नाशिक : दुचाकी वेगाने चालविणार्या चालकास हटकल्याचा राग येऊन कामगारनगर येथील काळेनगर भागात राहणार्या माजी नगरसेविका योगिता आहेर ( Yogita Aher ) यांच्या घरावर टोळक्याने दगडफेक केली. तसेच क्षुल्लक कारणावरून वाद घालत बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी आहेर यांच्यासह त्यांचा मुलगा व भावाला मारहाण केल्याचीदेखील घटना घडली. आहेर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून दुचाकीस्वार संशयित करण कटारे (२२, रा. संत कबीरनगर) वेगात दुचाकी चालवत होता. यावेळी आहेर यांनी त्याला हटकले व गाडी हळू चालवण्यास सांगितले. त्याचा या दुचाकीस्वाराला
Read More