १२ वीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.
सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा केंद्राच्या निर्णयानंतर शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुंबई महानगरपालिका आपल्या शाळांच्या पटसंख्या टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न करते आहे. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे आहे म्हणून आता महापालिका मुंबईमध्ये तब्बल दहा शाळा 'सीबीएसई' करण्याचा घाट घालते आहे. या शाळा नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांची प्रवेशप्रक्रिया काय, याबाबत घेतलेला आढावा..
जगभरात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा घोंगावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दि.३ डिसेंबर रोजी दक्षिण कोरियामध्ये ३५ कोरोना संक्रमित विद्यार्थ्यांसह लाखो महाविद्दयालयीन विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिल्याची घटना घडली आहे.
२०२१ सालच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने न घेता लेखी पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
अतिशय संघर्षमय परिस्थितीत सीबीएसई परीक्षेत ९९ टक्क्यांहून अधिक गुण मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार्या विनायक मलील याच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
सीबीएसई बोर्डाने गुरुवारी परिपत्रक जारी करत परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या, अशी घोषणा एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती. बारावीचा निकाल ११ जुलै रोजी तर दहावी बोर्डाचा निकाल १३ जुलै रोजी लागणार आहे,
सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळणे बंधनकारक
सीबीएसई दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. मंडळाने आज दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रलंबित सीबीएसईची तारीख पत्रक जाहीर केले.
दिल्लीतील हिंसाचाराचा विद्यार्थ्यांनाही फटका
अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले
राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करणार
सीबीएसई निकालांमध्ये राजहंस विद्यालय, अंधेरी पश्चिम या शाळेतून ममता नायक या विद्यार्थिनीने ९०.४० टक्के गुण मिळवत घरच्यांसह सार्यांनाच सुखद धक्का दिला आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी...
नुकतीच राष्ट्रीय आरोग्य अभियान उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'कायाकल्प' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत नाशिक जिल्हा रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
सीबीएसई' दहावीच्या निकालानंतर आज काऊन्सिल फॉर दि इंडिअन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनचा (सीआयएससीई) दहावी आणि बारावी निकाल जाहीर झाला
स्मृती इराणी यांच्या मुलीनेही यंदा दहावीची परीक्षा दिली होती, तिला ८२ टक्के मार्क्स मिळाले. दरम्यान, www.cbse.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात
सीबीएसई बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे सीबीएसईच्या बोर्डाने परीक्षा लवकर घेतल्या होत्या.
ठाण्यातील रॅडक्लिफ सीबीएसई स्कुलचा हा उपक्रम आहे, यामध्ये मॅरेथॉन, सायक्लोथॉन आणि स्केटिंगचा समावेश असेल.
एसईचा पेपर फुटल्याच्या घटनेवरून ठाकरे यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले.