आसाम रायफल्स आणि मिझोरामच्या नार्कोटिक्स विभागाने ऐझॉल येथे केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये एकूण ९.५१ लाख रूपयांच्या ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला असून, एकूण ३ जणांना अटक करण्यात यश आले आहे. शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी जिरीबम येथे ही कारवाई करण्यात आली होती.
Read More
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती दिली की सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिसांसारख्या केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये १,१४,२४५ पदे रिक्त आहेत. तसेच, अजय मिश्रा म्हणाले की, २०२३ मध्ये सुमारे ३१,८७९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत.
मणिपूरमध्ये म्यानमारमधील ७१८ नागरिकांनी घुसखोरी केली आहे. राज्य सरकारने २४ जुलै २०२३ रोजी आसाम रायफल्सला या घुसखोरांना भारतातून तत्काळ हद्दपार करण्याचे निर्देश दिले आहेत. २२ आणि २३ जुलै रोजी हे लोक बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसले होते. त्यापैकी ३०१ अल्पवयीन मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील या घुसखोरीवर राज्य सरकारने चिंता व्यक्त केली आहे.
‘अग्निपथ’ योजनेतील ‘अग्निवीरांना’ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे, तर अग्निवीरांना तटरक्षक दलासह संरक्षण खात्यातील विविध उपक्रमांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण मंत्रालयातर्फे करण्यात आली आहे.
आसाम रायफल्सचे ५ सैनिक हुतात्मा झाल्याची माहिती भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली
नागालँडमध्ये सक्रीय असलेल्या नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-के) या फुटीरतावादी संघटनेनी हा हल्ला केल्याचा दावा लष्कराने केला आहे.