म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने केवळ बँकॉकच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली नासधूस ही मनाला चटका लावून जाणारी होती. इमारती कोसळल्या, रस्ते उद्ध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यू पावले. ज्या भारताकडे एकेकाळी जग दुर्लक्ष करत होते, तोच भारत आज म्यानमारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताने म्यानमारच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारतीय लष्कराची एकूण पाच विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलच नव्हे, तर
Read More
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी अनेक बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(Saif Ali Khan Heath Update) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवार, दि. १८ जानेवारीला मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोराने केलेल्या धारदार शस्त्राच्या वारामुळे रक्तबंबाळ झालेल्या सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाईत भारतीय सागरी हद्दीत सुमारे ७०० किलो मेथ अंमली पदार्थाची खेप पकडली आहे. ‘ऑपरेशन सागरमंथन’ ( Operation Sagarmanthan ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : ( Jammu-Kashmir ) जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर बुलडोझरची कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची घरे जमीनदोस्त केली जातील, असा इशारा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला आहे. या कारवाईबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
( Israel-Iran War ) इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायल या हल्ल्यानंतर इराणवर पलटवार कधी करणार, या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याची अत्यंतिक गोपनीय माहिती उघडकीस आल्याने जगभर खळबळ उडाली होती. अखेर इस्रायलने शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भीषण हवाई हल्ला करत इराणच्या सततच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आता नौदलाला पुन्हा पाकच्या कराची बंदराची कोंडी करून पाकचा सगळाच व्यापार, लष्करी-नागरी पुरवठा बंद पाडायचे आदेश मिळाले. ‘ऑपरेशन तलवार’ सुरू झाले. भारतीय युद्धनौका वेगाने कराचीकडे सुटल्या. विशिष्ट अंतरावरून सुमारे ३० भारतीय नौकांनी कराची बंदराकडे जाणारे सर्व समुद्री मार्ग पक्के रोखून धरले.
जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यानंतर आता काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये भारतीय सैन्य दलाने दहशतवादविरोधी कारवाईला सुरूवात केली आहे. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ केरन सीमा भागात भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ (LOC) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. लष्कराचे सहा आरआर आणि पोलिसांचे एसओजीचे जवान घटनास्थळी तैनात आहेत. येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा नंतर आता हंदवाडा येथे दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. उत्तर काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला पकडले आहे. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने सोमवार, दि. १७ जून २०२४ हंदवाडा येथील कचारी गावातून हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला पकडल्याची माहिती दिली.
मुंबई वाहतूक पोलिसांची अधिसूचना जारी
इस्रायल या विषयावर समर्पित तशी अनेक पुस्तके आहेत. पण, ‘दहशतवादाच्या विरोधात इस्रायल’ हे रुपाली भुसारी-कुलकर्णी लिखित पुस्तकाइतके ओघवती भाषा आणि अप्रतिम मांडणी असणारे दुसरे पुस्तक कदाचित मराठीत नसावे. गेल्या काही महिन्यांपासून भडकलेल्या इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचनात आले. या पुस्तकात इस्रायलचे दहशवादविरोधी धोरण, इस्रायल आणि भारत संबंध यांचा समग्र आढावा लेखिकेने घेतला आहे. त्याचबरोबर ’मोसाद’ची कार्यपद्धती आणि अन्य अत्यंत रोचक माहितीही या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. या पुस्तकातील
गुजरातमध्ये आतापर्यंत १०८ बेकायदेशीर मजारी जमीनदोस्त केल्या आहेत. अशी माहिती गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. त्यांनी या मजारी कट रचून बांधण्यात आल्या होत्या, असा आरोप देखील केला. ते म्हणाले की, " कट रचून बांधलेली प्रत्येक इमारत पाडण्यासाठी आमचा बुलडोझर तयार आहे."
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ते म्हणाले की, देशातील १ कोटी महिला लखपती दीदी बनणार आहेत. त्यांचा सत्कार केला जाईल. यापूर्वी आमचे लक्ष्य २ कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचे होते, मात्र आता ते ३ कोटी करण्यात आले आहे.
दि. १६ डिसेंबर रोजी १९७१च्या युद्धाला नुकतीच ५२ वर्षे पूर्ण झाली आहे. याशिवाय दि. १९ डिसेंबर १९६१च्या गोवा मुक्ती संग्रामाला यंदा ६२ वर्षं पूर्ण झाली आहेत. या दोन्ही युद्धांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेले, सैनिकी अधिकारी होते-लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांच्या शौर्यगौरवाचा आढावा घेणारा हा लेख...
संपूर्ण जगाचे लक्ष ज्या बचावकार्याकडे होते, त्या उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यातून ४१ मजुरांना परवा सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. यानिमित्ताने असंभव वाटणार्या आव्हानांपुढे हार न मानता केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे आपुलकी व्यवस्थापनही तितकेच लक्षवेधी ठरले.
दि. १२ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील बांधकामाअधीन बोगद्याचा भाग कोसळल्यानंतर अडकलेल्या ४० मजूरांना सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सरकारतर्फे सुरु आहेत. मजूरांना अन्न, पाणी, ऑक्सिजन पुरवठा सुरळीतपणे होईल, याची पुरेपूर खरबदारी बचाव पथकातर्फे घेतली जात आहे. तज्ज्ञांच्या मदतीने सुरु असलेल्या या बचावकार्याच्या निमित्ताने, बोगद्याचे बांधकाम, त्या बांधकाम प्रक्रियेतील आव्हाने आणि एकूणच सुरु असलेले बचावकार्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमास या इस्लामिक संघटनेने हल्ला केला होता. तेव्हापासून सुरू असलेल्या युद्धात १३०० हून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. त्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी मोदी सरकार 'ऑपरेशन अजय' राबवत आहे. या अंतर्गत २२ ऑक्टोबर रोजी १४३ लोकांना घेऊन सहावे विमान तेल अवीवहून नवी दिल्लीला पोहोचले. त्यापैकी दोन नेपाळी नागरिक आहेत.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू असून भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय' हाती घेतले आहे. भारत सरकारने सुरू केलेले हे लष्करी ऑपरेशन असून ही मोहीम दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाली. या मोहिमेद्वारे होणारा सर्व खर्च मोदी सरकार उचलत आहे.
७ ऑक्टोबर रोजी सुरु झालेले इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप सुरुच आहे. यामध्ये इस्त्रायलमधील अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच इस्त्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक देशांतील लोकांचा बळी गेला आहेत.
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’च्या तयारीचा आढावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली.
प्रोग्रेसिव्ह पक्षाने निवडणुकीत भारताच्या विरोधात वातावरण तापवले असले तरी मागे त्यांनी भारतात आपल्या पक्षाचे शिष्टमंडळ पाठवून आपण भारताच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मालदीवमधील सत्तांतर हा भारतासाठी धक्का असला तरी तो तुलनेने सौम्य आहे, असेच म्हणावे लागेल.
हैदराबाद संस्थान नवनिर्मित पाकिस्तानला मिळावे, असा प्रयत्न तेव्हा होता. कारण, निजामाचे राज्य. उपपंतप्रधान असणार्या पोलादी नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी ही बाब अंतर्गत समस्या म्हणून हिंदुस्थानी सैन्यास आदेश दिला आणि ‘ऑपरेशन पोलो’ ही मोहीम सैन्याने राबवून रझाकारांना नमवून मराठवाडा मुक्तिसंग्रामाची सांगता झाली. या मोहिमेत सर्व हिंदू संघटनांनी हिरिरीने भाग घेतला होता, हा इतिहास आहे. ‘ऑपरेशन पोलो’ दि. १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत कार्यान्वित होऊन मराठावाडा रझाकारीतून मुक्त झाला. तेव्हा आजच्या मराठवाडा मुक
दि. १८ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्याने निजामाचा पराभव केला. हैदराबाद संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरणाला आता ७५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून हे विलीनीकरण नेमके कसे झाले, हे सगळ्या भारतीयांना समजणे गरजेचे आहे. त्यासाठी हा लेखप्रपंच...
‘क्रिप्टो’साठी सर्वांत मोठा ग्राहक आधार असलेलीअमेरिका सध्या ‘क्रिप्टो ऑपरेशन्सवर सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज कमिशन’ (एसईसी)च्या अथक कारवाईमुळे अनिश्चिततेशी झुंजत आहे. यामुळे नियामक घडामोडी, स्वीकारण्याचे वातावरण आणि व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेसाठी रोखीत रूपांतर करण्याची सुलभता प्रदान करण्यात वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीच्या प्रगतीत लक्षणीयरित्या अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, फिट कायद्याच्या रूपात क्षितिजावर एक आशेचा किरण आहे. ज्याचा उद्देश अमेरिकेला ज्यांनी ‘क्रिप्टो’नियमांची अंमलबजावणी केली आहे, अ
भारताला लाभलेली विस्तीर्ण किनारपट्टी, तसेच तीन दिशांना असलेले तीन महासागर ‘मिशन समुद्रयान’ राबवण्यास प्रवृत्त करणारे ठरले, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. ‘ऑपरेशन ब्ल्यू’च्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता याचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला असून, ‘मत्स्य ६०००’ ही पाणबुडी सहा हजार मीटर खोलवर तिघांना आपल्यासोबत घेऊन प्रवास करेल.
पाचपाखाडी येथील बॉर्निओ ह़ॉस्पीटलमध्ये पोटात असलेला दिड किलोचा ट्युमर योग्य वेळेत काढल्याने एका महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टराना यश आले.
मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिअटर व मॉड्युलर प्रसुतीगृहामुळे रुग्णांना निर्जतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, शस्त्रकियेनंतर रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी कमी करून आरोग्य यंत्रणा यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील दुहेरी फायदा होणार आहे. मालाड येथील या सुविधेचा लाभ मिळाल्यामुळे माता मृत्यू तसच नवजात शिशु मृत्यदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई
ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंजाबमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पोलीस ठिकठिकाणी फ्लॅग मार्च काढत आहेत. दरम्यान, अमृतसर पोलिस नियंत्रण कक्षाला मध्यरात्री सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ चार बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच पोलिस दहा बॉम्ब निकामी पथके घेऊन श्री हरमंदिराच्या आजूबाजूला जाऊन तपासणी करू लागले. मात्र कुठेही बॉम्ब सापडला नाही. "
शहरांची निर्मिती ही मानवाने मानवी वास्तव्यासाठी केली खरी. परंतु, गेल्या काही वर्षांत वन्यप्राणीही बेधडकपणे मानवी वस्तीत प्रवेश करताना दिसतात. त्यामागची नेमकी कारणं काय? तसेच मानव-वन्यजीव संघर्षाचे रुपांतर मानव-वन्यजीव सहअस्तित्वात करता येईल का? त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल? यांसारख्या मुद्द्यांचा उहापोह करणारा हा लेख...
भारतीय नौदलाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत केरळमधील कोची येथून अंमली पदार्थं जप्त केलेले आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २५०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त केल्याचा दावा केला जात आहे. औषधाचे नाव मेथॅम्फेटामाइन असे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधाची किंमत सुमारे १२ हजार कोटी रुपये आहे. दि. १३ मे रोजी झालेल्या या कारवाईदरम्यान एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले असून तो पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने २४ एप्रिलपासून ‘ऑपरेशन कावेरी’ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेद्वारे जल आणि हवाई मार्गाने हजारो भारतीयांना मायदेशात परत आणण्यात भारत सरकार यशस्वी झालं आहे. या मोहीमेअंतर्गत तब्बल ३,८६२ भारतीय सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यानंतर आता ही मोहीम बंद करण्यात आली आहे.
सुदान... एरवी फारसा बातम्यांमध्ये न झळकणारा हा आफ्रिकन देश सध्या जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सुदानी लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यातील सत्ता आणि नेतृत्व संघर्षाची या अनागोंदीला लाभलेली किनार. आजवर दोन्ही सैन्य दलांनी एकमेकांविरोधातच पुकारलेल्या या अजब संघर्षात 400 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही सुदान धुमसतो आहे. पण, दोन्ही लष्कर गटांनी जाहीर केलेल्या 72 तासांच्या युद्धविरामामुळे कित्येक देशांनी आपापल्या नागरिकांना या देशातून बाहेर काढण्यासाठीच्या अभियानांना गती दिली. त्यात मग भारताचाह
अजित पवार हे आपल्या नेहमीच फसणार्या बंडांमुळे सातत्याने चर्चेत असतात. दर दोन-तीन वर्षांनी नाराजीच्या चर्चा घडवून आणायच्या, आमदार एकत्र करून बंड करत असल्याच्या बातम्या स्वतःच पेरायच्या आणि अखेरीस काका शरद पवारांनी सुनावल्यावर सपशेल माघार घ्यायची, हा शिरस्ता अजित पवार गेली अनेक वर्षे पाळत आहेत. अजित पवारांनी आजवर केलेल्या बंडाचा विचार करता उच्च पदाची महत्त्वाकांक्षा आणि पक्षावर एकहाती पकड करण्याची सुप्त इच्छा या दोन बाबी बंडामागे दिसतात.
भारतीय हवाईदलाची परिचालन क्षमता वाढवण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) सहा डॉर्नियर-२२८ विमाने खरेदी केली जातील. त्यासाठी एचएएलसोबत ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत तुर्कीमधील भूकंपग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) शेवटचे पथक भारतात परतले आहे.
दि. 17 सप्टेंबर, 1948 दिवशी हैदराबादचे भारतामध्ये विलिनीकरण झाले म्हणून हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याने जे ‘ऑपरेशन पोलो’ राबविले, त्याचे या लढ्यात मोठे योगदान होते. तेव्हा, नुकत्याच संपन्न झालेल्या या दिनानिमित्त भारतीय सैन्याची शौर्यगाथा मांडणारा हा लेख....
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षादलांनी देशभरातील डाव्या विचारसरणीच्या दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये निर्णायक यश प्राप्त केले आहे. बुधा पहाड, चक्रबांध आणि भीमबांध या दुर्गम भागातून माओवाद्यांना यशस्वीपणे बाहेर काढून प्रथमच सुरक्षादलांच्या कायमस्वरूपी छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दहशतवाद आणि डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांविरोधात गृहमंत्रालयाचे शून्य सहिष्णुता धोरण सुरूच राहील आणि हा लढा आणखी तीव्र होईल,” असे प्रतिपादन देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी बुधवारी केले आहे.
देशात सुळसुळाट झालेल्या बनावट कर्ज वितरण करणाऱ्या अँप्सवर कडक कारवाईचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिलेले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २०२१ - २२ या एकाच वर्षात तब्बल १७, ५०० कोटींचे कर्ज या अँप्सद्वारे वितरित करण्यात आले आहे. या बनवत अँप्स वर लवकरात लवकर कारवाई करून ती काढून टाकण्यात यावीत यासाठी भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्याकडून गूगलवर दबाव टाकण्यात येत आहे. भारतीय ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. यासाठीच रिझर्व्ह बँकेकडून विशेष मोहीम चालवण्
"मी नरेंद्र मोदींना आव्हान देतो की त्यांनी आता माझ्या घराचे स्टिंग ऑपरेशन करावे. जर सोमवारपर्यंत काही सापडले नाही तर, नरेंद्र मोदींनी माझं माफी मागावी" अशा शब्दांत दिल्लीचे घोटाळेबाज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले आहे
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर भूमिकेमुळे हैदराबाद भारतात विलीन झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावरील भारतमाता मंदिराच्या प्रांगणात, मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने...
दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चे तिसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री शिवानी सुर्वेचा वेगळा डॅशिंग लूक समोर आला आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या कथित अपमानजनक टिप्पण्यांबद्दल नोंदवलेले प्रथम माहिती अहवाल
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत, सत्ताधारी शिवसेनेतच उठाव घडून येत भाजप सत्तेवर आला. तसाच धमाका आता पश्चिम बंगालमध्येही होण्याची शक्यता आता आहे
मुंबईकरांच्या पैशांतून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे उद्योग..
लंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलेला दावा जरी मान्य तरीही ढगफुटी आणि पूरस्थितीमध्ये परकीय शक्तींचा हात असू शकतो का? अशाप्रकारे कृत्रिम ढगफुटी करता येऊ शकते का? या चर्चांचं एक पिल्लू सोडून राव मोकळे झाले. परंतु, देशविघातक किंवा देशविरोधी शक्तींना अशाप्रकारे कृत्रिम ढगफुटी किंवा पूरस्थिती निर्माण करता येऊ शकते का? या शक्यतेचा केलेला हा उहापोह.
जे जे रुग्णालयात रुग्णांची गैरसोय!
‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने ‘आयएस-४-ओएम’ या नावाचे स्वत:चे अत्याधुनिक केंद्र स्थापन केले आहे.
गोव्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ११ जुलै पासून होणार आहे. त्याच्या आधीच राज्यात राजकीय खलबतांना वेग आला आहे.
अब्दुल सत्तार, नितीन यादव आणि राम सिंग या तीन आरोपींना पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला माहिती पुरवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन सरहद अंतर्गत राजस्थान सीआयडी इंटेलिजेंस पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेले तिघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला महत्त्वाची माहिती देत असल्याचे तपासात उघड झाले.
संपूर्ण जगाची पोलीसगिरी करण्याची अमेरिकेची सवय पुन्हा एकदा उफाळून आली आहे.