कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा निर्णय दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने अरुण गवळीचा जोरदार फटका बसला आहे.
Read More
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला. या पार्टीचे फोटो त्यांनी सभागृहात सादर केले, तसेच व्हिडिओपुरावे अध्यक्षांकडे अधिक आकलनासाठी पाठवून दिले. या गंभीर विषयाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’च्या माध्यमातून तपास करण्याची घोषणा केली.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला न्यायालयाने दणका देत नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, नागपूर खंडपीठाने त्याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार दिला.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळीला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. अरुण गवळीसह अन्य आरोपींवर खटला 'मोक्का' खटला चालवण्यात आला होता. मार्च २००७मध्ये असल्फा व्हिलेज येथे जामसंडेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अरुण गवळीसह ११ जणांना न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. न्या. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी पूजा सावंत आगामी 'दगडी चाळ २' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतीच ही आनंदाची बातमी पूजाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली.
महात्मा गांधींच्या आदर्शांवर आधारित प्रश्नावलीद्वारे नुकतीच एक परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १५९ कैदी सहभागी झाले होते.