सनदी लेखापाल क्षेत्रातील देशपाळीवर गाजलेले नाव म्हणजे मुकुंद एम चितळे आणि कंपनी होय. नुकतेच या संस्थेने ५१ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने मुंबईतील सहारा स्टार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मुंबईतील उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते
Read More
येणाऱ्या काळात भूराजकीय तसेच उद्योग क्षेत्रातील समीकरणे बदलणार असली तरी भारत आपले स्थान बळकट करेल असा विश्वास एल अँड टी समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रमण्यन यांनी व्यक्त केला आहे.
भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका ही फक्त व्यवसायातून भांडवल निर्मिती एवढ्यावरच मर्यादित न राहता त्यात बदलत्या काळानुसार नवीन आयामांचाही समावेश होत आहे, असे प्रतिपादन करत एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी भारतातील कॉर्पोरेट जगतातील समाजाभिमुख बदलांना अधोरेखित केले
देशातील गिग कामगारांच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने केंद्र सरकार लवकरच एक महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या गिग कर्मचाऱ्यांना लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून पेन्शन योजना लागू केली जाणार आहे
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील महत्वाची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी काढलेल्या परिपत्रकात एचडीएफसी बँकेला केवायसी प्रक्रियेतील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे
न्यायालयांना स्वायत्तता असणे ही एक गोष्ट. पण, भारतातील सर्वोच्च न्यायालये ही संसदेपेक्षाही अधिक सार्वभौम आणि स्वयंभू आहेत का, असा प्रश्न पडावा. न्यायव्यवस्थेत शिरलेल्या अपप्रवृत्तींवर कारवाई करणेही सरकारला शक्य नाही. त्यातूनच न्या. वर्मा यांच्या घरी कोट्यवधींची रोकड सापडते आणि आरोपीवर कारवाई करणे सरकारला अशक्य ठरते. मग यापेक्षा स्वयंभूपण ते कोणते?
‘बायो-इकोनॉमी’ अर्थात जैव-अर्थव्यवस्था म्हणजेच जीवाणू, शेती, वने, सागरी संसाधने यांसारख्या विविध नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादन, प्रक्रिया आणि सेवांवर आधारित अर्थव्यवस्था. अशाप्रकारची अर्थव्यवस्था ही अधिक पर्यावरणपूरक मानली जाते. सध्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनही सुरू असून, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचाही जैव-अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होताना दिसतो. त्यानिमित्ताने जैव-अर्थव्यवस्थेची वाढ आणि भविष्यातील व्याप्ती यांचा आढावा घेणारा हा लेख...
जम्मू-काश्मीरमधील वेगवान विकासकामे पाहता, तेथील फुटीरतावादी गटांनीही आता विकासाची कास धरली आहे. कोणे एकेकाळी काश्मीर पेटवून देऊ, अशी वल्गना करणार्या फुटीरतवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होणे, हे मोदी सरकारच्या यशस्वी काश्मीर नीतीवर शिक्कामोर्तब करणारेच. शिवाय फुटीरतावाद्यांशिवाय काश्मीरमधील पानही हलत नाही, या काँग्रेसच्या दाढी कुरवाळणार्या पूर्वापार धोरणालाही यानिमित्ताने कायमस्वरुपी सुरुंग लावला आहे.
गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. व्यापारयुद्ध, तंत्रज्ञान स्पर्धा, सायबर हल्ले आणि राजकीय हस्तक्षेप या माध्यमातून दोन्ही देश नव्या शीतयुद्धाच्या दिशेनेच वाटचाल करीत आहेत. अलीकडेच उघडकीस आलेल्या एका प्रकरणानुसार, चीनने अमेरिकेतील माजी सरकारी अधिकारी आणि तंत्रज्ञान कंपन्यांतील कर्मचार्यांना लक्ष्य करत एक व्यापक गुप्तचर मोहीम राबविली आहे. ही घटना केवळ चीनच्या आक्रमक धोरणांचीच झलक दर्शवित नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी असलेला गंभीर धोकाही अधोरेखित करते.
फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याच्या प्रस्तावावर काय म्हणाले आमदार हेमंत रासने?
महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘आता थांबायचं नाय' हा नवा मराठी चित्रपट १ मे पासून आपल्या जवळच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महिलादिनी झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांनी ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. आता ह्याच सिनेमाचं मनाला भिडणारं शीर्षक गीत ‘आता थांबायचं नाय’ प्रदर्शित झालंय. हे गाणं, असं सेलिब्रेशन आहे जे जीवनाच्या नवीन प्रवासाचा, उंच भरारी घेण्याचा, नवे स्वप्न पाहण्याचा आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेला ध्यासाचा आनंद व्यक्त करते
( Give Bharat Ratna to industrialist Ratan Tata MLC uma khapre to CM ) उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, अशा मागणीचे पत्र आ. उमा खापरे यांनी मंगळवार, 25 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
Vande Bharat Railway भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचण्यासाठी वंदे भारत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ मध्ये काश्मीर खोऱ्यात रेल्वे पाठवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतचा हा सर्वात महत्त्वाचा आणि कठीण प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि तो इतर भागांशी जोडला गेलेला आहे. जम्मू काश्मीरला जाणारी पहिली वहिली रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस असेल अशी माहिती समोर आली आहे.
भारतातील आयटी क्षेत्रातील अग्रगण्या कंपनी असलेल्या इन्फोसिस कडून कर्मचारी कपातीचा सिलसिला कायम राहिला आहे. कंपनीच्या बंगळूरु येथील प्रशिक्षण केंद्रातून ४५ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे
परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीत खंड पडू न दिल्यामुळे भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी ३१७ अंशांची उसळी घेतली आहे. या उसळीमुळे सेन्सेक्स ७७,६०६ अंशांवर थांबला
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. यामधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आयपीओचा. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ कायमच गुंतवणुकदारांचे लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत ठरत असतात. याच आयपीओ मार्केटमधील घडामोडी आपल्याला काय सांगतात हे बघूया.
देशातील कृषी व्यवसायाला पूरक अशा कृषीसाहीत्यावरील जीएसटी कमी करणे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे असे केंद्रीय अर्थमंत्री यांनी संसदेत जाहीर केले
जागतिक तसेच देशांतर्गत बाजारपेठेतील स्थिती लक्षात घेता भारत सरकारने आपली सुवर्ण (सोने) चलनीकरण योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
गेले सात दिवस सातत्याने सुरु असलेल्या तेजीने गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या शेअर बाजाराने बुधवारी ७०० अंशांनी मान टाकली. प्रामुख्याने पायाभूत सुविधा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
“गीतेतील ‘कर्मण्ये वा धिकारस्ते’ या वचनावर विश्वास ठेवत असाध्य ते साध्य करण्याची ताकद ठेवणारे भाईसाब म्हणजेच ओम प्रकाश माथूर आहेत,” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गौरव केला
इतर वेळी शेतकऱ्यांसह सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आणणारा हा कांदा यंदा मात्र सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू फुलवणार आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयाबद्दल संमीश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी यातून कांद्याची निर्यात विस्तारत आहे
देशातील वाढत्या स्टार्टअप संस्कृती फोफावताना दिसत आहे. देश पातळीवर केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारे या स्टार्टअप्सना बळ देण्यासाठी गुंतवणुक करत आहेत. याच वेळी देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकदारांकडून या स्टार्टअप्स मध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढतोच आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच या स्टार्टअप मध्ये तब्बल २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणुक झाली आहे
ट्रेडबायनरी या आघाडीच्या तंत्रज्ञान आणि कन्सल्टिंग कंपनीने महाराष्ट्रातील दापोलीमध्ये ग्रामीण आयटी सक्षमीकरण उपक्रम सुरू केला आहे, ज्यामागे स्वावलंबी इकोसिस्टम निर्माण करण्याचा उद्देश आहे, जी प्रकाशझोतात न आलेल्या टॅलेंटना निपुण करते, जागतिक एक्स्पोजरचा अनुभव देते आणि लहान नगरांमधील व्यावसायिकांना उद्योग प्रमुखांमध्ये बदलते
भारतातील उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहेत. २०२४ च्या उद्योगक्षेत्राशी संबंधित प्रसिध्द झालेल्या अहवालानुसार उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे विलिनीकरण घडून आले आहे
( Resolution to confer Bharat Ratna on Mahatma Phule and Krantijyoti Savitribai maharashtra assembly ) क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. हा ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला.
सोने आणि दागिने तज्ज्ञांच्या मते येत्या काळात कदाचीत हा भाव लाखाच्या आसपास जाऊ शकतो. या सर्व बातम्यांमुळे आपल्या सामान्य लोकांच्या मनात धडकीच भरली असेल. परंतु हेच सोन्याचे वाढते भाव भविष्यातील आपल्या समृध्दीचे उत्पन्नाचे सुरक्षित साधन होऊ शकतात याचा विचार आपण केलाय का?
भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या दहा वर्षात अनेक विकसित राष्ट्रांनाही मागे टाकत आपली घौडदौड चालूच ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आयएमएफच्या अहवालानुसार भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन २.१ ट्रिलियन डॉलर्स वरुन झेप घेत ४.३ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे
भारतातील परदेशी संस्थात्मक गुंतवणुक वाढवण्याच्या दृष्टीने भारतातील भांडवल बाजार नियामक संस्था सेबीकडून महत्वाचे पाऊल उचलले जाणार आहे
देशात वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता भयानक पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत देशात तब्बल २४ लाख सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे
जागतिक अर्थकारणातील उलथापालथींतही आपल्या तेजीचा सिलसिला कायम ठेवत भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी ५५७ अंशांची उसळी घेतली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजारात आनंदीआनंद पसरला होता
भारतातील तरुणांना कौशल्य विकासाची तसेच कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला भारतातील मोठ्या उद्योगांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय
महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार काम करत आहे. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण हे उद्योग क्षेत्रासाठी अधिकाधिक पूरक आणि विश्वासाचे बनत चालले आहे
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एअर न्यूझीलँड यांनी पाच वर्षांची भागीदारी जाहीर केली आहे. या कराराअंतर्गत, टीसीएस एअरलाइनच्या डिजिटल पायाभूत सुविधा सुधारणार असून, एआय-सक्षम नवकल्पना आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी सहाय्य करणार आहे. या सहयोगामुळे एअर न्यूझीलँडच्या डिजिटल क्षमता वाढणार असून, प्रवासी अनुभव सुधारेल आणि तांत्रिक कार्यक्षमता मजबूत केली जाईल
शेअर बाजारातील चढत्या भाजणीने आता चांगलाच वेग धरला आहे. बुधवारी १ हजारापेक्षा जास्त अंशांनी उसळी घेतलेल्या शेअर बाजारातील निर्देशांकाने गुरुवारी त्यातुलनेत कमी परंतु ८९९ अशांची उसळी घेतली आहे
रिझ्रर्व्ह बँकेने घालून दिलेल्या आर्थिक सक्षमतेच्या निकषांचे पालन केल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ५०० कोटी रुपयांच्या कर्जरोखे वितरणास परवानगी मिळाली आहे. या रोखे वितरणाचा शुभारंभ गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला
भारतातील आघाडीचा टिकाऊ वस्तूंचा ब्रँड, उषा इंटरनॅशनलने पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स (मेन्स) क्रिकेट संघासोबत पुन्हा एकदा नव्याने भागीदारी केली आहे
देशातील तिसऱ्या क्रमांकाची खासगी दूरसंचार कंपनी असलेल्या वोडाफोन – आयडिया आता त्यांची ५ जी सेवा सुरु करणार आहे. बुधवारी त्याचे मुंबईत लाँचिंग होणार आहे
भारतातील स्टील उद्योगाला सहाय्यक ठरु शकेल अशी एक बातमी समोर आली आहे. डीजीटीआर म्हणजे व्यापार उपाय महासंचालनालयाने भारतात आयात होणाऱ्या स्टीलवर १२ टक्के डंपिंगविरोधी कर लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
जागतिक पतमानांकन संस्था फिच कडून २०२६ या वर्षासाठी विकासदराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक आर्थिक अस्थैर्याच्या काळातही भारत ६.५ टक्के इतका विकासदर राखू शकेल असा अंदाज फिच कडून वर्तवला गेला आहे
संपूर्ण बँकिंग विश्वात खळबळ माजवणाऱ्या इंडसइंड बँक घोटाळ्याचा नवा अपडेट समोर आला आहे. बँकेकडून आता आपल्या ठेवीदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे
विमा क्षेत्रातील सर्वात मोठी भारतीय कंपनी असा लौकिक असलेल्या एलआयसीने लवकरच आरोग्य विमा क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे
यंदाचा आयपीएलचा मोसम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर देण्यात आली आहे. जिओ धारकांना हा आयपीएलचा मोसम मोफत बघता येणार आहे. रु. २९९ किंवा त्याहून अधिक प्लॅनसह नवीन जिओ सिम कनेक्शन घेतल्यास किंवा किमान रु. २९९ चा रिचार्ज केल्यास जिओ ग्राहक जिओहॉटस्टारवर मोफत आयपीएल क्रिकेट सीझनचा आनंद घेऊ शकतात
भारतीय अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना जोरदार यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे एक प्रमुख निदर्शक असलेल्या थेट करसंकलनाने विक्रमी कामगिरी केली आहे. १ एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ पर्यंतच्या कालावधीत १६. २ टक्क्यांची वाढ नोंदवत थेट करसंकलन २५.८६ लाख कोटींवर पोहोचले आहे
मागील आठवड्यात सातत्याने मंदीचे वातावरण अनुभवणाऱ्या शेअर बाजाराने या आठवड्यात जोरदार पुनरागमन केले आहे. सोमवारी तीनशे पेक्षा जास्त अंशांची उसळी अनुभवणाऱ्या शेअर बाजारात मंगळवारी तेजीचा धमाका झाला. तब्बल ११३१ अंशांची उसळी घेत शेअर बाजाराचा निर्देशांक ७५, ३०१ अंशांवर थांबला
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
स्मार्टफोन निर्मिती आणि निर्यात या क्षेत्रात भारत नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. भारताने स्मार्टफोन निर्यातीत नवा उच्चांक गाठला आहे. २०२२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या फक्त १० महिन्यांत म्हणजे एप्रिल ते जानेवारी या काळात भारताची स्मार्टफोन्सची निर्यात दीड लाख कोटींवर गेली आहे.
भारतातील खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकाची बँक असणाऱ्या इंडसइंड बँकेचा घोटाळा नुकताच समोर आला आहे. या घोटाळ्यामुळे बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. परंतु शनिवारी रिझर्व्ह बँकेने इंडसइंड बँकेच्या आर्थिक स्थिती स्थिर असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर आता सोमवारी शेअर बाजारात या बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली
सातत्याने तेजी- मंदीच्या हिंदोळ्यांवर हेलकावे खात असलेल्या शेअर बाजाराने आठवड्याच्या सुरुवातीलाच तेजीचा गिअर टाकला आहे. सेन्सेक्समध्ये तब्बल ३४१ अंशांची वाढ झाली
कुठल्याही उद्योगाला आता कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वापरापासून वेगळे राहता येणार नाही असे प्रतिपादन करत महाराष्ट्र राज्याचे सहसचिव व मुख्यमंत्र्यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे यांनी केले आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता आणि भारतीय उद्योगाची पुनर्रचना याविषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता
महाराष्ट्रातील कुस्तीगीर ही महाराष्ट्राची शान आहेत, त्या खेळाला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन द्यायचे असेल तर त्या कुस्तीगीरांना योग्य ठिकाणी योग्य त्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्या नोकऱ्यांमध्ये ५ टक्के जागा या कुस्तीगीरांसाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे