हरियाणामधील नूह येथे झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याबद्दल काँग्रेसचे आमदार मामन खान यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगीना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सहा एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींसोबत मामन खान यांचे हिंसाचारपूर्व संभाषण आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेले संदेश रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
Read More
हरियाणातील नूह येथे ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारापूर्वी समाजमाध्यमांवर चिथावणीखोर पोस्ट टाकल्याबद्दल काँग्रेस आमदार मामन खान यास गुरुवारी राजस्थानमधून पोलिसांनी अटक केली. खान यास एसएआयटी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हरियाणातील नूह हिंसाचारामध्ये सायबर पोलिस स्थानकावर हल्ला करणाऱ्या जबीर आणि इर्शाद या दोन आरोपींनी हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.
नूह हिंसाचारात आतापर्यंत सरकारने केलेल्या कारवाईत ६०० हून अधिक बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात आला असून सुमारे १०४ एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. तसेच, या हिंसाचाराप्रकरणी २१६ जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत ८३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, हा हिंसाचार पूर्वनियोजित असून एक मोठे षडयंत्र असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
राज्यातील नूह येथे झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. त्यामुळे या हिंसाचाराच षडयंत्र रचणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिला आहे.
नूह हिंसाचाराप्रकरणी खट्टर सरकार अॅक्शनमोडमध्ये आले असून या हिंसाचारामध्ये सहभागी असणाऱ्या रोहिंग्या आणि बांग्लादेशींच्या २५० झोपड्यांवर बुलडोझर फिरविण्यात आला आहे. ही यासंदर्भात झालेली मोठी कारवाईच म्हणावी लागेल. दरम्यान, सरकारकडून यासंदर्भात स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून याटीमची ३ स्वतंत्र दले तयार करण्यात आली. यामार्फत झालेल्या तपासातून ही हिंसा पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले आहे.
हरियाणाच्या मेवातमधील नूह येथे झालेल्ला हिंसाचारात अनेकांना आपले जीव गमवावे लागले असून राज्य सरकारकडून यासंदर्भात कारवाई सुरु आहे. दरम्यान, पोलीसांकडून केल्या जाणाऱ्या तपासातून अनेक नवे खुलासे केले जात आहेत. दरम्यान, नूह हिंसाचारात मुस्लिम जमावाकडून 'अल्लाह-हू-अकबर' आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच, पोलीसांनी या जमावाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलीसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
नूह येथील हिंसाचारानंतर हरियाणा सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाई करत आहे. दरम्यान, हरियाणा सरकारमधील गृहमंत्री अनिल विज यांनी यासंदर्भात माहिती दिली असून आतापर्यंत १०२ एफआयआर दाखल करण्यात आल्या असून २०० हून अधिक जणांना पोलीसांनी अटक केली आहे. तर ८४ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
हरियाणातील नूह येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) बुधवारी झालेल्या आंदोलनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तथापि, न्यायालयाने राज्य सरकार आणि दिल्ली पोलिसांना रॅलींदरम्यान द्वेषयुक्त भाषण किंवा हिंसाचार होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.