‘व्हर्च्युअल’ चलनाला ‘आधुनिक काळातील महामारी’ म्हटले जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, ही चलने आभासी आहेत, सरकारी नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्यांच्या किमती अतिशय धोकादायकपणे चढतात आणि गडगडतातही! कोरोना काळात ज्या आभासी नियमांबद्दल कायम चर्चा होत असते, त्या चर्चेचे एक केंद्र म्हणजे ‘बिटकॉईन’सारखे ‘डिजिटल’ चलन, ज्याला ‘आभासी चलन’ असेही म्हटले जाते. आजकाल जगभरात गुंतवणुकीसाठी आभासी (क्रिप्टोकरन्सी)चा पुरस्कार काही देशांनी केलेला दिसतो.
Read More
बिटकॉईनसारख्या आभासी चलनांवरील बंदी उठवावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी देताना या चलनावरील बंदी उठवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपले मत मांडले आहे. आभासी चलनाद्वारे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.