(Karnataka MGNREGA Fraud) कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील मल्हार गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) फसवणुकीची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, मनरेगा योजनेअंतर्गत मजुरी मिळविण्यासाठी काही पुरुषांनी साड्या परिधान करुन महिला असल्याचे भासवून बनावट फोटो सादर केले होते.
Read More
Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी पहाट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणाला लागून असणाऱ्या शिरंगे खजिन उत्खननाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. हे उत्खनन बंद करण्यासाठी ग्रामसभेने ठराव केलेला असताना देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवार दि. ६ मार्च पासून खानयाळे ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यासंपूर्ण परिसरात 'L4' असा सांकेतिक क्रमांक असणाऱ्या नर वाघाचा वावर असल्याचे 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने सावंतवाडी-दोडमार्ग संवेदनशील क्षेत्रासंबंधी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. (shrirange villagers)
पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरुर येथील गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपला असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक गुनाट गावात दाखल झाले असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने विलेपार्ले येथे 'उत्तुंग महाखादी प्रदर्शन' आयोजित करण्यात येणार असून मुंबईकरांना खादी वस्त्रांसह विविध सेंद्रिय उत्पादनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.
पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दि. ११ ते दि. १९ जानेवारी या कालावधीत ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. समाजाला (कुटुंबांना) रा. स्व. संघाची ओळख व्हावी, संघकार्याची (सेवाकार्यांची) माहिती मिळावी व प्रत्यक्ष संघ/सेवा कार्यातील त्यांचा सहभाग वाढीस लागावा, तसेच सेवा वस्तीतील कुटुंबांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेस पूरक सहकार्य ‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’तील ( Kutumb Prabodhan Gatividhi ) दोन उपक्रमांमधून मिळून त्यास चालना मिळावी, असा हेतू यामागे होता. तसेच ‘कुटुंब प्रबोधना’च्या वेगवेगळ्या आयामांच्या विस्ताराचाही
‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ व कल्याण-डोंबिवली ( Dombivli Village ) महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पू) येथे आज शुक्रवार, दि. १७ जानेवारी ते रविवार दि. २६ जानेवारी या कालावधीमध्ये पुस्तक आदान-प्रदान सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने डोंबिवलीच्या वाचनसंस्कृतीचा आढावा घेणारा श्रीकांत पावगी यांचा हा लेख...
डोंबिवली : कल्याणसह आजूबाजूच्या शहरांत महिलांवर होणारे अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खोणी गावातील ग्रामस्थांनी गावातील मशिदीमध्ये ( Namaj Prayer ) गावाबाहेरून येणार्या मुसलमानांना बंदी घातली आहे.
गांधीनगर : गुजरात बनासकांठा जिल्ह्यातील मसाली हे गाव ( Solar Village ) सीमावर्ती भागातील सर्वात पहिले 'सौर गाव' ठरले आहे. एकूण ८०० लोकसंख्या असलेले हे मसाली गाव पाकिस्तान सीमेपासून निव्वळ ४० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. मसाली या गावाने १०० टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव म्हणून आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.
ठाणे : केंद्र शासनाने दि. २४ डिसेंबर, १९९६ रोजी पंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम,१९९६ अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला दि. २४ डिसेंबर, रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस "पेसा दिन" ( PESA Day ) म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूली गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
(Markadwadi) माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतला. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय माध्यमांसमोर मांडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
जिद्द असल्यास अशक्य असे काहीही नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोडनिंब गावातील ‘साईप्रसाद फूड प्रोडक्ट कंपनी’ होय. जाणून घेऊया या कंपनीचे मालक अक्षय केदार यांच्या प्रवासाविषयी...
( CM Eknath Shinde )राजकारणाच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून आराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले होते. तिथे एक दिवस आराम करून परत मुंबईकडे निघताना अचानक त्यांचा ताफा त्यांच्याच गावातील काही महिलांनी थांबवला. यानंतर जे घडले त्याची कल्पना खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील केली नव्हती.
अमृत योजनेच्या कामात अनेक अडचणी आल्या. अमृत योजनेत डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्याचे काम केले गेले. टाक्यांच्या जागा निश्चित केल्या गेल्या नाहीत. ज्या जागा निश्चित केल्या होत्या. त्या जागा आपल्या ताब्यात नव्हत्या. पण आता समाधानकारक परिस्थिती दिसते आहे. लवकरच अमृत योजना कार्यान्वित होईल असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामाच्या पाहणी दौरा दरम्यान केले.
(Karde)महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी
राज्यातील एक हजार गावांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि 'स्वदेस फाऊंडेशन' यांच्यात करार करण्यात आला आहे. "ही गावे शाश्वत विकासाचे अनुकरणीय मॉडेल ठरतील," असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी ८ लेन नाशिक फाटा ते खेड अशा ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निर्मिती करण्यात येणार आहे. आगामी ५० वर्षांतील वाढत्या वाहतुकीचा विचार करुन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ७ हजार ८२७ कोटी इतका खर्च येईल. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
बेलापूर किल्ले गावठाण परिसरात जेष्ठ नागरिक व मुलांसाठी खेळाचे मैदान व उद्यान विकसित करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता नासिर हुसेन यांनी पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या कडे केली आहे बेलापूर किल्ले गावठाण परिसरात लहान मुलांकरिता व जेष्ठ नागरिकांनसाठी एकही उद्यान नाही. त्यामुळे येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीस संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशातील सीमांत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
श्री जोतिबा मंदिर परिसर व त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी महायुती सरकारने घेतला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, “श्री ज्योतिबा मंदिर परिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजित प्राधिकरणाची आवश्यकता आहे.
टेटवली गावच्या नमिता भुरकुड, गीतांजली भुरकुड, अंजली फडवले, निकिता भुरकुड, अलका मेढा आणि जागृती फडवले या सहा महिला नुकत्याच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर पाड्यातील वंचित आणि समाजप्रवाहापासून दूर असलेल्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याचे सोने करणार्या केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाच्या परिसस्पर्शाचेही मनोमन अभिनंदन. दहावी उत्तीर्ण होणार्या या भगिनींच्या यशाच्या पार्श्वभूमीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
आज दि. ११ एप्रिल या दिवसाचा दिनविशेष असा की, या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. तसेच ‘महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा’चा तो वर्धापन दिनसुद्धा आहे. दि. ११ एप्रिल १९६० रोजी ‘राज्य खादी मंडळा’ची स्थापना झाली. मंडळाच्या स्थापनेस यंदा ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. आज खादी विषयास प्रतिष्ठा प्राप्त झाली असून, जनतेच्या जिव्हाळ्याचा तो विषय झाला आहे. त्यानिमित्ताने...
ग्रामीण महिलांच्याउपस्थितीत पहिल्यांदाच आयोजित केलेला महिला सशक्तीकरण सोहळा रविवार, दि. १० मार्च रोजी वाडा तालुक्यातील गालथरे गावातील गोवर्धन ईकोव्हीलेज येथे यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याचे शब्दचित्रण या लेखात केले आहे.
ओडिशातील पहिले कलाकुसरीसाठीचे वारसा गाव (हेरिटेज व्हिलेज) म्हणून विकसित होण्याचा मान मिळाला रघुराजपूरला. या गावातील प्रत्येक घरात एखादा तरी राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार वास्तव्यास. अहोरात्र कलासाधना आणि त्यातून उदरनिर्वाह करणार्या अशा या कलासागरात रंगलेल्या गावाविषयी आजच्या ‘ओडिशायन’ लेखमालेतील शेवटच्या भागातून जाणून घेऊया...
युक्रेनमधील एका गावातून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. युक्रेनियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी ज़कारपटिया भागात, केरेत्स्की ग्राम परिषदेच्या इमारतीत सुरू असलेल्या ग्रामसभेदरम्यान, एका ग्रामसेवकाने ग्रेनेडसह प्रवेश केला.त्यांनी तेथे ग्रेनेडचा स्फोट केला. या हल्ल्यात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. विजेत्या ग्रामपंचायतींना ६० हजारांपासून ते ५० लाखांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्याच मनोभावे जोपासली जात आहे. अत्याधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात एक गाव एक गणपती ही संकल्पना अनेकांना अप्रुप करण्यासारखी आहे.
'खादी आणि ग्रामोद्योग आयोग' नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. भारत सरकारच्या अखत्यारित असलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगातील “सेवानिवृत्त/माजी. बँक अधिकारी, विपणन तज्ञ” या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केळवा गावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, यादृष्टीने पहिले पाऊल टाकलेले केळवा गावचे सुपुत्र हरिश्चंद्र मुकुंद चौधरी यांच्या जीवनकर्तृत्वाचा घेतलेला हा मागोवा...
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अरूणाचल प्रदेशातील सीमावर्ती किबीथू गावातून 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे, या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने ४८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, यापैकी २५०० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ दरम्यान खास रस्ते जोडणीसाठी खर्च करण्यात येतील. 'व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम' या केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ
कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेलं रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्यातील गोवे गाव. साधारणत: एक हजारच्या आसपास या गावची लोकसंख्या असावी. या गावामध्ये १२ बलुतेदारांपैकी कुणबी, भोय, सुतार, गोसावी, बौद्ध आणि वनवासी समाजाचे लोक एकत्र नांदतात. या गावात जाधव, पवार, शिर्के, सानप, गुजर अशा ऐतिहासिक मात्तब्बर घराण्यांची आडनावं पाहायला मिळतात. जाधव कारभारी तर सानप या गावचे खोत म्हणून ओळखले जातात. प्रस्तुत लेखात या गावामध्ये आढळणार्या शिलाहारकालीन अवशेषांचा आढावा घेतला आहे.
मुंबई : उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्याने मागील वर्षापेक्षा अडीचशे टक्के अधिक काम करून शासनाने भरीव कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्याने एकूण 12 हजार 326 कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यात रुपये 276 कोटी रुपये इतक्या अनुदान रकमेचा समावेश आहे. राज्याची ही कामगिरी मागील वर्षाच्या 250% पेक्षा अधिक आहे. यात
देशातील पहिले वनवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर, त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले आहे. पहिले वनवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौरऊर्जेचावापर केला जात असून, ग्रामपंचायतीतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत.
त्याची माणसं देशातल्या प्रत्येक शाळेतील 13 ते 15 वर्षांच्या मुलींवर नजर ठेवतात. त्यातली सर्वांत सुंदर मुलगी, जिचा आवाज मधूर आहे आणि उंची 170 सेमी आहे, तिला तिची आणि तिच्या पालकांची सहमती असो वा नसतो तिला ‘हॅपिनेस स्क्वाड’मध्ये भरती केले जाते. तिथे तिला नृत्य, गायन आणि इतर प्रमुख कलांच्या बरोबरच मनोरंजन करण्याची कलाही शिकवली जाते. शिक्षण पूर्ण झाले की मग या मुलींची रवानगी तीनपैकीएका ग्रुपमध्ये केली जाते. मुलगी कोणत्या ग्रुपमध्ये काम करणार हे तिच्या सौंदर्यानुसार आणि विकसित कलागुणांनुसार ठरवले जाते. हे तीन ग्
चित्रकार अरुण कालवणकर यांनी त्यांच्या दृश्यकला साधनेतून त्यांचा एक रसिक वर्ग निर्माण करु शकले. हे त्यांच्या कला आणि आध्यात्मिक साधनेचं यश आहे. त्यामुळे ते अटकेपार दृश्यकला कृतीद्वारे झेंडा फडकवू शकले.
तालुक्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वनवासी दुर्गम भागही मोठ्या प्रमाणात आहे. येथील नागरिकांना पेण उपजिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार आहे. दिवसाला शेकडो रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होते. परिसरात कचर्याच्या साम्राज्यामुळे पसरणार्या दुर्गंधी आणि घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दि. 2 जुलै, 2019ची ती मध्यरात्र. अचानक पावसाने धारण केलेल्या रौद्ररूपामुळे मालाडमधील कुरार गाव येथील आंबेडकरनगर येथे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अचानक कोसळलेल्या भिंतीमुळे 32 जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झालेे. परंतु, या दुर्घटनेला तीन वर्ष उलटल्यानंतरही येथील नागरिकांना अद्याप त्यांच्या हक्काची घरे मिळालेली नाहीत. अजूनही येथील नागरिक हे मृत्यूच्या छायेतच आपले जीवन कंठत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा या गावामध्ये निळ्या दाढीवाला राघू या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. स्थानिक पक्षीनिरीक्षकांनी बुधवारी दि. १४ सप्टेंबर रोजी या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. इंग्रजीत ह्या पक्ष्याला Blue-bearded Bee-eater असे म्हणतात. सदरचा पक्षी हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये व चिपळूण तालुक्यातील घाटमाथा या भागामध्ये या आधी दिसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु अपुऱ्या फोटोग्राफिक रेकॉर्ड व नोंदी अभावी रत्नागिरी तालुक्यामध्ये हा प्रथमच दिसला असण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी वर्तवली आह
पंजाबमधील तरुणांना खलिस्तानी झेंडा फडकवण्यासाठी चिथावणी देणारा शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या घरानंतर आता त्याच्या गावातही तिरंगा फडकवण्यात आला आहे. आज स्वातंत्र्यदिनाच्या अमृतदिनी त्यांच्याच गावातील स्थानिक नागरिकांनीही भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत. पन्नूचे खानकोट हे गाव अमृतसर जिल्ह्यातील अमृतसर-जालंधर रस्त्यावर येते.
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. पिंगोरी हे गाव पुरंदर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. सोमवारी दि.१ ऑगस्ट रोजी रात्री हा बिबट्या रस्त्यावरुन जाताना गावकऱ्याने पहिला. माणसाला पाहून हा बिबट्या रस्त्यालगत असलेल्या झाडीत जाऊन बसला. आतापर्यंत बिबट्याने माणसावर हल्ला केलेला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३० नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे, असा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात गुरुवारी दि. २७ जुलै रोजी गोहत्येच्या घटनांवरून राज्य पोलिस आणि स्थानिकांमध्ये सतत संघर्ष सुरू झाल्यानंतर काही कर्फ्यू लागू करण्यात आला. हनुमानगढ जिल्ह्यातील चिरिया गांधी पंचायत आणि गांधी बडी भागात पुढील सूचना मिळेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलकांनी ११ जुलै रोजी ईदच्या वेळी कथितपणे गोहत्येत सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी गोहत्येच्या आरोपाखाली आरोपी फारुक, अन्वर, अमीन खान आणि सिकंदर खान यांना अटक केली.
मुंबईतील विरारच्या मारंबळपाडा येथील कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. गावांमध्ये कांदळवनाबाबत जागरूकता आणि इको टुरिझमला चालना मिळण्यासाठी यामुळे हातभार लागणार आहे.
जून महिन्याच्या सुरवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब होते. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला. पुढील तपासात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात असलेल्या कोळसा या गावाची पुनर्वसन प्रक्रिया दि. २८ जून रोजी पूर्ण झाली आहे. या गावातील सगळ्या गावकऱ्यांचे मूळ तेह्सीलमधील गोलाभूज गावात करण्यात आले आहे. यामुळे ताडोबामध्ये १२५ हेक्टरपेक्षा जास्त अधिवासाची भर पडली असून गावकऱ्यांना नवीन जीवनाची संधी उपलब्ध झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब आहे. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
राष्ट्रीय शिक्षण संस्थाचा दि. 3 जुलै रोजी शताब्दी सोहळा साजरा करत आहे. 100 वर्षांपूर्वी मनमाडसारख्या कामगार वस्तीच्या गावात शाळा सुरू करणे, हे एक आव्हानच होते आणि विपरित परिस्थितीतदेखील हे आव्हान रावसाहेब यांनी लीलया पेलले व शाळेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा करंदीकरांसारखे सारस्वत विद्यालयात काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते. ज्ञानदानाची सदावर्ते घालणार्या या संस्थेने पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडले सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम नि:स्वार्थपणे केले आहे, त्याविषयी...
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात एक किंग कोब्रा मृत अवस्थेत आढळून आला आहे. वन विभागाला याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन या सापाला ताब्यात घेण्यात आले. या सापाचे डोके कोणी तरी ठेचल्याचे दिसून आले.
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे राज्य सरकार लवकरच रद्द करणार आहे. याऐवजी ‘पंचायत विकास अधिकारी’ हे एकच पद निर्माण केले जाईल. त्यानुसार, राज्य सरकारने ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
रत्नागिरीतील कुर्ली गावात खाजगी मालकीच्या शेतात बिबट्या फासकीमध्ये अडकला होता.वनविभागाकडून वैद्यकीय चाचणी नंतर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आशुतोष तोडणकर यांनी काल दि. ११ रोजी तत्काळ वनविभागाला कळवली होती.