‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने यशस्वी भरारी घेतली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटात स्वत: रणदीपने सावरकरांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर यमुनाबाई विनायक सावरकर यांची भूमिका अंकिता लोखंडे हिने निभवली आहे. अंकिताच्याच या चित्रपटातील मानधनावर (Swatantryveer Savarkar) चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी हा चित्रपट कठीण टप्प्यावर असताना अंकिताने कशी मदत केली त्याबद्दल सांगितले आहे.
Read More
तेजस्विनी, येसूवहिनी, जिच्याबद्दल खुद्द ‘स्वातंत्र्यवीर माझे वहिनी माझे स्फूर्ती’ असे आदरपूर्ण गौरवोद्गार रचतात, त्या वीरांगनेचा धैर्यशाली इतिहास ‘मृत्युंजय’ प्रकाशनातर्फे ‘तू धैर्याची अससी मूर्ति’ या साधार चरित्राच्या स्वरूपात प्रकाशित होत आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र, कर्वे रस्ता, पुणे येथे संध्याकाळी ६.३० वाजता संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकावरील हा परिचयपर लेख...