पिकांच्या अवशेषांपासून (पराली) होणारे प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकार त्यापासून बायोगॅस तयार करण्याची चाचपणी करत आहे. त्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बर्लिनमध्ये जर्मन बायोगॅस असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) क्लॉडियस दा कोस्टा गोमेझ यांची भेट घेऊन चर्चा केली.
Read More
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आयातीपेक्षा निर्यात जास्त हवी, तरच त्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ समजली जाते. पुणेस्थित ‘सिस्टेमा बायो’ने जगातील सर्वात मोठे बायोगॅस संयंत्र निर्मिती सुविधा निर्माण केले आहे. यात १५० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून आशिया व आफ्रिका खंडातील देशांना आपल्या देशातर्फे ‘सिस्टेमा बायो’ बायोगॅस पुरविणार आहे. यामुळे २०३० पर्यंत जागतिक हरितगृह वायूंमध्ये एक टक्का कपात होईल. परिणामी, आपल्या देशाला कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे शक्य होईल.
जगात सर्वत्र आर्थिक अस्थिरतेचे वातावरण असताना, भारताने सर्व आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत, जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा लौकिक मिळवला आहे. जागतिक बँकेने आपल्या ताज्या अहवालात त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. योजना प्रभावीपणे कशा राबवायच्या, हे केंद्रातील सरकारने दाखवून दिले आहे. म्हणूनच महासत्तेकडे भारताची वेगाने घोडदौड सुरु आहे.
तालुक्यातील खांडज येथे बायोगॅस टाकीत पडून चार लोकांचा मृत्यु झाला आहे. बारामती तालुक्यात खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यामध्ये आटोळे कुटुंबीयातील तिघे, तर गव्हाणे कुटुंबीयांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. बायोगॅस टाकीची साफसफाई करताना ही दुर्घटन घडली.
कचरा प्रश्नावर नाचक्की झालेल्या कल्याण -डोंबिवली शहरात गेल्या सहा महिन्यांपासून 'शून्य कचरा मोहिम' राबविली जात आहे. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेतर्फे सुका कचरा देखील वेगळा करून त्यांचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहिले जात आहे.
मागील वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे घसरलेले मानांकन लक्षात घेता शहर स्वच्छतेसाठी पालिकेने चांगलीच कंबर कसली व यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात ९७ व्या क्रमांकावर झेप घेत पहिल्या शंभर शहरांत येणाचा मान पटकावला आहे.
हरित पर्यावरणाच्या दिशेने पुढाकार घेत, पश्चिम रेल्वेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर एक बायोगॅस संयंत्र उभारण्यात आले आहे.