पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंधू जलकरार मोडीत काढल्याचे म्हटले होते. त्या दृष्टीने आता जम्मू काश्मीरमधील बगलीहार आणि सलाल धरणांची दारे बंद केली आहेत. यामुळे चीनाब नदीचा प्रवाह कमी झाला आहे.
Read More
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान हे तीन प्रमुख बिंदूंवर आधारभूत होते. ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. पण, बाबासाहेबांनी केवळ राजकीय आणि लोकशाहीच्या परिप्रेक्ष्यात समतेचा पुरस्कार केला नाही, तर सामाजिक, आर्थिक पातळीवरही विषमतामुक्त समाजनिर्मितीचा त्यांनी पाया रचला. आजही बाबासाहेबांनी मांडलेले विचार किती कालातीत आहेत, याचा प्रत्यय नुकत्याच जाहीर झालेल्या ‘जागतिक सामाजिक अहवाल, 2025’मधील निरीक्षणांवर नजर टाकल्यावर येतो.
स्त्री-पुरुष समानतेचे खरे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे संविधानिक चौकटीत शक्य झाले आहे. बाबासाहेबांचे योगदान एका विशिष्ट समाजासाठी नव्हे, तर सर्वसमावेशक दृष्टिकोनातून झाले आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या सामाजिक न्याय, नगरविकास व परिवहनमंत्री ना. माधुरी मिसाळ यांनी केले
Publication of 3 volumes of Dr. Babasaheb Ambedkar Janata newspaper मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या जनता वृत्तपत्राच्या खंड७,८,९ सह इंग्रजी खंड 4चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड २ च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.
( Students of Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) achieve impressive success in the UPSC examination ) डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्वाच्या पर्वाचा प्रारंभ शांताराम चाळीतून झाला. नेमका हा इतिहास काय आहे? जाणून घेऊया Anagha Bedekar, Aparna Bedekar आणि Amey Joshi यांच्याकडून ' शांताराम चाळीची स्मरणगाथा'
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो मात्र डॉ. बाबासाहेब हे फक्त संविधानापुरते मर्यादित नसून त्यांची ओळख ही आणखीनही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य रत्नांनी जडलेली आहे. त्यावर विशेष प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. म्हणून डॉ .बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे इतरही उल्लेखनीय कार्य जसे की "हिंदू कोड बिल", औद्योगिक क्षेत्रातील बदल, स्त्रियांसाठीचे कायदे, कामगार कल्याणासाठी केलेल्या तरतुदी अर्थतज्ञ बाबासाहेब, पाणी तज्ञ बाबासाहेब अशा एक ना अनेक आर्थिक, सामाजिक आणि
Dr. Ambedkar Chowk Vikas Sangh Kurla बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. 14 एप्रिल रोजी, कुर्ला परिसरात एक भव्य उत्सव साजरा होतो. सुरुवातीपासून या उत्सवाचे प्रमुख आयोजक असलेल्या ‘डॉ. आंबेडकर चौक विकास संघा’ची स्थापना 1962 मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत या संघाने या उत्सवाचे उत्तम आयोजन केले आहे. सुरुवातीला पारंपरिक लेझीम, बँड पथक आणि बैलगाड्यांवर सजवलेल्या झांक्यांद्वारे मिरवणूक काढली जायची. या झांक्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांसारख्या थोर महापुरुषा
बाबासाहेब उत्तम प्रशासक होते. त्यांनी विकासाचा पाया रचला. त्यामुळे बाबासाहेब हे आमचे राष्ट्रपुरूष आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ एप्रिल रोजी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिनी चैत्यभूमी येथे अभिवादन केले.
आपण मराठी म्हणून एकत्र येणे, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणे आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे योग्य स्मरण ठरेल, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
(PM Narendra Modi On Waqf Amendment Bill) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यामुळे विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले”, असा आरो
( RSS chief Dr. Mohan Bhagwat on ambedkar jayanti ) "आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोघांचेही कार्य सामाजिकदृष्ट्या समानच आहे. समाजात स्वार्थ आणि भेदांना तिलांजली वाहण्याचे काम दोघांनीही केले", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्त्वावर देशाचा कारभार सुरू आहे. या संविधानानेच देशाच्या महासत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ एप्रिल रोजी केले.
Dr. Babasaheb Ambedkar यांचे कार्य व्यापक असेच आहे. विविध क्षेत्रातील धोरणनिर्मितीमध्ये त्यांचे स्वातंत्र्यपूर्व योगदान अतुलनीय असेच. देशाच्या समोर आलेल्या कोणत्याही समस्येकडे, समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना शोधण्याच्या वृत्ती त्यांच्या ठायी होती. देशासमोरील आव्हानांवर त्यांनी सांगितलेल्या उपायांचा त्यांच्या जयंतीनिमित्ताने घेतलेला मागोवा...
क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पुण्यातील फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
( babasaheb ambedkar legacy ) दुर्गम भागांत सेवेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी कार्यरत, संविधानजागृतीचा वसा घेतलेले मुंबईतील डॉ. सुधाकर शिंदे यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
(Matoshree Ramabai Ambedkar Maternity Hospital) मुंबईतील चेंबूर पूर्व येथे असणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाची तज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही पाहणी झालेली नाही. यासंदर्भात माजी नगरसेविका आणि सुधारणा समितीच्या सदस्या आशा मराठे यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तातडीने पाहणी करुन अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्याची विनंती केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे. तसेच देशभरातून जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, ३ मार्च रोजी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माजी मंत्री भाई गिरकर यांनी काही मागण्या केल्या. या मागण्या मान्य करत अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Buddha “मूलभूत अधिकार संघर्ष समिती’तर्फे ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ पत्रकार भवन येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या विषयावर आनंद तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बुद्धांनी जातिप्रथेला विरोध केला. पण, बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही,” असे वक्तव्य आनंद तेलतुंबडे यांनी केले. यावेळी श्रोत्यांमध्ये ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, अल्हाद पाटील, कल्पना हजारे आदी समविचारी लोक उपस्थित होते.
( Devendra Fadanvis on Congress Babasaheb constitution ) “संविधान बचाव’च्या घोषणा देणार्यांच्या काँग्रेस पक्षाने आणीबाणी लादून भारतीयांचे मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतले. राज्य कायद्याने नव्हे, तर हुकमाने चालेल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली. विरोधी पक्षातील एक लाखाहून अधिक नेत्यांना तुरुंगात टाकले. माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते, काकू शोभा फडणवीस तुरुंगात होत्या. त्यांचा गुन्हा काय, हे सांगायला सरकार तयार नव्हते. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान गोठवून विरोधी पक्षच तुरु
मुंबई : ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'जयभीम पँथर – एक संघर्ष' या चित्रपटाचं म्युझिक लाँच नुकतेच करण्यात आलं. याप्रसंगी निर्माते भदंत शीलबोधी थेरो, भिक्खू संघ, मा भीमराव आंबेडकर साहेब, सिद्धार्थ कासारे, मा. सागर संसारे, मिलिंद शिवशरण, संजय भाऊ खंडागळे चित्रपटातील कलाकार आणि प्रोजेक्ट हेड संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील, कलादिग्दर्शक प्रकाश सिंगारे आवर्जून उपस्थित होते.अत्यंत संवेदनशील आणि दमदार गाणी या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत.
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी तथाकथीत अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त लंडन येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल आणि दि. २५ एप्रिल रोजी ही परिषद होणार आहे.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ या गाजलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची तेलुगू आवृत्ती ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये मोठा यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी तो तेलुगूमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. या आवृत्तीचे वितरण प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांच्या गीता आर्ट्सद्वारे केले जाणार आहे. 'छावा’च्या तेलुगू आवृत्तीचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला आणि त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिक वाढ केली.
( Delhi )राजधानी दिल्लीमध्ये आठव्या विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवार दि. २४ फेब्रवारी रोजी सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाच्या आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित केले आहे. या आमदारांना बाहेर काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष गुप्ता यांनी मार्शला बोलावून बाहेर काढायला लावले. यानंतर आता सोशल मीडियावर "AAP MLAS" ट्रेंड होत आहे.
दादरमधील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करावे, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.
भारतीय संविधानाचा ‘अमृत महोत्सव’ आपण साजरा करत असताना परभणीत ( Parbhani ) मात्र संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान होण्याची निंदनीय घटना नुकतीच घडली आणि राज्यभर त्याचे पडसाद उमटले. या एकूण घटनेचा घटनाक्रम अतिशय वेदनादायक आहे.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमधील केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना म्हणाले की, “भारतातील प्रमुख नदीखोर्यांचे प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीवर आधारित होते आणि त्यांच्याच प्रयत्नाने जल आयोगाची स्थापना झाली.” त्यानिमित्ताने या लेखात भारताच्या जलसंधारणाचे विकासपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar ) यांच्या जलनीती आणि कर्तृत्वाचा मागोवा घेतला आहे. त्यानुसार वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते घटनेचेच नव्हे, तर भारताच्या जलसंधारणाचेही शिल्पकार आहेत
सध्याच्या राजकीय वातावरणात सत्ताधारी पक्ष संविधान बदलणार आहे अशी भीती विरोधी पक्ष सातत्याने व्यक्त करतो आहे. आणि आजच्या विरोधी पक्षाने पूर्वी सत्तेत असतांना कितीतरी वेळा संविधानात बदल केले हे आजचा सत्ताधारी पक्ष इतिहासातील दाखले देऊन सांगतो आहे. या उलट सुलट आरोप प्रत्यारोपांच्या फैरींच्या धुमश्चक्रीत सामान्य माणूस मात्र संभ्रमित होतो आहे. Politics anarchy संविधान सभेने संविधानाच्या मसुद्याला मान्यता देण्याला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झाली, पुढच्या महिन्यात भारतीय प्रजासत्ताक व्यवस्थेला ७५ वर्ष पूर्ण होतील. भारत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानातील आरक्षणाला गांधी घराण्याचा कायम विरोध राहिला आहे. इंदूमिलच्या जागी बाबासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी काँग्रेस सरकारने सुईच्या टोकाएवढी जमीनसुद्धा दिली नाही, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या मुद्यावरून सुरु असलेल्या राजकारणाला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
परभणी : “गांधी घराण्याने आणि काँग्रसने नेहेमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दुस्वास केला आहे. आजही काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे परभणीत आले. ते सोमनाथ सूर्यवंशी तसेच जेष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या घरी गेले. मात्र, जिथे संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान झाला, तिथे ते गेले नाहीत. हा एक प्रकारे समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यांचा दौरा हा आमच्या मागास समाजाच्या न्यायहक्कांसाठी नव्हता, तर परभणी प्रकरण दडपण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी आहे,” असा घणाघाती आरोप समाज अभ्यासक आणि दलित चळवळी
परभणी : ( Parbhani ) “सोमानाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्याला मारहाण झाली, असे वक्तव्य करणार्या राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करत आहे,” असे ‘जय भीम आर्मी’ने जाहीर केले आहे. ‘जय भीम आर्मी’च्यावतीने सांगण्यात आले आहे की, “देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. संविधानाच्या राज्यात जातिभेदाला मुठमाती देण्यासाठी सर्व भारतीय समाज एकत्रितरित्या काम करत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे राजकारण करून परभणी आणि पर्यायाने महाराष्ट्रात जातीय द्वेष प
नवी मुंबई : राज्याच्या वन खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर लोकनेते नामदार गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नागपूरवरून प्रथमच आज नवी मुंबईमध्ये आगमन झाले. नामदार गणेश नाईक यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
(Eknath Shinde) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीस भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात, विरोधकांकडून कामकाजापेक्षा आंदोलनाचाच धडाका जास्त झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा विपर्यास करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांच्या याच वर्तनापायी गुरूवारी संसदेचे कामकाज हे दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. अशातच आता भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधकांच्या फेक नॅरेटीव्हला उत्तर देत काँग्रेसचे सत्य जगासमोर आणले आहे.
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार द्वेष करणाऱ्या काँग्रेसने, त्यांच्याच नावाचा वापर करत आता संसदेत गदारोळ माजवण्याचा चंग बांधला आहे. अशातच आता बाबासाहेबांबद्दल असलेला काँग्रेसचा आकास चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसची सत्ता असताना NCERTच्या पुस्तकात रेखटलेले बाबासाहेबांचे व्यंगचित्र आता व्हायरल होत आहे. तत्तकालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यावेळी आक्षेप घेऊन व्यंगचित्र मागे घ्यायला लावले होते. यावरूनच आता भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँ
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेबांचे अपमान करणे ही माझी आणि आमच्या पक्षाची संस्कृतीच नाही. मात्र, संसदेत काँग्रेसचा आंबेडकरद्वेष सिद्ध झाल्यानेच त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, असा घणाघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत केला.
सुभेदार, फत्तेशिकस्त, शिवरायांचा छावा, पावनखिंड, मुंज्या अशा अनेक चित्रपटांमध्ये आणि असंभव, शुभं करोति, तु तिथे मी अशा अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका गाजवणारे अभिनेते अजय पुरकर ( Ajay Purkar ) यांच्याशी Unfiltered गप्पा With कलाकारचा भाग छान रंगला... नक्की पाहा
मुंबई : परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या ( Constitution ) प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबई : “इव्हीएम ( EVM ) मशीनविरोधात आंदोलन करणे, हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला विरोध आहे. जनतेने विचार करून महायुतीला निवडून दिले आहे. त्यांना तुम्ही एवढे अडाणी कसे समजू शकता?” असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांना केला आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजी आपल्या ’एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. महामानव, क्रांतिसुर्य, मुकनायक अशा अनेक नावांनी आपण त्यांना ओळखतो. बाबासाहेब आंबेकडरांचं जीवन म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास होताच पण त्यातून जगाला पटवून दिलेलं पुस्तक आणि वाचनाचं महत्व हे सगळ्यात जास्त उल्लेखनीय. डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या याच वाचन व्यासंगाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओतून ( Message )
धर्म, संस्कृती आणि विशेषतः सामाजिक समरसतेला धरून कशी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( RSS ) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक साम्यता?
'काँग्रेसच्या सरंजामशाहीचे वातावरण देशाच्या हितासाठी बाधक ठरेल', असं म्हणत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला जळत्या घराची उपमा दिली होती. बाबासाहेबांनी काँग्रेसला जळत्या घराची उपमा का दिली? त्यामागील कारण काय ?
भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस ( Mahaparinirvan ) म्हणजे ६ डिसेंबर. या युगप्रवर्तकास माझे कोटी कोटी प्रणाम. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठे ध्येय व स्वप्न पाहता येतात, नव्हे प्रत्यक्षात सत्यात उतरवता येतात याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून आज आपण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघून म्हणू शकतो. आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होण्याची आवश्यकता आहे.
(Sangamner) "माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार बनण्याची संधी मिळाली ते केवळ संविधानामुळेच, आज संविधानामुळेच आठ वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात यांना पराभूत करु शकलो", असे वक्तव्य संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त खताळ हे चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. विरोधकांनी लोकसभेला संविधानाबाबत फेक नरेटिव्ह चालवले होते, मात्र जनतेने त्यांना या विधानसभेत उत्तर दिले असल्याचेही खताळ म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
आज दि. 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. ‘अत्त दीप भव’ म्हणत समाजाला आत्मभान देणार्या आणि संविधान लिहून समस्त भारतीयांना कायदेशीर हक्क, संरक्षण प्रदान करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचा जागर करताना, भारतासह बांगलादेशात त्यांची विचारप्रेरणा कशी कार्यरत आहे, याचा मागोवा घेणारा हा लेख...
आज महामानव, क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा, त्यांनी दलित, वंचितांच्या हक्कांसाठी उभारलेला लढा आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याविषयी या लेखातून व्यक्त केलेले हे विचार...
भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वसामान्यांना हक्क, अधिकार मिळाले. या अधिकार, हक्कांनी कित्येकांचे आयुष्य बदलले. ही माणूस म्हणून घडण्याची गोष्ट भीमराया तुझ्यामुळे या व्हिडिओतून अनोख्या आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या म्युझिक व्हिडिओतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाला अभिवादन करण्यात आलं आहे.