पाकिस्तानच्या सीमा हैदरप्रमाणे आता बांगलादेशच्या सोनिया अख्तरही नोएडात आली आहे. ती सौरव कांत तिवारीच्या शोधात आहे, ज्याने तिच्याशी ढाका येथे कथितपणे लग्न केले होते. मग तिला सोडून तो भारतात आले.सोनिया वैध कागदपत्रांसह भारतात आली आहेत. आपल्या एक वर्षाच्या मुलाला कुशीत घेऊन तिने नोएडा गाठले.सोनिया म्हणाली की तिला तिच्या पतीसोबत राहायचे आहे. तिच्या म्हणण्यानुसार, सूरजपूर, नोएडा येथील रहिवासी सौरव कांत तिवारी याने तीन वर्षांपूर्वी ढाका येथे तिच्याशी लग्न केले होते.
Read More
पाकिस्तानातून भारतात आल्यामुळे सीमा हैदर चर्चेत होती, पण आता तिच्यावर चित्रपट येत असल्यामुळे आता अधिकच चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपुर्वी सीमा हैदरवर चित्रपट करणार असल्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून याला विरोध करण्यात आला होता. महाराष्ट्रात तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्य़क्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूडला धमकीच दिली होती. मात्र, असे असतानाही चित्रपट येत असून'कराची टू नोएडा' असे या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शिवाय चित्रपटातील पहिले गाणे लवकरच
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरसोबत चित्रपट करणार असल्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली होती. आणि त्यानंतर वाद सुरु झाला होता. आता या विषयात थेट मनसेने उडी घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी निर्मात्यांना थेट इशाराच दिला आहे. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम कहानीवर चित्रपट बनवण्याची घोषणा करत या चित्रपटाचे नाव 'कराची टू नोएडा' असे असणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावर पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी मनोरंजन आम्ही महाराष्ट्रात आणि देशभरातक सहन करण
पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आलेली सीमा हैदर देशात चर्चेचा विषय बनलेली आहे. पण याच दरम्यान एक नवीन बातमी समोर आली आहे. सीमा हैदरला पाकिस्तानला वापस जाण्यासाठी तिकीट काडून देण्यात आलेले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी तिकिटांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणाची चर्चा देशभरात होत आहे. यातच आता एक नवा खुलासा झाला आहे. सीमाचा प्रियकर सचिन घरातून बेपत्ता आहे. एटीएसने त्याला सोबत नेल्याचा संशय आहे. आधार कार्ड फसवणूक प्रकरणात एटीएस त्याची चौकशी करू शकते, असे म्हटले जात आहे.
सीमा हैदरच्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रत्यक्षात दहशतवाद्यांना निधी पुरवण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या हबीब बँकेशी सीमाचे संबध असल्याचे समोर आले आहे. नेपाळमधील हबीब बँकेच्या माध्यमातून सीमाशी संपर्क साधला जात होता. तसेच त्या बँकेच्या माध्यमातून सीमाला मदत ही केली जात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानची हबीब बँक आणि नेपाळची हिमालयन बँक यांचा परस्पर करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानी हबीब बँकेने हिमालय बँकेच्या सहकार्याने नेपाळमध्ये आपल्या शाखा उघडल्या. अमेरिकेत हबीब बँकेवर अल कायदासारख्या मो
सीमा हैदर हिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्ज पाठवला आहे. त्या अर्जात भारताचे नागरिकत्व देण्याची विनंती केली आहे. त्याचवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने तुरुंगात आयुष्य घालवणार, पण पाकिस्तानात जाणार नसल्याचे सांगितले आहे. सचिन माझं आयुष्य असल्याचे सांगत.सीमा म्हणाली की, तिचा एकच गुन्हा आहे की ती नेपाळमार्गे भारतात आली. दरम्यान, सचिनसोबतच्या तिच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानातील सिंध प्रांतात ३० हिंदूंचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (HRCP) सर्व पीडितांना सोडण्याची मागणी केली आहे. प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असलेल्या दरोडेखोरांच्या एका संघटित टोळीने ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. ही घटना दि. १६ जुलै रोजी घडली. यासोबत २४ तासात २ हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनची 'लव्हस्टोरी' सध्या चर्चेत आहे. आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात, एक वर्षापूर्वी बांगलादेशातील जुली नावाची मुस्लिम महिला आपल्या ११ वर्षाच्या मुलीसह भारतात आली होती. हिंदू झाल्यानंतर मुरादाबादच्या अजयशी तिने लग्न केले. त्यानंतर ती अजयला बांगलादेशला घेऊन गेली. आता ती रक्ताने माखलेले अजयचे फोटो त्याच्या आईला पाठवते. अजय त्याच्या आईला कॉल करतो आणि तिला सांगतो की, जुली त्याला मारहाण करते. तो तिथे अडकला आहे. यानंतर दि. १५ जुलै
सीमा हैदर आणि सचिन अचानक गायब झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या ३६ तासांपासून सीमा आणि सचिन मीणा गायब आहेत. पब्जी खेळताना सचिनवर प्रेम झाल्यानंतर सीमा पाकिस्तानच्या कराचीतून आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती, असा दावा तिने केला होता.त्यानंतर तिने सचिन मीनासोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.यानंतर त्यांचे व्हि़डिओ व्हायरल झाले आहेत. ग्रेटर नोएडा या ठिकाणी ते राहत होते.
सीमा हैदरला पाकिस्तानात परत न पाठवल्यास २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करु अशी धमकी देण्यात आली आहे. गुरुवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज आला. याचा तपास गुन्हे शाखा करत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर हा मेसेज आला होता.